ताज्या

“ढूंढते रह जाओगे”, संजय राऊतांचा केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींवरून भाजपावर खोचक टोला!

पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तीकर विभागानं छापा टाकल्यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाराष्ट्रातील सरकारला बदनाम करण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत. नुकतीच ईडीकडून नवाब मलिक यांना झालेली अटक आणि त्यानंतर मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तीकर विभागानं टाकलेला छापा …

Read More »

Viral Video: …आणि शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे फोन आगीत फेकले

अनेकांनी शिक्षिकेच्या या कृतीवर टीका करत मोबाईल जाळण्याऐवजी पालकांना परत करायला हवा होता, असे सांगितले. सोशल मीडियावर एका शाळेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला शिक्षिका मोबाईल आगीत फेकताना दिसत आहे. हे मोबाईल विद्यार्थ्यांचे असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ मलेशिया किंवा इंडोनेशियाचा असू शकतो, असे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे, …

Read More »

UP Election Phase 5 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू ; ६९३ उमेदवार रिंगणात

१२ जिल्ह्यांमधील ६१ जागांसाठी मतदान होत आहे ; सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण ८.०२ टक्के मतदान झाले उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज(रविवार) १२ जिल्ह्यांमधील ६१ जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण ८.०२ टक्के मतदान झाले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय कुमार शुक्ला यांनी सांगितले की, मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या …

Read More »

नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल; दिशा सालियनच्या कुटुंबीयांची पोलिसांत तक्रार

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी राणे पिता-पुत्राविरोधा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती, असा दावा गेल्या आठवड्यात नारायण राणेंनी केला होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी राणेंकडून दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप केला …

Read More »

Shani Dev: ३० वर्षांनंतर कुंभ राशीत शनि करेल प्रवेश, ‘या’ राशीच्या लोकांना मिळेल साडेसातीपासून मुक्ती

ज्योतिष शास्त्रानुसार कर्मफळ देणारे शनिदेव २९ एप्रिल रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. Shani Sade Sati: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह संचार करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर होतो. या वर्षी २०२२ मध्ये अनेक मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. २९ एप्रिल रोजी शनिदेव देखील त्यांच्या प्रिय राशी कुंभ राशीत प्रवेश साधणार आहेत. शनि कुंभ राशीत प्रवेश …

Read More »

लिव्हस्पेस रिव्ह्यूज (Livspace Reviews): घर सजवण्यासाठी लिव्हस्पेसची निवड कशासाठी?

सर्वोत्तम कारागीर मिळवण्यापासून ते कारागिरी करून दाखविण्याचे संयोजन करून, डिझाईन आणि अंमलबजावणी करणे याबाबतीत बोलायचं झालं तर, लिव्हस्पेस ही अत्यंत योग्य निवड आहे. अनेक घरमालकांसाठी आपल्या घराचं नूतनीकरण करणं खूप खर्चिक असून एक मोठी गुंतवणूक असते. खरं पाहता, एका संशोधनानुसार, बहुसंख्यभारतीय घरमालक आयुष्यात एकदा किंवा दोनदा घराची सजावट किंवा नूतनीकरण करतात. यामुळेच हा निर्णय फार काळजीपूर्वक आणि सहसा, खूपव्यापक संशोधन …

Read More »

पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा पडली पार; पुरुषांमध्ये कालिदास हिरवे, तर महिलांमध्ये ज्योती गावते प्रथम

३५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेला आज मध्यरात्री रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील फुल मॅराथॉन पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक कालिदास हिरवे, द्वितीय राहुल कुमार पाल आणि तृतीय अनिल कुमार सिंग यांनी मिळविला. तर महिलामध्ये फुल मॅराथॉन प्रथम क्रमांक ज्योती गावते, द्वितीय क्रमांक मनीषा जोशी आणि तृतीय प्रीती लाला यांनी मिळविला …

Read More »

“जेवढा हे केंद्रातून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील..”, आदित्य ठाकरेंनी भाजपावर साधला निशाणा!

