‘मी तर उद्धव ठाकरेंचं सिंहासनही…,’ प्रचारसभेत कंगनाचं जाहीर विधान, म्हणाली ‘तुमची औकात काय?’

LokSabha Election: हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मंडी लोकसभा मतदारसंघासाठी 1 जूनला मतदान होणार आहे. मतदानाची तारीख जवळ येत असल्याने सर्वच उमदेवार प्रचारासाठी जोर लावत आहेत. यादरम्यान भाजपा उमेदवार कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. त्यातच आता कंगनाने विक्रमादित्य (Vikramaditya Singh) यांना जाहीर इशारा दिला आहे. 

कंगनाने विक्रमादित्य यांना जाहीर आव्हान दिलं आहे. “हे लोक मंडीच्या लेकींचा भाव विचारत आहेत. यांनी मंडीच्या मुलींना अपवित्र म्हटलं आहे. मंडीच्या मुलींचा भाव विचारला. पण आता आम्ही मंडीच्या लेकींचा अपमान सहन करणार नाही. मी तर म्हणते डोंगरावरील महिलांमध्ये फार दम असतो. मी तर उद्धव ठाकरेंचं सिंहासनही हलवलं होतं. तुमची काय औकात आहे,” असं कंगना रणौत म्हणाली आहे. 

कंगनाने विक्रमादित्य यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटलं की, “तुम्ही मंडीच्या मुलींचे भाव विचारले. मी तुमची अशी हालत करेन की तुम्ही भाजी मार्केटमधील भाज्यांचे भावही विसरुन जाल. हे कुटुंब कित्येक वर्षांपासून खुर्चाला चिकटून बसलं आहे. या लोकांकडे सत्ता होती, तरीही यांची भूक कमी होत नाही. ही सत्तेची भूकच त्यांनी घेऊन बुडेल. लोकांचा पैसा खाण्यासाठी या लोकांना सत्ता हवी आहे”. 

हेही वाचा :  शिरवळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण ; तीन पोलिसांसह एक होमगार्ड निलंबित | Beating of students of Shirwal Veterinary College A homeguard with three policemen suspended msr 87

पुढे तिने म्हटलं की, “मी पद्मश्री, फिल्ममेकर आहे. मी स्वत: कमवते. पण विक्रमादित्य काही कामाचे नाहीत. ते केवळ आई-वडिलांच्या नावे मतं खातात. यांच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचारी कोणीच नाही”.

कंगना आणि विक्रमादित्य यांच्याच लढत

हिमालच प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार कंगना रणौतचा सामना काँग्रेसच्या विक्रमादित्य यांच्याशी होणार आहे. येथे 1 जूनला मतदान होणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. विक्रमादित्य यांनी कंगनावर टीका करताना गोमांस खाण्यासंबंधी भाष्य केलं होतं. “हिमाचल देवी-देवतांची पवित्र जागा आहे. ही देवभूमी आहे. येथे गोमांसचं सेवन कऱणारे निवडणूक लढत आहेत हा संस्कृतीसाठी चिंतेचा विषय आहे”.

कंगनाने यावर प्रत्युत्तर देताना आपण गोमांस खात नसल्याचं उत्तर दिलं होतं. हे फार निंदनीय आहे. माझ्याविरोधात उगाच अफवा पसरवल्या जात आहेत. मी अनेक वर्षांपासून योग आणि आयुर्वेदचं समर्थन, प्रमोशन करत आहे. आता माझी प्रतिमा मलीन केल्याने अशा रणनितीवर काही परिणाम होणार नाही. मी एक अभिमानी हिंदू आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यांची कोणी दिशाभूल करु शकत नाही असं कंगनाने म्हटलं आहे. 

हेही वाचा :  Sanjay Raut : 'त्यांच्या'वर गद्दारीचा शिक्का बसलाय; कोणताही आमदार, खासदार निवडून येणार नाही - राऊत



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा’, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO

लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन सुरु आहे. दरम्यान अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर एक वेळ अशी …

वहिणीशी समलैंगिक संबंध, आई आणि भावाला संपवलं… ‘त्या’ एका गोष्टीने दुहेरी हत्याकांडाचा झाला उलगडा

23 जून 2024 मध्ये हरियाणातलं आझाद नगर दुहेरी हत्याकांडाने हादरलं. इथल्या एका घरात आई आणि …