माथेरानध्ये गारांचा पाऊस; पर्यटक सुखावले

Matheran Rain : सध्या अनेक पर्यटक माथेरानमध्ये उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटत आहे. माथेरामध्ये गारांचा पाऊस पडला आहे. या पावासामुळे माथेरानमध्ये आलेले पर्यटक सुखावले आहेत. मात्र, या अवकाळी पावसामुळे येथील नागरिकांची मोठी तारांबाळ उडाली. सोमवारी बदलापूरमध्ये देखील गारांचा पाऊस पडला होता. 

राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अशातच आता रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये देखील अवकाळी पाऊस पडला आहे. माथेरान परिसरात अवकाळी पावसाचे धुमशान घातले आहे. जवळपास तासाभर जोरदार पाऊस कोसळला.  पावसाबरोबर गाराही बरसल्या आहेत. माथेरान मध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.  हवामान विभागाने दिलाय रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. 

माथेरान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि थंड हवेचे ठिकाण आहे. हजारो पर्यटक माथेरानला फिरण्यासाठी येतात. धुक्यात हरवलेले हिरवेगार डोंगर पर्यटकांना आकर्षित करतात. पावासामुळे माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. 

रायगड जिल्ह्यात  15 मे पर्यंत पावसाचा यलो अलर्ट  

रायगडच्या उत्तर भागात संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. कर्जत, खालापूर, पेण अलिबाग तालुक्यांमध्ये जोरदार वा-यासह मुसळधार पाऊस बरसला. वा-याबरोबर धुळीचे लोट वाहून जात होते. दोन दिवसांपासून जिल्ह्यात आकाश ढगाळलेलं होतं. सोमवारी संध्याकाळी आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. तर काही ठिकाणी पावसासह गाराही पडल्या. पावसामुळे अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाला. रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने 15 मे पर्यंत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. 

हेही वाचा :  Weather Update : हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर वगळता देशात विचित्र हवामान; पाहा नेमकी परिस्थिती काय

सोमवारी नवी मुंबईतही जोरदार वा-यासह मुसळधार पाऊस बरसला. नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये जोरदार वा-यासह पाऊस पडला. नवी मुंबई शहराला अवकाळी पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तर ऐरोलीतल्या सेक्टर 5 मध्ये जोरदार वा-यामुळे रस्त्यावर झाड कोसळलं. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

खराब पाण्यात आंघोळ करणं तरुणाला भोवलं! नाकाद्वारे शरीरात घुसला मेंदू खाणारा अमीबा अन् नंतर असं काही घडलं….

14 वर्षांच्या मुलाला तलावातील घाणेरड्या पाण्यात आंघोळ करणं जीवावर बेतलं आहे. मुलाचा अमीबामुळे होणाऱ्या संक्रमणाने …

Hathras Stempade: याला म्हणतात अक्कलशून्य! 121 जण ठार झाल्यावरही भक्त म्हणतो, ‘ते विश्वाचे निर्माते, त्यांचा…’

Hathras Stampede: हाथरसमधील चेंगराचेंगरीत 121 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण इतकं होऊनही काही …