Tag Archives: महाराष्ट्र न्युज

नोकरीसोबत शिक्षणही पूर्ण करायचंय? मुंबई विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी ‘असा’ करा अर्ज

Mumbai University Course: नोकरीला लागल्यावर अनेक तरुणांचे पुढे शिक्षण घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. पण अशा विद्यार्थ्यांना नोकरीसोबतच शिक्षण घेण्याची संधी मुंबई विद्यापीठाकडून मिळते. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रात विद्यार्थीपयोगी विविध अभ्यासक्रमांसाठी तुम्ही प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण करु शकता. येथे प्रथम वर्षाचे अभ्यासक्रमांचे प्रवेश 26 जूनपासून सुरु होत आहेत. ही प्रवेशप्रक्रिया 31 जुलैपर्यंत सुरु राहील. मागील वर्षी पदवी अभ्यासक्रमामध्ये 9819 …

Read More »

अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये! दरड, भूस्खलनाने संपूर्ण गाडलेल्या गावातील बाधितांसाठी घेतला मोठा निर्णय

Status of Project Victims: पावसाळा आल्यावर राज्यातील अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यात अनेक नागरिक बाधित होतात. यांना तात्पुरती मुदत केली जाते. पण आता प्रकल्प बाधितांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. दरड कोसळून तसेच भूस्खलनामुळे पूर्णपणे गाडले गेलेल्या वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे, गावांतील बाधितांनासुध्दा प्रकल्पग्रस्तांचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण …

Read More »

यांना कोणीतरी आवरा रे! ‘ट्रॅक्टरच्या चाकात अडकवली मान आणि….’ ‘जीव जाईल पण स्टंटपती नाही..’

Instagram Viral Video: मागचा काही काळ अंगप्रदर्शन करणाऱ्या टिकटॉकर्सनी उच्छाद मांडला होता. आता त्यांची जागा वेडवाकडं वागून जीव धोक्यात टाकणाऱ्या रिल्स स्टार्सनी घेतलीय. काही लाईक्स, कमेंट्ससाठी लोकं स्वत:चा जीव जाईल याचीही काळजी करत नाहीत. अगदी 15 दिवसांपूर्वी संभाजी नगरमध्ये रिल्स बनवताना कारसह मुलगी दरीत कोसळली. त्याला महिना उलटेना तोवर पुण्यात टेकडीवर लटकून रिल्स बनवल्याचा प्रकार समोर आला होता. आता आणखी …

Read More »

10 वी उत्तीर्णांना हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये नोकरी; कुठे, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या

HAL Recruitment 2024: शिक्षण कमी असेल तर आपल्याला नोकरी कुठे मिळणार नाही असा अनेकांचा समज असतो. त्यातली नोकरी मिळालीच तर जास्त पगार मिळणार नाही, असेही अनेकांना वाटते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण दहावी उत्तीर्ण, डिप्लोमा धारकांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची संधी चालून आली आहे.  त्यामुळे आता कमी शिक्षण असेल तरी काळजी करत बसू नका. हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये विविध पदांची …

Read More »

बारामतीचा विकास जोरात! AI मुळे उसाचे उत्पादन 30 टक्क्यांनी वाढले; देशातील पहिलाच प्रयोग

कैलास पुरी, झी 24 तास पुणे: बारामतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करत ऊस उत्पादन वाढवणारा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. एआय तंत्रज्ञान अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीचं उत्पन्न वाढवण्याचा देशातला हा पहिला प्रयोग आहे.  तुम्ही पाहत असलेल्या ऊसाचे उत्पादन ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करत घेण्यात आले. एआय तंत्रज्ञान वापरल्यामुळे उसाच्या उत्पादनात 30 टक्के वाढ झाली आहे. …

Read More »

जरांगे पाटील आणि भुजबळ वाद विकोपाला! भाषेचा दर्जा घसरला; समाजावर काय होणार परिणाम?

Jarange and Bhujbal Dispute: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातला वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.. मात्र मागील काही दिवसांपासून हा वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय. आम्ही कुणाला धमकी देत नाही.. आणि कुणी धमकी दिली तर हम किसी के बापसे डरते नही है… अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळांनी शेरोशायरी करत जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला… तर आम्ही देखील …

Read More »

1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 8व्या वेतन आयोगाचा आला प्रस्ताव, असे असेल सॅलरी स्ट्रक्चर

8th Pay Commission:  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.  कर्मचारी ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते त्या बातमीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. 2024 च्या पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी 8 वा वेतन आयोग प्रस्तावित आहे. केंद्र सरकारला आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आढावा घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.  8 व्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतन, …

Read More »

शाळेच्या विद्यार्थ्यांना कपाळी टिळा, हातात धागा घालायला बंदी; ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय

