Space food : अवकाशात चिकन बिर्याणीची पार्टी; अंतराळवीरांसाठी जबरदस्त मेन्यू

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे(DRDO scientists) अत्याधुनिक तंत्रज्ञान बनवण्यात हातखंड आहेच. आता डिफेन्स फूड रिसर्च प्रयोगशाळेने(Defense Food Research Laboratory) प्रयोग राबवून रेडी टू इट पदार्थ(Ready to eat food) तयार केले आहे. हे रेडी टू इट पदार्थ अंतराळात(space) गेलेले अंतराळवीर(Astronaut) देखील खाऊ शकतात. अगदी व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणीही(Veg Biryani and Chicken Biryani) अंतराळात अगदी काही मिनिटात तयार करून खाता येणार आहे. 

अंतराळात पाण्याचा उपयोग करताना अनेकदा अडचणी असतात. मात्र, डीआरडीओच्या फूड रिसर्च लेबोर्डरीने तयार केलेले हे स्पेस फूड एका विशिष्ट प्रकारच्या वॉर्मररमध्ये टाकावे लागता. त्यानंतर ते अगदी काही वेळात खाण्यास योग्य होतात. 
या शिवाय सीमेवर अतिदुर्गम भागात तैनात असलेल्या सैनिकांसाठीही एनर्जी बारसह अनेक पौष्टिक पदार्थही या फूड रिसर्च टीमने तयार केले आहेत. डीआरडीओच्या फूड रीसर्च टीमच्या वैज्ञानिकांनी तयार केलेल्या या रेडी टू इट स्पेस फूड सध्या चांगलेच चर्चेत आहे. 

बिर्यानीसह शाही पनीर, दाल मखनी या सारखे 25 भारतीय खाद्य पदार्थ अंतराळवीरांना खायला मिळणार आहेत. डिफेन्स फूड रिसर्च लेबॉट्रीने(DFRL) इस्रोच्या मागणी नंतर हे स्पेस फूड तयार केले आहेत. इस्रोच्या गगनयान मिशनच्या दृष्टीने ही तयारी आहे.

हेही वाचा :  तुम्हाला अनावश्यक Calls येतात का? हे छोटे काम करा, रिंग वाजण्यापूर्वीच नंबर होईल Block

डीआरडीओ वैज्ञानिकांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान बनवण्यात हातखंड आहेच. आता डिफेन्स फूड रिसर्च लेबोल्ट्रीने अत्याधुनिक प्रयोग राबवून रेडी टू इट पदार्थ तयार केले आहे. हे रेडी टू इट पदार्थ अंतराळात जाणाऱ्या एस्ट्रोनॉट्स सुद्धा खाऊ शकतात. व्हेज बिर्यानी, चिकन बिर्यानी, शाही पनीर, दाल मखनी आणि अगदी वरण- भातही असे 25 प्रकारचे खाद्य पदार्थ DFRL ने स्पेस फूड अंतर्गत तयार केले आहेत.

इस्रोच्या गगनयान मोहिमेत जाणाऱ्या एस्ट्रोनॉटसाठी DFRL ने हे खाद्यपदार्थ space food तयार केले आहे. अंतराळात जाणाऱ्या ऍस्ट्रोनॉट साठी साधारणपणे नासाकडून पुरवण्यात येणारे tortilla and tacos हे खाद्यपदार्थ मिळत होते. 
मात्र, इस्त्रोच्या आगामी अवकाश मोहिमेकरता भारतीय ऍस्ट्रोनॉटसाठी खास हे पदार्थ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे इस्रोच्या एस्ट्रोनॉट्सला घरगुती अन्न खाण्याचा आनंद घेता येईल. त्यामुळे त्यांच्या मनोधैर्यही वाढेल.

साधारणपणे एक वर्ष टिकतील असे हे सर्व स्पेसफूड तयार करण्यात आले आहेत. अंतराळात अगदी काही मिनिटात तयार करून खाता येणार आहे. डीआरडीओच्या फूड रिसर्च लॅबोर्टीने तयार केलेले हे स्पेस फूड एका विशिष्ट प्रकारच्या वॉर्मरमध्ये टाकावे लागेल. त्यानंतर ते अगदी काही वेळात खाण्यास योग्य होईल. 

हेही वाचा :  'पती मोदी-मोदी करत असेल तर जेवायला देऊ नका'; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला

हे पदार्थ बनविताना वैज्ञानिक प्रक्रियेचा उपयोग करण्यात आलेला आहे. या थर्मल प्रोसेसिंग करण्यात येते आणि अन्नपदार्थातील सर्व द्रव्य शोषून घेण्यात येते. यासाठी पदार्थांवर 114 व 118 अंश सेल्सिअस तापमानवर प्रक्रिया करण्यात येते. ज्या एन्झाइम्समुळे अन्नपदार्थ खराब होऊ शकतात. त्यांना या प्रक्रियेत संपवण्यात येते. याला रिटॉर्ट तंत्रज्ञान असे म्हणतात. या तंत्रज्ञानाचा वापर करूनच डीआरडीओने वेज आणि नॉनव्हेज बिर्याणी आणि वरण भात आणि इतर खाद्य पदार्थ तयार केले आहे.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ब्लॅक डॉटचं रहस्य काय? समजल्यावर आयफोन युजर्सदेखील होतील हैराण

iPhone Black Dark: आयफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. काहीजण टिकाऊ म्हणून आयफोन वापरतात तर …

विमानात असते ‘ही’ सिक्रेट रुम; शोधूनही सापडणार नाही अशा ठिकाणी असते ही खोली

Aeroplane secret room : विमानानं प्रवास करत असताना तिकीट काढण्यापासून संपूर्ण प्रवास आणि त्यानंतर अगदी …