Monsoon In India: ‘रेमल’ चक्रीवादळामुळं मान्सून…; कुठवर पोहोचले मोसमी वारे? IMD कडून महत्त्वाचे Updates

Monsoon In India: मागील काही दिवसांपासून देशभरात अनेक राज्यांमध्ये सातत्यानं तापमानवाढ होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. एकिकडे प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असतानाच दुसरीकडे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहारमध्ये ‘रेमल’ या चक्रीवादळाचे परिणाम भीती वाढवत आहेत. देशातील हवामानात सतत होणाऱ्या या बदलांमुळं आता मान्सूनच्या (Monsoon) प्रतीक्षेत आणखी भर पडते की काय, अशीच चिंता डोकं वर काढताना दिसत आहे. यासंदर्भातील सर्व चिंता आणि प्रश्नांची उत्तरं देत आयएमडी अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागानं काही गोष्टी स्पष्टच सांगितल्या आहेत. 

IMD च्या माहितीनुसार बांगलादेशच्या किनारपट्टी भागासह पश्चिम बंगालला धडकलेल्या रेमल चक्रीवादळाची तीव्रता आता कमी होत असून, हे वादळ ताशी 15 किमी इतक्या वेगानं उत्तरेकडे पुढे सरकत असून, त्याची तीव्रता आता आणखी कमी होत जाणार आहे. इतकंच नव्हे, तर या चक्रीवादळाचं रुपांतर आता कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये होणार आहे. 

देशातील हवामानाची स्थिती सध्या मान्सूनच्या आगमनासाठी पूरक असून, पुढील 5 दिवसांमध्ये मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आयएमडीनं वर्तवली आहे. आंध्र प्रदेशातील गुटूल स्थित हवामानशास्त्र विभागाच्या केंद्राकडून हा अंदाज वर्तवण्यात आला. 

हेही वाचा :  Optical Illusion : 'या' फोटोत लपलेला लुडोतला फासा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनास पूरक वातावरणाची निर्मिती होत असून, पुढच्या पाच दिवसांमध्ये मान्सूनच केरळाच दाखल होणार आहे. याशिवाय हे मोसमी वारे अरबी समुद्रातील दक्षिणेपासून, मालदीवचा उर्वरित भाग आणि कोमोरिन क्षेत्राचं दक्षिण पश्चिम क्षेत्रही व्यापतील. ज्यामुळं केरळच्या काही भागांसह, बंगालच्या उपसागराचा पूर्वोत्तर भाह, देशातील पूर्वोत्तर राज्य आणि लक्षद्वीपमधील काही क्षेत्रांमध्ये मान्सूनच्या दमदार हजेरीची चिन्हं आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘जेलमधून बाहेर येऊ नये यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावलीये, ही हुकूमशाही आहे,’ केजरीवाल यांच्या पत्नीचा संताप

मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक करण्यात आल्यापासून राजधानीमधील राजकारण …

पहिले आईचा गळा घोटला नंतर भावाचा जीव घेतला, एकुलत्या एक लेकीने संपूर्ण कुटुंब संपवलं, कारण एकून पोलिसही हादरले

Crime News In Marathi: रविवारी 23 जून रोजी हरियाणातील यमुना नगर येथे दुपारी एक वाजण्याच्या …