स्वप्न बघितले आणि ते सत्यात साकार केले ; IFS अधिकारी गहाना नव्या जेम्सची यशोगाथा !

UPSC IFS Success Story : काहींना आयएएस होण्याचे स्वप्न असते, त्यापैकी काहींना आयएफएस होण्याचे तर कोणाला आयपीएस अशीच एक कथा केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील गहाना नव्या जेम्सची आहे. सीके जेम्स थॉमस यांची मुलगी आहे, जे सेंट थॉमस कॉलेज, पाला येथून हिंदी विभागातील प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे लहानपणापासून तिला अभ्यासाची आवड तर होतीच व पोषक वातावरण देखील होते. गहानाने चावरा पब्लिक स्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतले, तर तिने सेंट मेरी कनिष्ठ महाविद्यालयात मध्ये बारावी पूर्ण केली.

पुढे, तिने पाला येथील अल्फोन्सा कॉलेजमधून इतिहासात बी.ए पदवी मिळवली. त्यानंतर तिने सेंट थॉमस कॉलेजमध्ये राज्यशास्त्रात एम.ए कशिक्षण घेतले. यूजीसी नेट परीक्षेत ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळवल्यानंतर तिने पीएचडी देखील पूर्ण केली. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला तिचे काका, आदरणीय आय.एफ.एस अधिकारी सिबी जॉर्ज यांच्याकडून प्रेरणा घेऊन तिने अभ्यासाला सुरुवात केली. ह्या परीक्षेची तयारी करताना ती ती रोजच्या रोज वर्तमानपत्र वाचत असे. लहानपणापासूनच वृत्तपत्र वाचनाच्या माध्यमातून जोपासलेल्या चालू घडामोडींबद्दल वाचण्याची तिला आवड होती.

यातून तिने युपीएससी परीक्षेचा पाया मजबूत केला. त्यानंतर, तिने दुसऱ्या प्रयत्नात कोणतेही प्रशिक्षण न घेता २०२२मध्ये युपीएससी परीक्षा सहाव्या क्रमांकासह उत्तीर्ण केली.तिचे काका IFS अधिकारी सिबी जॉर्ज यांच्याकडून प्रेरित होऊन तिने आत.ए.एस ऐवजी आय.एफ.एस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :  ध्येयवेड्या स्वप्नांची पूर्ती; यशची भारतीय नौदलात निवड…

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गुडन्यूज ! स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत तब्बल 17, 727 जागांसाठी महाभरती सुरु

SSC CGL Recruitment 2024 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी खुशखबर आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) …

ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असूनही कुणाल पाटील झाला IFS अधिकारी!

UPSC Success Story : ग्रामीण भागातील मुलगा उच्च पदावर जातो तेव्हा अनेकांसाठी ती प्रेरणादायी बाब …