‘मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा’, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO

लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन सुरु आहे. दरम्यान अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर एक वेळ अशी होती जेव्हा  लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुड्डा (Deepender Singh Hooda) यांच्यावर संतापले होते. लोकसभा अध्यक्षांनी यावेळी दीपेंद्र हुड्डा यांना फटकारलं. केरळच्या तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) शपथ घेतल्यानंतर आपल्या जागी परतत असताना हा प्रकार घडला. शशी थरुर यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय संविधान’ अशी घोषणा दिली होती. 

नेमकं काय झालं?

अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी संसदेचा सदस्य म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांनी ‘जय संविधान’ची घोषणा दिली. शपथ घेतल्यानंतर शशी थरुर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी हस्तांदोलन केलं. दरम्यान ते आपल्या जागेवर परतत असताना ओम बिर्ला यांनी त्यांना टोकलं. ते म्हणाले की, “संविधानाचीच तर शपथ घेत आहात. ही संविधानाची शपथ आहे”. ओम बिर्ला यानी आक्षेप नोंदवल्यानंतर काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा आपल्या जागी उभे राहिले. तुम्ही यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नव्हतं अशा शब्दांत त्यांनी निषेध नोंदवला. 

यानंतर ओम बिर्ला यांनी दीपेंद्र हुड्डा यांना खडेबोल सुनावले. ‘कशावर आक्षेप घेतला पाहिजे आणि कशावर नाही याचा सल्ला देत जाऊ नका. चला बसा खाली,’ अशा शब्दांत ओम बिर्ला यांनी सुनावलं. 

हेही वाचा :  Pune Bypoll Election : पुण्यात पोटनिडणुकीत धाकधूक वाढली, भाजपला का ठोकावा लागला तळ?

दरम्यान याप्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत नाराजी जाहीर केली आहे. भारताच्या संसदेत ‘जय संविधान’ बोलू शकत नाही का? अशी विचारणा त्यांनी केली आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या आक्षेपावर नाराजी जाहीर करत लिहिलं आहे की, “संसदेत सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी असंसदीय आणि राज्यघटनेच्या विरोधातील घोषणा देण्यापासून थांबवण्यात आलं नाही. पण विरोधी खासदाराला ‘जय संविधान’ बोलण्यापासून रोखण्यात आलं”.

प्रियंका गांधी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी पुढे लिहिलं की, निवडणुकीच्या वेळी समोर आलेला संविधानाचा विरोध आता नव्या स्वरुपात उदयास येत आहे जो आपली राज्यघटना कमकुवत करण्याच्या प्रयत्नात आहे. प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या की, ज्या राज्यघटनेमुळे संसद चालते, ज्या राज्यघटनेने प्रत्येक सदस्य शपथ घेतो, ज्या राज्यघटनेमुळे प्रत्येक नागरिकाला जीव-जंतुची सुरक्षा मिळते, त्याच संविधानाला आता विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी विरोध करणार का? ?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? हा वाद वर्षानुवर्ष सुरु आहे. आता सरकारने …

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही

Seema Adhye, Zee 24 Taas : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे फडणवीस सरकारने आज आपला अर्थसंकल्प …