‘हिंदू- मुस्लिम मील’ हे काय असतं? एअर इंडियाच्या मेन्यूवरुन नवा वाद

Air India Meal : एअर इंडिया विमानात देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थावरुन आात नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर ( Manickam Tagore) यांनी एअर इंडियाच्या वेबसाईटचा एक स्क्रीनशॉट शेअर करत हिंदू-मुस्लीम मील (Hindu-Moslem Meal) काय असतं? असा प्रश्न उपस्थित केला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे  कारवाईची मागणी करत  मणिकन टॅगोर यांनी ‘संघाने एअर इंडिया ताब्यात घेतली आहे का?’ अशी टीकाही केलीय. एअर इंडियाच्या मेनूमध्ये धर्मावर आधारित अन्न कधी समाविष्ट केले गेलं? हे स्पष्ट झालेलं नाही. पण आहाराला प्राधान्य देण्याऐवजी धर्मावर आधारित मेन्यू तयार केल्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. एअर इंडियाच्या मांसाहारी भोजणात गोमांस किंवा डुकरांचं मांस दिलं जात नाही असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे.

एअर इंडियाच्या वेबसाईटवर जेवणाच्या पानावर प्रवाशआंना विमानात देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची माहिती देण्यात आली आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पाककृतींची समृद्धता लक्षात घेऊन विविध खाद्य पर्यायांसह, आम्ही सर्वांसाठी स्वादिष्ट पदार्थ देतो’ असं या पानावर लिहिण्यात आलं आहे. यात मधुमेही रुग्णांसह लहान मुलांपर्यंत विविध खाद्यपदार्थांचा समावेश आहे. पण धर्मावरीत आधारीत खाद्यपदार्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 

हेही वाचा :  Republic Day : महाराष्ट्र चित्ररथ : राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण

हिंदू-मुस्लीम मील
हिंदूच्या भोजणासंदर्भात एअर इंडियाने हिंदू प्रवाशांसाठी भारतीय पाककृतीमध्ये तयार केलेल्या मेनूमध्ये चिकन, मासे, अंडी, भाज्या, स्टार्च किंवा दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. तर मुस्लिम समाजातील प्रवाशांसाठीच्या मेन्यूत मुस्लिम आहाराच्या गरजेनुसार प्रमाणित हलाल किचनमध्ये तयार केला जातो, असं लिहिण्यात आलं आहे. 

<

जैन आणि ज्यूंसाठीही स्वतंत्र मेनू
याशिवाय एअर इंडियाने ज्यू समुदायाशी संबंधित प्रवाशांसाठी प्रमाणित कोशेर किचनमध्ये त्यांच्या गरजेनुसार तयार केलेले अन्न पुरवलं जाईल असं म्हटलंय. हे जेवण केवळ विशिष्ट आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये उपलब्ध आहे. तर जैन समाजाच्या प्रवाशांसाठी भारतीय शैलीत तयार करण्यात आलेल्या मेनूमध्ये कांदा, लसूण किंवा अॅनिमल प्रोडक्ट समावेश नसेल, असंही लिहिण्यात आलं आहे. 

कोण आहेत काँग्रेस नेते मणिकम टागोर?
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये तामिळनाडूच्या विरुधुनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेवार मणिकम टागोर विजयी झाले. 2009 आणि 2104 मध्ये त्यांनी याच मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. 2009 मध्ये ते जिंकून आले होते. तर 2014 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मणिकम टागोर यांनी बंगळुरु विद्यापिठातून एलएलबीची पदवी मिळवली आहे.

हेही वाचा :  Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘जेलमधून बाहेर येऊ नये यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावलीये, ही हुकूमशाही आहे,’ केजरीवाल यांच्या पत्नीचा संताप

मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक करण्यात आल्यापासून राजधानीमधील राजकारण …

पहिले आईचा गळा घोटला नंतर भावाचा जीव घेतला, एकुलत्या एक लेकीने संपूर्ण कुटुंब संपवलं, कारण एकून पोलिसही हादरले

Crime News In Marathi: रविवारी 23 जून रोजी हरियाणातील यमुना नगर येथे दुपारी एक वाजण्याच्या …