प्रशासनाकडून तलाठी भरती 2023 ची निवड यादी जाहीर 

महसूल विभागाकडून तलाठी भरती 2023 ची जिल्हानिहाय निवड यादी जाहीर करण्यात आलीये. सोबतच प्रतिक्षा यादीही जाहीर केली गेलीये. गेल्या काही दिवसांपासून उमेदवार हे या यादीच्या प्रतिक्षेत होते. ही भरती प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच मोठ्या वादात सापडली होती. मात्र, आता प्रशासनाकडून तलाठी भरती 2023 ची निवड यादी जाहीर करण्यात आलीये.

विशेष बाब म्हणजे जिल्हा प्रतिक्षा यादी जाहिर करण्यात आलीये. यामध्ये 1 रायगड, 2 रत्नागिरी, 3 सिंधुदुर्ग, 4 मुंबई शहर, 5 मुंबई उपनगर, 6 सातारा, 7 सांगली, 8 सोलापूर, 9 कोल्हापूर, 10 अकोला, 11 बुलढाणा, 12 वाशिम, 13 परभणी, 15 लातूर, 16 जालना, 17 वर्धा, 18 नागपूर, 19 गोंदिया, 20 भंडारा, 21 छ. संभाजी नगर, 22 धाराशिव, 23 हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्दीनंतर उमेदवाराची ओळख, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. फक्त हेच नाही तर वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही उमेदवारांची केली जाणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची नक्कीच आहे.

ही अंतिम नियुक्तीपुर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करण्यात येईल, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे. आता यादीमध्ये नाव आलेल्या उमेदवारांना कागदपत्रांच्या कामाला लागावे लागणार आहे. कागदपत्रांची पडताळणी ही अत्यंत आवश्यक नक्कीच आहे.

हेही वाचा :  महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. पुणे येथे भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

ही तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 च्या कालावधीत घेण्यात आली. विशेष म्हणजे तीन टप्प्यात ही भरती प्रक्रिया पार पडली. या भरती प्रक्रियेसाठी तब्बल 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी अर्ज ही केली होती. त्यापैकी जवळपास 9 लाखांच्या आसपास उमेदवारांनी ही भरती प्रक्रिया दिली होती. टीसीएस कंपनीकडूनला या भरती प्रक्रियेसाठी काम देण्यात आले होते.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीय सैन्य दलात खेळाडू पदांसाठी मोठी भरती ; 10वी उत्तीर्णांना संधी

Indian Army Sports Quota Recruitment 2024 भारतीय सैन्य दलात खेळाडू पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची …

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमार्फत 4,494 जागांसाठी जम्बो भरती जाहीर

MahaTransco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार …