Elon Musk : अब्जाधीश एलॉन मस्क 12 व्यांदा झाला बाबा! बाळाच्या जन्माची बातमी सर्वांपासून लपवली कारण…

स्पेसएक्स आणि टेस्लाचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अब्जाधीश एलॉन मस्क हे कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतात. कधी तो निवडणुकीत ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करून चर्चेत राहतो तर कधी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे…जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत. सध्या एलॉन त्याच्या मुलांमुळे आणि कुटुंबामुळे चर्चेत आला आहे. सर्वात श्रीमंत मस्क हा  12 व्यांदा बाबा झाला आहे. ही बातमी त्याने मीडियापासून लपवून ठेवली होती. खरं तर त्याचा पहिला मुलगा मरण पावला नाही तर आज तो 13 मुलांचा वडील असता. 

 अब्जाधीश एलॉन मस्क 12 व्यांदा झाला बाबा! 

न्यूरोलिंक कंपनीचे मॅनेजर शिवॉन गिलिस यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना एलॉन मस्कने या मुलाला जन्म झाला होता असं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं जातं. मात्र त्यांनी ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती. मात्र आता याचा खुलासा झालाय. 

एलॉन मस्क आणि जिलिस यांना गेल्या 5 वर्षांत 6 मुलं झालीय. त्यांनी ही आनंदाची बातमी जगापासून लपवून ठेवली होती. त्यामुळेच एलॉन मस्कच्या 12व्या मुलाबद्दल कोणालाही माहिती अधिकृत रित्या समोर आलेली नाही. गायक ग्रिम्ससोबतच्या नातेसंबंधातून त्याला तीन मुलं आणि शिवॉन जिलिससोबतच्या नातेसंबंधातून तीन मुलं आहेत. मात्र, बारावं बाळ हे मुलगा आहे की मुलगी हे अद्याप स्पष्ट नाही. एलॉन मस्कच्या जवळच्या सूत्राकडून ही बाब समोर आलीय.

हेही वाचा :  Twitter ला टक्कर देणाऱ्या Mastodon वर असं बनवा अकाउंट, पाहा सोपी ट्रिक्स

ब्लूमबर्गच्या अहवालात एलॉन मस्कच्या 12 व्या मुलाबद्दल उल्लेख करण्यात आलाय.  2020 मध्ये संगीतकार ग्रिम्स हिने इलॉन मस्कच्या एका मुलाला जन्म दिला होता. त्या मुलाबद्दल सर्व काही गुप्त ठेवण्यात आलं होतं. मात्र एलॉन मस्कने त्याच्याबद्दल चरित्रात त्याच्याबद्दल लिहिलंय. 2021 मध्येच इलॉन मस्कला शिवॉनपासून जुळी मुलं झाली आहेत.

एलॉन मस्कबद्दल माहिती देताना कॅनेडियन लेखक जस्टिन विल्सन म्हणाल्यात की, एलॉन मस्कला आधीच्या लग्नापासून 6 मुलं आहेत. त्यांचा पहिला मुलगा, नेवाडा अलेक्झांडर 2002 मध्ये जन्माला आला होता. मात्र 10 आठवड्यांनंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला झेवियर आणि डॅमियन अशी जुळी मुलं झाली. यानंतर त्याला काई, सॅक्सन आणि डॅमियन अशी तीन मुलं झाली.

ट्रान्सजेंडर असलेल्या झेवियर या मुलाने 2022 मध्ये त्याच्या नावातून मस्कचे नाव काढून टाकलं. तो त्याच्या बायोलॉजिकल वडिलांशी संबंध ठेऊ इच्छित नाही असं त्याने सांगितलंय. तर शिवोन जिलिसपासून झालेल्या जुळ्या मुलांची नावं अझर आणि स्ट्रायडर अशी नावं आहेत. मस्क आणि गिलिस यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मोठी बातमी! भाजपाचे शिंदे ठाकरे गटात; अंबादास दानवे म्हणाले, ‘महिनाभरात भाजपाचे किती लोक…’

लोकसभा निवडणूक निकालानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. यादरम्यान …

…मग मला मराठेच का त्रास देत आहेत? मराठा आमदारांना आवाहन करताना जरांगे भावुक

Manoj Jarange Patil Emotional Appeal: मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे मराठा आमदारांना साद घालताना …