ही कसली नोकरी? SpaceX मध्ये एलॉन मस्ककडून महिला कर्मचाऱ्यांशी शरीरसंबंध ठेवत मुलं जन्माला घालण्याची मागणी

Elon Musk SpaceX Employee : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या एलॉन मस्क याच्या नावापुढं आता आणखी काही वादग्रस्त गोष्टी मांडल्या जात असून, त्यामुळं जागतिक स्तरावर एकच खळबळ माजली आहे. स्पेस एक्समधील कामाची पद्धत आणि मस्कचे जगावेगळे नियम या साऱ्याचीच चर्चा होत असताना आता वॉल स्ट्रीट जर्नलनं एक हादरवणारा खुलासा केला आहे. मस्कच्या स्पेस एक्समध्ये घडणारा किळसवाणा प्रकार पाहता, ही कसली नोकरी? हाच प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. 

स्पेस एक्समधील महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानुसार एलॉन मस्कनं काही प्रसंगी त्याच्या कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना स्वत:च्या मुलांना जम्न देण्याची विचित्र मागणी केली होती. मस्कविरोधात आवाज उठवणाऱ्या या तीनपैकी दोन महिलांनी त्यानं आपल्याशी अनैतिक संबंध ठेवल्याचा दावा केला. तर, एकिनं या धनाढ्य व्यक्तीनं मस्कनं तिला स्वत:पासून मुलं होण्याविषयीची विचारणा केली होती. ही महिला स्पेस एक्समध्ये इंटर्न म्हणून कामावर रुजू होती. 

सदर इंटर्न महिलेनं ज्यावेळी मस्कची मुलांना जन्म देण्याची मागणी नाकारली तेव्हा मस्कनं त्याचा खरा चेहरा दाखवत तिची पगारवाढ रोखत कामामध्ये त्रुटी दाखवण्यास सुरुवात केली होती असा दावा Wall Street Journal मधील वृत्तामध्ये करण्यात आला. या वृत्तामध्ये विविध टेक्स्ट मेसेज, ईमेलसह इतर कागदपत्रांच्या पुराव्यांसह जवळपास 48 जणांच्या मुलाखतींचे संदर्भही छापण्यात आले होते. यामध्ये या महिलांचे मित्र, कुटुंबीय आणि स्पेस एक्समधील माजी कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. 

हेही वाचा :  Shane Warne च्या मृत्यूनंतर आईनं दिलं भावनीक वक्तव्य, तर मुलाचं ते वाक्य व्हायरल...

 

कथित स्वरुपात स्पेस एक्समधीच एक महिला कर्मचारी संस्थेच्या संचालकपदी असणाऱ्या Gwynne Shotwell च्याही निशाण्यावर होती. तिच्या पतीशी विवाहबाह्य संबंध असल्यामुळं हा रोष ओढावण्यात आला असून, ज्यावेळी हे प्रकरण HR विभागाकडे पोहोचलं तेव्हा या महिला कर्मचाऱ्याला कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या सूचना Gwynne Shotwell नं दिल्या होत्या. 

SpaceX मध्ये कायमच लैंगिक छळ… 

स्पेस एक्समधील वातावरण हे कायमच क्लेशदायक असून, इथं महिला कर्मचाऱ्यांना लैंगिक छळाला सामोरं जावं लागत असल्याचा दावा करणारं वृत्त 2021 मध्येही प्रसिद्ध करण्यात आलं होतं. कंपनीमध्ये वारंवार आपला छळ झाल्याचा दावा अनेक महिला कर्मचाऱ्यांनी केला असून, मस्कच्या या संस्थेविरोधात 2024 च्याच सुरुवातीला एका माजी महिला कर्मचाऱ्याकडून लैंगिक छळ आणि दुजाभावाचे आरोप लावत न्यायायालयापुढंही दाद मागण्यात आली. सध्या  SpaceX  विरोधातील ही सर्व प्रकरणं न्यायप्रविष्ठ असून, कॅलिफोर्नियातील नागरी हक्क संस्थेकडून त्यासंदर्भातील पुढील तपासणी करण्यात येत आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

14 गडी, 11 जागा…! विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार होणार? कुणाच्या आमदारांवर कुणाचा डोळा?

Maharastra Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला होणाऱ्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट …

Exclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?

योगेश खरे, जळगाव, झी 24 तास : अमळनेर शहर हे या शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी आहे. …