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तीकर विभागानं छापेमारी केल्यानंतर त्यावर टीका केली आहे. आज मराठी भाषा दिनानिमित्त राज्यभर वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात आहेत. मुंबईत अशाच एका कार्यक्रमाला शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर बोलताना आदित्य ठाकरे यांनी सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, दुसरीकडे मुंबईत महापालिका …

Read More »

Bank Holidays in March 2022: महाराष्ट्रात मार्चमध्ये बँकांना आठ दिवस सुट्टी; २३ दिवसच होणार व्यवहार, पाहा सुट्ट्यांची यादी

बँकशी संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा, कारण मार्च महिन्यात महाराष्ट्रात आठ दिवस सुट्टी असणार आहे. तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून आम्ही सुट्ट्यांची यादी देत आहोत. नुकतंच आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. संपूर्ण मार्च महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेलं आहे. प्रत्येक …

Read More »

Russia-Ukraine War : “आता तिसरं महायुद्ध टाळायचं असेल, तर…”, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा इशारा; युद्ध गंभीर वळणावर!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तिसऱ्या महायुद्धावरून गंभीर इशारा दिला आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जागतिक स्तरावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. या युद्धात संयुक्त राष्ट्रांशी संबंधित २८ देशंनी युक्रेनला सामरिक मदत करण्याची घोषणा केली आहे. अनेक देशांच्या फौजा युक्रेनच्या मदतीसाठी निघाल्या देखील आहेत. या पार्श्वभूमीवर हे युद्ध अधिक व्यापक होत असताना आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने गंभीर इशारा दिला …

Read More »

पोलीस आयुक्तालयाची बहुमजली इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

अतिशय वेगाने निर्माणकार्यकरूनही उदासीनता अनिल कांबळे नागपूर : अतिशय वेगाने व प्राथमिकता देऊन नव्या पोलीस आयुक्तालयाची भव्य अशी बहुमजली इमारत उभरण्यात आली. परंतु, ही इमारत अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. राज्य पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे सुसज्ज असे पोलीस आयुक्तालय तयार करण्यात आले आहे, हे विशेष.  २६ मार्च २०१८ मध्ये या भव्य पोलीस आयुक्तालयाच्या बहुमजली इमारतीचे मोठय़ा थाटात भूमिपूजन झाले होते. …

Read More »

लक्षणे नसलेल्या रुग्णांची शल्यक्रियेपूर्वी करोना चाचणी

‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनांना हरताळ ! महेश बोकडे नागपूर : करोनेतर रुग्णांमध्ये एकही लक्षणे नसल्यास त्याची करोना चाचणी करू नये, अशा मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारितील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिल्या आहेत. त्यानंतरही राज्यातील वैद्यकीय शिक्षण खात्याच्या रुग्णालयांत रुग्णांची सक्तीने चाचणी केली जात आहे. केंद्र व राज्य शासनाचे कोविड टास्क फोर्स, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेसह इतर सर्वोच्च वैद्यकीय संस्थांकडून …

Read More »

डॉ. भूषण पटवर्धन यांची ‘नॅक’च्या अध्यक्षपदी निवड

पुणे : राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेच्या (नॅक) कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण पटवर्धन यांची निवड करण्यात आली. दीर्घकाळानंतर नॅकच्या अध्यक्षपदी डॉ. पटवर्धन यांच्या रूपाने मराठी व्यक्तीची निवड झाली आहे. प्रा. जगदेशकुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नॅकचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून डॉ. पटवर्धन यांची नॅकच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विद्यापीठ अनुदान …

Read More »

राष्ट्र सेवादलामध्ये आरोपांच्या फैरी

डॉ. गणेश देवी यांच्या कामकाजाविषयी आक्षेप पुणे : ज्येष्ठ भाषातज्ञ आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या कामकाजाविषयी आक्षेप घेण्यात येत असून राष्ट्र सेवा दलाच्या राज्य अध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दरम्यान, संघटनेच्या विस्तारामध्ये शिक्षकांनी सहभागी होणे स्वागतार्ह की निषेधार्ह असा प्रश्न उपस्थित करून डॉ. गणेश देवी यांनी संघटनेच्या घटनेनुसारच कामकाज …

Read More »

मराठीची सद्य:स्थिती काही अल्पचर्चित मुद्दे

भानू काळे  [email protected] ‘मराठी राजभाषा दिन’ हा कवी कुसुमाग्रजांची स्मृतीही जागवतो.. मराठी भाषा मंत्रालयाच्या दारी लक्तरे नेसून उभी असल्याची कल्पना मांडणारा ‘फटका’ त्यांनीच दिला होता, हे खरे; पण म्हणून मराठीचे महावस्त्र टिकवण्याचे प्रयत्न होतच नाहीत असेही नाही! या प्रयत्नांना बळकटी येण्यासाठी त्याच त्या मुद्दय़ांची, त्याच सुरातील चर्चा तोकडी ठरते, याचे भान देणारा लेख. सोबत समाजमाध्यमांमुळे मराठी ओसरत नसून वाढते आहे, …

Read More »

आजचं राशीभविष्य, रविवार, २७ फेब्रुवारी २०२२

मेष:- स्वत:बद्दल नसत्या कल्पना बाळगाल. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ घ्याल. परिस्थिती अनुरूप वागणे ठेवाल. कल्पनाशक्ति योग्य वेळी वापरात आणाल. हुकुमशाहीपणा दूर सारावा. वृषभ:- आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधी मिळेल. न्यायी दृष्टीकोन बाळगाल. नवीन विचार आमलात आणावेत. फार कर्मठपणे वागू नये. परोपकाराने वागाल. मिथुन:- प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. जुनी दुखणी डोके वर काढू शकतात. पारंपरिक कामात यश मिळेल. मनातील चुकीचे …

Read More »

अभिजात : कांदिंस्की आणि मुंटर एक वादळी प्रेमकहाणी!

अरुंधती देवस्थळे  [email protected] म्युनिकमधील इंटरनॅशनल जुगेन्द बिब्लिओथेकच्या तीन महिन्यांच्या फेलोशिपवर असताना काही वेगळी म्युझियम्स पाहायला मिळाली. म्युनिकमध्येच ३२ म्युझिअम्स आहेत. पण मिळणारं मानधन जेमतेम पुरणारं. तेव्हा चाळिशीच्या आतबाहेरल्या आम्हा सगळय़ांच्या जीवनात हॉस्टेलचा गुजरा हुआ जमाना दोबारा आलेला, म्हणून तंगीतसुद्धा मजा असायची. कुठलं म्युझियम कुठल्या दिवशी फुकट पाहता येतं यावर घारीची नजर ठेवून असायचो. असंच मॉस्को युनिव्हर्सिटीतल्या इरिनामुळे म्युनिकहून ट्रेनने दोन …

Read More »

समाजमाध्यमांवर मराठीचा बहर

मुक्ता चैतन्य भारतात इंग्रजी भाषा वापरणाऱ्यांची संख्या लोकसंख्येच्या फक्त १० टक्के इतकी आहे. तर जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक लागतो. अलीकडे आपल्याला मराठी भाषा नामशेष होतेय का/ होईल का.. वगैरे प्रश्न पडू लागले आहेत आणि आता ‘मराठी भाषा संपली’ या गृहीतकावर चर्चा, वाद आणि मांडणी सुरू झालेली आहे. पण त्याचवेळी आभासी जगात जन्माला आलेल्या निरनिराळय़ा व्यासपीठांवर मराठी जोमाने …

Read More »

कलास्वाद : ‘सह्य’जीराव : विजय देशपांडे

प्रा. मं. गो. राजाध्यक्ष rajapost@gmail. com प्रा. नंदा देशपांडे हा माझा जे. जे.मधला सहाध्यायी. निरनिराळय़ा काडय़ापेटय़ांचा संग्रह करणे हा त्याचा आवडता  छंद. एक दिवस त्याने मला सांगितले की, त्याच्या भावाने स्वाक्षऱ्यांचे एक प्रदर्शन दादरच्या बालमोहन शाळेत भरविले आहे व ते पाहण्यासाठी नंदा मला सांगत होता. त्याचा भाऊ विजय हा एअर इंडियात होता व त्याला मोठमोठय़ा लोकांच्या सह्य गोळा करण्याचा छंद …

Read More »

पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा प्रथमच मध्यरात्री आयोजन,ही स्पर्धा देशात रोल मॉडेल ठरेल: सुनील केदार

35 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेला राज्याचे क्रिडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते सुरुवात पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेची जगभरात एक वेगळी ओळख आहे. पण मागील दोन वर्षात करोना महामारीमुळे अनेक निर्बंध आपल्या सर्वांनावर होते. त्याच दरम्यान रुग्ण संख्या कमी झाल्याने, यंदा मॅराथॉन स्पर्धा पहाटे सुरुवात न करता मध्यरात्री स्पर्धा सुरू करण्यात आली असून ही येत्या काळात निश्चित रोल …

Read More »