WhatsApp वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे, आता किती खर्च करावा लागेल?

WhatsApp users News In Marathi : सध्या व्हॉट्सअॅप प्रत्येक स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. जगभरातील लोक दररोज व्हॉट्सअॅपवर एकमेकांशी संवाद साधतात. बरेच लोक त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. त्याचा वापर केवळ डेटा शेअर करण्यासाठी केला जात आहे. अनेक वर्षांपासून Google ने वापरकर्त्यांना कोणतेही पैसे न आकारता Google Drive द्वारे त्यांच्या WhatsApp चॅटचा बॅकअप घेण्याची परवानगी दिली आहे. मात्र या वेळेस व्हॉट्सअॅपवर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. 

व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच काही नवीन फीचर्स आणत असते. महत्त्वाचे म्हणजे, व्हॉट्सअॅप हे मोफत वापरणारे अॅप आहे त्यामुळे एकमेकांशी संवाद साधणे सोपे होते. मात्र आता यंदा वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप चॅटचा बॅकअप घेण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. 

दरम्यान व्हॉट्सअॅपने यापूर्वी गुगल ड्राइव्हवर व्हॉट्सअॅप चॅट्सच्या बॅकअपला परवानगी दिली होती. त्यानुसार पहिल्या सहामाहीत वापरकर्त्यांच्या Google ड्राइव्ह स्टोरेज मर्यादांमध्ये चॅट बॅकअप समाविष्ट करणे सुरू होईल. त्याचा परिणाम 15 GB वर अवलंबून आहे. जे वापरकर्ते त्यांच्या चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी Google Drive वर अवलंबून आहेत त्यांना WhatsApp आणि Google One द्वारे अतिरिक्त स्टोरेज खरेदी करण्याचा विचार करावा लागेल.

हेही वाचा :  मरणासन्न अवस्थेतील पत्नीला Ex बरोबर Sex ची परवानगी देण्याचा पतीचा विचार; कारण...

किती पैसे मोजावे लागतील?

व्हॉट्सअॅपच्या नव्या निर्णयामुळे यूजर्सना चॅट बॅकअपसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. यामध्ये, जर तुम्ही Google One आणि Google Drive चे सदस्य असाल तर तुम्हाला मासिक आणि वार्षिक स्वरूपात पैसे द्यावे लागतील. मासिक खर्चांमध्ये नियमित (100GB) £1.59 / $1.99, मानक (200GB) £2.49 / $2.99 ​​आणि प्रीमियम (2TB) £7.99 / $9.99 यांचा समावेश आहे. वार्षिक आधारावर, वापरकर्त्यांना मूलभूत (100GB) योजनेसाठी £15.99 / $19.99, मानक (200GB) योजनेसाठी £24.99 / $29.99 आणि प्रीमियम (2TB) योजनेसाठी £79.99 / $99.99 द्यावे लागतील. भारतात याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

हे सुद्धा वाचा : बँक खातेधारकासाठी महत्त्वाची बातमी, RBI नवा नियम जाणून घ्या

हे फीचर देखील लवकरच येऊ शकते

व्हॉट्सअॅप एका नवीन फीचरवर काम करत असल्याचंही म्हटलं जात आहे. जे वापरकर्त्यांना त्यांचा फोन नंबर न सांगता एकमेकांशी कनेक्ट होऊ देईल. मात्र, हे फिचर कधी येणार याबाबत ठोस माहिती मिळालेली नसून, हे फिचर येण्याची शक्यता मात्र अनिश्चित आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

1.5 टन गाडीला ठोकलं, ट्रकच्या खाली चिरडलं, पण CNG जागचा हलला नाही; बजाजची CNG बाईक किती सुरक्षित?

Bajaj Freedom 125 CNG Bike: बजाज ऑटोने (Bajaj Auto) जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom …

WhatsApp वर तुम्हालाही Meta AI चा लोगो दिसतोय? त्याचं नेमकं करायचं काय? समजून घ्या

Meta ने नुकतंच आपल्या आर्टिफिशियल इंटेलीजेंस सिस्टम Meta AI ची घोषणा केली होती. हे फिचर …