नरेंद्र मोदींनी लवकरात लवकर शपथ घ्यावी, नितीश बाबू आणि चंद्रबाबूंना देश ओळखतोच! – संजय राऊत

Sanjay Raut On Devendra Fadanvis : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election 2024) आता एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्याकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात येत आहे. दोन्ही बाजूकडून बैठकीचा धडाका सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता महायुतीला मोठा धक्का बसलाय, असं म्हटलं जातंय. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संपूर्ण प्रकरणावर मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाले संजय राऊत?

राज्याच्या राजकारणात विष पेरण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भाजपने केलं आहे. आज तुम्ही 23 वरून 7 वर आला आहात. विधानसभा कधीही घ्या जनता त्यांना खाली खेचेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यावेळी महाविकास आघाडी 185 जागा जिंकणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. नितिश बाबू आणि चंद्रबाबू यांना देश ओळखतो, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की सरकार टिकणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन योगी आदित्यनाथ यांचा बळी करण्याचा प्रयत्न केला जातोय. योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस हे नक्राश्रू काढत आहेत. केंद्रातील मोदी सरकार टिकणार नाही. त्यांनी लवकरात लवकर शपथ घ्यावी, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा :  Love Story : जवळच्या मित्राच्या पत्नीच्या प्रेमात पडली, तिघांनीही घेतला असा निर्णय...Video Viral

केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकार बनवण्यासाठी येत्या 7 जूनला दावा करणार आहे. एनडीएच्या प्रमुख घटकपक्षांची बैठक आज दिल्लीत पार पडली. त्यात एनडीएचा नेता निवडण्यासाठी 7 जूनला पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड होईल, त्यानंतर सरकार बनवण्यासाठी राष्ट्रपतींकडे दावा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

दरम्यान, सामना अग्रलेखातून राऊतांनी मोदी, शाहा, फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. देशाच्या जनतेने अहंकारी मोदी आणि अमित शाहांना निरोप दिला. एनडीएचे बहुमत हे टेकूवरचे आहे, ते टेकूही डळमळीत आहेत. जनतेनं मोदी, अमित शाहांचा अहंकाराचा गाडा रोखलाय. शिवसेना-राष्ट्रवादी फोडण्याने महाराष्ट्रात एकतर्फी विजय मिळवता येईल या भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला. अजित पवारांनी अनेक मतदारसंघांत धमक्या दिल्या, दहशत केली. फडणवीसांनी अनाजीपंतांचे राजकारण केले. या सगळ्या कारस्थानांचा पराभव महाराष्ट्राने केल्याची टीका राऊतांनी केलीय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Exclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?

योगेश खरे, जळगाव, झी 24 तास : अमळनेर शहर हे या शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी आहे. …

तरुणाला 30 दिवसात 5 वेळा सर्पदंश, मावशीच्या घरी जाऊन लपला तर साप तिथेही पोहोचला

Ajab Gajab : सर्पदंशाच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. विषारी साप चावल्याने मृत्यू झाल्याचंही आपण …