पुण्यनगरी की ड्रग्जची फॅक्टरी? दोन तरुणी ड्रग्स घेतानाचा नवा व्हिडिओ व्हायरल…

Pune Drugs : पुण्यात एका हॉटेलमध्ये काही तरुण ड्रग्स घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर एकच खळबळ उडालीय. हे प्रकरण ताजं असतानाच आता दोन तरुणी ड्रग्स (Drugs) घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत दोन तरुणी मोबाईलवर अंमली पदार्थांची पावडर टाकून सेवन करताना दिसत आहेत. पुणे-नगर रस्त्यावरच्या मॉलमधला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ असला तरी तो आज समोर आला आहे. 

पुण्यातल्या तरुणाईला ड्रग्सचा विळखा?
पुण्यातील एका पबच्या वॉशरूम मध्ये तरुण अमली पदार्थांचं सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. अमली पदार्थांच्या घटना वारंवार समोर येत असल्याने पुणे उडता पुणे झाले की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. नियमांचं उल्लंघन करत पहाटेपर्यंत चालणारे पब्ज आणि बार, व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईचा धांगडधिंगा आणि  पुणे शहराला पडलेला अमली पदार्थांचा विळखा. यामुळे विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आज बदलतेय. 

एका हॉटेलच्या वॉशरूम मध्ये अमली पदार्थांचं सेवन सुरू असल्याचा हा व्हिडिओ पुण्यातील तरुणाई कुठल्या दिशेला चालली आहे हे सांगण्यासाठी पुरेसा आहे.. पुण्यातील एल थ्री बार आणि पब मधील धांगडधिंगा समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केलीय. पबचे मालक आणि कर्मचारी अशा आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आता पार्टीमध्ये ड्रगज् घेणाऱ्या  तरुणांचा शोध पोलीस घेत आहेत. 

हेही वाचा :  India vs Maldives Row: 'आम्हाला धमकावण्याचं लायसन्स...,' चीनमधून परतताच मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा सूर बदलला

पुण्यामध्ये याआधी अमली पदार्थांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. 

– पुण्याच्या ससून रुग्णालयात ड्रग रॅकेट उघडकीस आल होतं.

– ड्रग्स माफिया ललित पाटील आणि संदीप धूनिया यांच्याद्वारे चालवण्यात येणाऱ्या रॅकेट मधून मार्च 2024 मध्ये तब्बल 3 हजार 674 कोटींचे एमडी जप्त करण्यात आलं होतं. 

– पुणे पोलिसांनी कुरकुंभ येथील कारखान्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणलं होतं

– त्याआधी म्हणजे 2023 मध्ये वर्षभरात अमली पदार्थ सेवन, तस्करी यांनी विक्रीचे सुमारे दीडशे पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले गेले आहेत

पोलिसांनी गांजा, कोकेन, चरस, एमडी, मशरूम, कॅथा इडुलीस खत, दोडा पावडर, एमडीएमए, अफिम, ब्राऊन शुगर, एलएसडी पेपर, हॅश ऑईल, ओझीकुश गांजा, बंटा, टॅब निद्राझिप, टॅब निद्रावेट, हेरॉईन आणि मॅस्केलाईन ड्रग्ज अशा अनेक प्रकारचं अमली पदार्थ जप्त केले आहेत



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महिना सुरू होताच सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचा दर जाणून घा!

The Gold Price Today: कमोडिटी बाजारात सोमवारी 1 जुलै रोजीदेखील घट झाल्याचे चित्र आहे. सोनं-चांदीचे …

मुंबईकरांचा प्रवास आता आरामदायी होणार; रेल्वेमंत्र्यांनी लोकलसंदर्भात दिल्या महत्त्वाच्या सूचना

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. लाखो लोक  लोकलमधून प्रवास करतात. दिवसेंदिवस …