ममतांच्या मैदानावर युसूफ पठाण ‘इम्पॅक्ट प्लेयर’, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात दमदार बॅटिंग, ठरला ‘जायन्ट किलर’

Yusuf Pathan Leading In Baharampur : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्व 42 जागांसाठी जेव्हा यादी जाहीर केली तेव्हा सर्वात आश्चर्याचं नाव होतं युसूफ पठाण… तृणमुल काँग्रेसने युसूफ पठाणला उमेदवारी दिली अन् काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर तोफ डागली. बहरामपूरमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पहायला मिळाली. अशातच आता युसूफ पठाण याने बहरामपूरमध्ये मोठा विजय मिळवला आहे. तब्बल 25 वर्ष खासदार राहिलेल्या अधीर रंजन चौधरी यांची विकेट युसूफ पठाणने काढली आहे. 

क्रिकेटपटू युसूफ पठाण पश्चिम बंगालमधील बहरामपूर मतदारसंघावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि भाजप नेते निर्मल कुमार साहा यांच्याकडून निवडणूक लढवत होता. युसूफ पठाणला एकूण 4,08,240 मते मिळाली. युसूफने विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा ५९,३५१ मतांनी पराभव केला आहे. अधीर रंजन चौधरी यांना ३,४८,८८९ मते मिळाली. भाजप नेते निर्मल कुमार साहा जवळपास 3,12,876 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

युसूफ पठाण काय म्हणाला?

मला साथ देणाऱ्या तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो. मी खुश आहे. हा केवळ माझाच नाही तर सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे. विक्रम मोडण्यासाठी बनवले जातात. मी अधीर रंजनचा आदर करतो. मी करत राहीन. तरुणांना करिअर करता यावं यासाठी मी आधी स्पोर्ट्स अकादमी बनवणार आहे. मी उद्योगांसाठीही काम करेन. मी इथं राहून लोकांसाठी काम करणार आहे. माझं कुटुंब असल्याने मीही गुजरातमध्ये असेन. मला बहरामपूरमध्ये नवीन कुटुंब मिळाले आहे. मी दीदींशी (ममता बॅनर्जी) बोललो. ममता दिदी देखील आनंदी आहेत, असं युसूफ पठाणने म्हटलं आहे. 

हेही वाचा :  संजय राऊतांचं ED विरोधात थेट मोदींना पत्र, भ्रष्टाचारी भाजपा नेत्यांचे मुखवटे फाडण्याचा इशारा; म्हणाले…

युसूफ पठाणची क्रिकेटची कारकीर्द

दरम्यान, 41 वर्षीय माजी अष्टपैलू युसूफ पठाणने भारतासाठी 57 एकदिवसीय आणि 22 टी-20 सामने खेळले आहेत. युसूफने एकदिवसीय सामन्यांमध्ये 27 च्या सरासरीने 810 धावा आणि टी-ट्वेंटीमध्ये 146.58 च्या स्ट्राइक रेटने 236 धावा कुटल्या आहेत. आपल्या पावरफुट हिटसाठी प्रसिद्ध असणाऱ्या युसूफची आता राजकीय कारकीर्द कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो ‘राम सेतू’… समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती

Ram Setu high resolution photo : राम सेतू… भारतीयांसाठी कमालीचा जिव्हाळ्याचा विषय आणि संशोधकांसाठी संशोधनाचा …

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …