Viral News : कैद्यासोबत संबंध ठेवताना दिसली महिला तुरुंग अधिकारी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर…

Woman Prison Officer Video : कारागृहातील कैद्यांना हाताळण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी तुरुंग अधिकारी ठेवण्यात येतात. एका कारागृहात महिला तुरुंग अधिकाऱ्यावर कैद्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पोलिसांकडे पोहोचल्यानंतर महिला अधिकाऱ्याला अटक करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे महिला अधिकारी कैद्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असताना पोलीस गणवेशात होती. (Female prison officer seen having physical relationship with prisoner in jail video goes viral)

ही घटना दक्षिण-पश्चिम लंडनमधील एचएमपी वँड्सवर्थमधील धक्कादायक घटना आहे. या महिला अधिकारीचं नाव लीना डी सौसा अब्र्यू असून ती 30 वर्षांची आहे. पोलिसांना हा व्हिडीओ मिळाल्यानंतर त्यांनी चौकशी केल्यावर तो वँड्सवर्थमधीलच असल्याच समोर आलं. अटकेनंतर महिला अधिकाऱ्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्याप्रकरणात खटला चालवला जाणार आहे. 

मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले की, हा व्हिडीओ शुक्रवारी पोलिसांच्या हाती लागला. तर स्कॉटलंड यार्डच्या प्रवक्त्याने सांगितले की, तुरुंगातील कर्मचाऱ्यांकडून अशी कृती सहन केली जाणार नाही. 

या कारागृहाच्या नुकत्याच झालेल्या तपासणीत अनेक त्रुटीही समोर आल्या आहेत. हे कारागृह 1851 मध्ये व्हिक्टोरियन काळात कमी कैद्यांसाठी बांधण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार हे कारागृह अनेक कारणामुळे वादात सापडलंय. कैद्यांमधील हाणामारी आणि कर्मचाऱ्यांमधील गदारोळ पाहिला मिळाला. याशिवाय कारागृह क्षमतेपेक्षा जास्त कैद असल्यामुळेही वाद झाला होता. 

हेही वाचा :  'सरकारची भूमिका स्पष्ट नाही'; 9 मागण्यांसाठी मनोज जरांगेंचे तिसऱ्यांदा उपोषण सुरु



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध

Nawab Malik : नवाब मलिक सांगा कुणाचे? असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय… ईडी कारवाईनंतर जेलमधून …

विश्वविजेत्या टीम इंडियाची मुंबईत विजयी मिरवणूक; गर्दी टाळण्यासाठी वाहतूकीत मोठा बदल

Team India Welcome : रोहित शर्माच्या विश्वविजयी टीम इंडियाची उद्या मुंबईत भव्य मिरवणूक काढली जाणार …