‘2022 मध्ये बांबू लावणे गरजेचे होते नाहीतर…’ असं का म्हणाले मुख्यमंत्री?

CM Eknath Shinde Bamboo Planted: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कामांप्रमाणेच वेळोवेळी करत असलेल्या सूचक विधानांसाठीदेखील ओळखले जातात. भाषण करताना ते अशी विधान करतात, ज्यातून त्यांना काहीतरी वेगळंदेखील सांगायचं असतं. शेतीपीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. यात मुख्यमंत्र्यांच्या विधानाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. राज्यात पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे. निवडणुकीच्या काळात तापमान अधिक होतं.आजच्या  बैठकीचा विषय गंभीर होता त्यामुळे मी स्वतः हजर राहिलो आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांचे विषय हाताळण्यासाठी मी नेहमी पुढे असतो.मी गावी जातो आणि शेती सुद्धा करतो. काही लोक म्हणतात की मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात पण वेळेची बचत व्हावं यासाठी मी हेलिकॉप्टरने जातो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  म्हणाले. 

यावेळी त्यांनी बांबूच्या शेतीवर भाष्य केले. बांबूच्या शेतीसाठी सरकारने अनुदान देण्याचे ठरवलेलं आहे. तापमान कमी करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली पाहिजे. 2022 ला बांबू लावला होता तेव्हा लावावा लागला. यावेळी बांबू लावले नसते तर आज ही बैठकीला या ठिकाणी हजर नसतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

हेही वाचा :  संशोधकांचा दावा - रक्तातील घाणेरडं कोलेस्ट्रॉल खेचून सुकवून टाकतील ही पानं, असं करा सेवन

कृषीमुल्य आयोगाच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. राज्यात बांबू लागवडीला जे प्रोत्साहन सरकार कस देत आहे यावर मुख्यमंत्री भाष्य करत होते यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना खाली बसलेल्या आमदाराने, ‘2022 ला बांबू लावला’ असं म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी या वक्तव्याला पुढे नेत अधिकाऱ्याला म्हटलं की, हा आमचा आमदार आहे. ज्याने जुन्या आठवणी सांगितल्या. यावेळी बांबू लावलं नसत तर आजच्या बैठकीला नसतो, असे ते म्हणाले. 

पाहा व्हिडीओ

सर्व प्रकल्प ठप्प झाले होते 

एक विचारधाराची सरकार येणं गरजेचं होतं. मग नंतर भाजपा शिवसेना विचारधारेची नवीन सरकार आलं. या निवडणुकीत कांद्यामुळे आम्हाला थोडा त्रास झाला थोडा मला रडवलं. मराठवाडा विदर्भात सोयाबीन आणि कापूस त्यामुळे थोडा त्रास झाला. या सर्वांसाठी मी प्रावधान केलं होतं परंतु आचारसंहिता लागल्याने त्याचं वाटप करता आलं नाही, असे ते म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत याबाबत चर्चा केलेली आहे. काही भागात विरोधकांनी नॅरेटिव्ह सेट केल्यामुळे आम्हाला नुकसान झालं. संविधान बदलणार हे सांगण्यात आलं. 400पारचा नारा सुद्धा देण्यात आला हे लोकांनी डोक्यात ठेवलं आणि गडबड झाली. शेतकऱ्यांना दुःखी ठेवून कोणी सुखी होणार नाही. त्यामुळे आमचे सरकार शेतकऱ्यांसाठी सर्व काही करत आहे. लवकर केंद्रीय कृषिमंत्री यांची वेळ घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडू, असे विधान तिने केले.

हेही वाचा :  लग्नात तरुणाचा डान्स आवडला नाही, नवरदेवाच्या भावाने वरातीतच... धक्कादायक घटना



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? हा वाद वर्षानुवर्ष सुरु आहे. आता सरकारने …

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही

Seema Adhye, Zee 24 Taas : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे फडणवीस सरकारने आज आपला अर्थसंकल्प …