Loksabha Election 2024 : ‘लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद…’, शब्द तेच पण निमित्त नवं; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट

Loksabha Election 2024 Baramati Constituency : देशातील लोकसभा निवणुकीचा यंदाचा निकाल सत्तास्थापनेची सगळी समीकरणं बदलून गेला असं म्हणणं गैर ठरणार नाही. मतदारांनीही विजय भाजपचा झाला असला तरीही खरी बाजी (INDIA alliance) इंडिया आघाडीनंच मारली अशा प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. किमान शब्दांत यंदाच्या लोकसभा निवडणुकांचा निकाल अनेक ठिकाणी मांडला गेल्याचं पाहायला मिळालं.

महाराष्ट्रात या निवडणुकीला काही मतदारसंघांमध्ये भावनिक किनार असल्याचं पाहायला मिळालं. कुठं वर्षानुवर्षाच्या साथीदारांनी पक्ष सोडून सत्ताधाऱ्यांची वाट धरली, तर कुठे एकाच कुटुंबात राजकारणामुळं राजकीय मतांवरून फूटही पडल्याचं दिसून आलं. ज्या बारामती मतदारसंघातवर संपूर्ण राज्याचं लक्ष होतं, तिथं (Supriya Sule) सुप्रिया सुळे विजयी झाल्या आणि त्यांनी राष्ट्रवादीच्याच (Ajit Pawar) अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना पराभूत केलं. 

निवडणुकीआधी फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर (Baramati Loksabha Constituency) बारामतीतही मोठं सत्ताकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. विश्वासाच्या माणसांनी (Sharad Pawar) शरद पवारांची साथ सोडली, पण, त्यांच्या या ‘संसदरत्न’ लेकिनं जनसामान्यांचा विश्वास जिंकण्यात सातत्य दाखवलं आणि बारामतीचा हक्काचा गड राखला. सुप्रिया सुळे यांच्या या विजयाला काहीशी भावनिक किनार होती आणि त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमधून हे स्पष्ट झालं. 

हेही वाचा :  चांद्रयान 3 नंतर आता इस्रोचं Solar Mission! जाणून घ्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत

बाप बुलंद कहाणी….

लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फारच बोलका फोटो शेअर केला. जिथं त्यांच्या कपाळी विजयाचा गुलाल पाहायला मिळाला. 
‘श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; 
लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!’

असं कॅप्शन लिहित शेअर केलेल्या या फोटोमध्ये वडील शरद पवार, आई, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांचं कुटुंब पाहायला मिळालं. लेकिनं मिळवलेल्या या विजयाचा प्रचंड आनंद पाहायला मिळाला. पण, या आनंदात मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्लचा दिलासा स्पष्टपणे दिसत होता. सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबातील प्रत्येत सदस्यासाठी हा विजय महत्त्वाचा होता आणि यामध्ये त्यांना रोहित पवार यांनीसुद्धा अतिशय मोलाची साथ दिली.   

जिथं आपली माणसं साथ सोडून जात होती, तिथं पक्षासाठी काम करणाऱ्या कैक मंडळींनी मात्र साथ न सोडल्यामुळं या माणसांवर असणारा शरद पवार आणि कुटुंबीयांचा विश्वास आणखी दृढ झाला असणार असं म्हणणं गैर ठरणार नाही. 

हेही वाचा :  Rohit Sharma: रहाणे-पुजाराचं टेस्ट करियर संपलं? रोहित शर्माच्या 'त्या' विधानाने खळबळ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

14 गडी, 11 जागा…! विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार होणार? कुणाच्या आमदारांवर कुणाचा डोळा?

Maharastra Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला होणाऱ्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट …

Exclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?

योगेश खरे, जळगाव, झी 24 तास : अमळनेर शहर हे या शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी आहे. …