Tamilnadu No Surname and Tilak on Forehead: महाविद्यालयामध्ये बुरखा घालून प्रवेश मिळणार नसल्याच्या घटना गेल्यावर्षी कर्नाटक राज्यातून समोर आल्या होत्या. दरम्यान आता दुसऱ्या एका राज्यात विद्यार्थ्यांच्या माध्यावर टीळा, हातात धाग्याला बंदी घालण्यात आली आहे. कुठे घडलाय हा प्रकार? यावर पालकांच्या प्रतिक्रिया आल्या? सविस्तर जाणून घेऊया.  विद्यार्थ्यांना हातावर टिळक किंवा कलाव वगैरे घालून शाळेत जाता येणार नाही. तसेच त्यांच्या नावापुढे कोणतीही …

Read More »

पुण्याच्या रस्त्यावर बाईकस्वाराला चिरडणारी मर्सिडीज बेंज कोणाच्या मालकीची? माहिती आली समोर

Pune Accident: पुण्याच्या रस्त्यांवर धावणाऱ्या महागड्या गाड्यांखाली चिरडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. त्यामुळे पुण्याच्या रस्त्यांवर नक्की चाललंय काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पोर्शे कारच्या घटनेची देशभरात चर्चा झाली. यानंतरही अपघाताच्या घटना वारंवार समोर येताना दिसतायत.पुण्यात गोल्फ कोर्स चौकात मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय. पुणे पोर्शे कार अपघातानंतर अग्रवाल परिवार समोर आला होता. आता मर्सिडीज बेंझ …

Read More »

नोकरी सोडली आणि बनला शेतकरी! मातीत राबला,संघर्ष केला; करतोय वर्षाला 22 लाखांची कमाई

Farmers Success Story: आजकाल तरुण नोकरीधंदा सोडून शेती व्यवसायाकडे वळले आहेत. कृषीचा अभ्यास करुन शेतीतून चांगली कमाई करता येते हे तरुणांच्या लक्षात आले आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ होतेय. अशाच एका तरुण शेतकऱ्याच्या यशाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. शेती हे उत्पन्नाचे एक चांगले साधन असून सुशिक्षित लोक याकडे आकर्षित झालेले आपण गेल्या वर्षांमध्ये पाहत असू. बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील लाखो रुपयांचे …

Read More »

मोदींचे विश्वासू, दोनदा केंद्रीय मंत्री; आता महाराष्ट्रात भाजपला विधानसभा जिंकवण्याची जबाबदारी! कोण आहेत भुपेंद्र यादव?

Who is Bhupendra Yadav: लोकसभा निवडणुकीत भाजपच्या  400 पारच्या नाऱ्याला महाराष्ट्रातून सुरुंग लागला. मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवणाऱ्या महाविकास आघाडीला येथे फारसा चमत्कार करता आला नाही. दुसरीकडे पक्षफुटीनंतरही महाविकास आघाडीने जास्त जागा जिंकल्या. त्यामुळे विधानसभेसाठी भाजप कामाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरु आहे. महाराष्ट्रासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे भाजप प्रभारी तर अश्विनी वैष्णव भाजप सहप्रभारी असतील अशी माहिती …

Read More »

1 वर्षाच्या माकडाला उष्माघाताचा त्रास, पंतप्रधान निवास स्थानावरुन आला कॉल; पुढे जे झालं ते अद्भुत!

Sick Monkey Life Save: मुंबईसह महाराष्ट्रात पावसाच्या धारा कोसळू लागल्या असल्या तरी देशाची राजधानी दिल्लीत सूर्यदेव आग ओकत आहेत. येथील उष्णतेने विक्रमी पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागरिकांवर याचा खूप मोठा परिणाम पाहायला मिळतोय. उष्ण वारे आणि उष्णतेच्या लाटेमुळे वातावरण बिघडत आहे. उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम मनुष्यच नव्हे तर इतर प्राणीमांत्रावरही पाहायला मिळत आहे.  …

Read More »

महायुतीने घेतला विधानसभेचा धसका, कोल्हापुरच्या ‘या’ मोठ्या प्रकल्पाला सत्ताधाऱ्यांचाच विरोध

प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर: शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी श्रमिक महासंघच्यावतीने 18 जून रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांपेक्षा सत्ताधारी नेतेच शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या शक्तीपीठ महामार्गाचा लोकसभा मतदारसंघ मध्ये फटका बसला, तसाच फटका विधानसभेला बसू नये यासाठी सत्ताधारी नेते शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एकवटलेत.. लोकसभा …

Read More »

‘2022 मध्ये बांबू लावणे गरजेचे होते नाहीतर…’ असं का म्हणाले मुख्यमंत्री?

CM Eknath Shinde Bamboo Planted: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कामांप्रमाणेच वेळोवेळी करत असलेल्या सूचक विधानांसाठीदेखील ओळखले जातात. भाषण करताना ते अशी विधान करतात, ज्यातून त्यांना काहीतरी वेगळंदेखील सांगायचं असतं. शेतीपीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. यात मुख्यमंत्र्यांच्या विधानाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. राज्यात पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे. निवडणुकीच्या काळात तापमान अधिक होतं.आजच्या  …

Read More »

‘द्वेषाची जागा आता..’ शपथविधीनंतर नवाज शरीफांच्या टोमण्याला पंतप्रधान मोदींकडून ‘अशा’ शब्दात उत्तर

PM Narendra Modi to Nawaj Sharif: नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला देशविदेशातील महत्वाचे नेते उपस्थित होते. तसेच इतर देशाच्या प्रमुखांनी पंतप्रधान मोदी यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदीदेखील सर्वांचे आभार मानत आहेत. या सर्वात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाठवलेल्या शुभेच्छा आणि त्याला पंतप्रधान मोदींनी दिलेले उत्तर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.    नवाझ …

Read More »

Pune Rain: अवघ्या 2 दिवसाच्या पावसातच पुणेकरांची उडाली दैना! याला जबाबदार कोण?

अरुण मेहेत्रे, झी 24 तास, पुणे: अवघ्या दोन पावसात पुण्याची दाणादाण उडाली… हाहाकार म्हणावा अशी परिस्थिती पुणेकर गेले चार-सहा दिवस अनुभवताहेत. पुणे शहराला जणू कुणी वालीच नाहीये अशी आज अवस्था आहे. त्यामुळे पुणेकरांचे हाल कोण थांबवणार हा प्रश्न कायम आहे. 4 जून 2024 रोजी धानोरी, लोहगाव, वडगाव शेरी परिसरात पाणीच पाणी साचले होते. यानंतर 6 जून 2024 रोजी झालेल्या मुसळधार …

Read More »

विधानसभेत कचका दाखवणार, असं पाडतो की 5 पिढ्या उभ्या राहणार नाही-जरांगेंचा इशारा

Manoj Jarange : बीड जिल्ह्यात खोट्या गोष्टींच्या नावाखाली मराठा समाजाला त्रास देऊ नका. मराठा समाज शांत आहे. नरड्याला लागेपर्यंत अन्याय सहन करू पण आम्ही सतत अन्याय सहन करणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. बीडच्या विविध भागात मतदान केल्यावरून मराठा समाजाच्या लोकांना मारहाण झाली. सरकार या घटनांना खतपाणी घालतेय. यांच्या नेत्यांना पाठीशी घालतेय, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी नाव न …

Read More »

तिसऱ्यांदा पंतप्रधान बनताच मोदी जाणार इटली दौऱ्यावर! कसे असेल नियोजन? जाणून घ्या

PM Modi Foreign Visits: देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले असून पुन्हा मोदी सरकार सत्तेत येताना दिसत आहे. नरेंद्र मोदी हे 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी त्यांच्या परदेश दौऱ्यांवरुन नेहमी चर्चेत असतात. ते विविध देशांना भेट देऊन विविध मार्गाने भारताशी जोडण्याच्या प्रयत्नात दिसतात. त्यामुळे आता  तिसऱ्या टर्ममध्ये मोदी कोणत्या देशांना भेट देणार? याबद्दल उत्सुकता आहे. …

Read More »

NDA च्या बैठकीत नितीश कुमार ‘असं’ काही म्हणाले सर्वांनी वाजवल्या टाळ्या; मोदीही खळखळून हसले

Nitish Kumar Speech: देशात झालेल्या लोकसभा निवडणूकीत एनडीएला बहुमत मिळाले आहे. यानंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी एनडीए नेत्यांची मिटींग घेतली. यावेळी देशातील सर्व एनडीएचे महत्वाचे नेते उपस्थित होते. सर्वांनी पंतप्रधान मोदींना आपला पाठींबा जाहीर केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,  चंद्राबाबू, नितीश कुमार, पवन कल्याण या सर्वांनी भाषणे केली. …

Read More »

सुप्रिया सुळेंना शुभेच्छांसाठी अजित पवारांचा फोन? दादांना काय दिला सल्ला? सांगितलं काय घडलं..

Supriya Sule on Ajit Pawar: बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. अस्तित्वाच्या लढाईत सुप्रिया सुळे यांनी सलग चौथ्यांदा विजय प्राप्त केला.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रिया सुळे या आज बारामती मतदारसंघात दाखल झाल्या आहेत. दौंड तालुक्यातील यवत येथे कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सुप्रिया सुळे यांनी भेटीगाठी घेऊन आभार मानले आहेत. …

Read More »