ताज्या

पोलीस आयुक्तालयाची बहुमजली इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

अतिशय वेगाने निर्माणकार्यकरूनही उदासीनता अनिल कांबळे नागपूर : अतिशय वेगाने व प्राथमिकता देऊन नव्या पोलीस आयुक्तालयाची भव्य अशी बहुमजली इमारत उभरण्यात आली. परंतु, ही इमारत अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. राज्य पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे सुसज्ज असे पोलीस आयुक्तालय तयार करण्यात आले आहे, हे विशेष.  २६ मार्च २०१८ मध्ये या भव्य पोलीस आयुक्तालयाच्या बहुमजली इमारतीचे मोठय़ा थाटात भूमिपूजन झाले होते. …

Read More »

लक्षणे नसलेल्या रुग्णांची शल्यक्रियेपूर्वी करोना चाचणी

‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनांना हरताळ ! महेश बोकडे नागपूर : करोनेतर रुग्णांमध्ये एकही लक्षणे नसल्यास त्याची करोना चाचणी करू नये, अशा मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारितील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिल्या आहेत. त्यानंतरही राज्यातील वैद्यकीय शिक्षण खात्याच्या रुग्णालयांत रुग्णांची सक्तीने चाचणी केली जात आहे. केंद्र व राज्य शासनाचे कोविड टास्क फोर्स, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेसह इतर सर्वोच्च वैद्यकीय संस्थांकडून …

Read More »

डॉ. भूषण पटवर्धन यांची ‘नॅक’च्या अध्यक्षपदी निवड

पुणे : राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेच्या (नॅक) कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण पटवर्धन यांची निवड करण्यात आली. दीर्घकाळानंतर नॅकच्या अध्यक्षपदी डॉ. पटवर्धन यांच्या रूपाने मराठी व्यक्तीची निवड झाली आहे. प्रा. जगदेशकुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नॅकचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून डॉ. पटवर्धन यांची नॅकच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विद्यापीठ अनुदान …

Read More »

राष्ट्र सेवादलामध्ये आरोपांच्या फैरी

डॉ. गणेश देवी यांच्या कामकाजाविषयी आक्षेप पुणे : ज्येष्ठ भाषातज्ञ आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या कामकाजाविषयी आक्षेप घेण्यात येत असून राष्ट्र सेवा दलाच्या राज्य अध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दरम्यान, संघटनेच्या विस्तारामध्ये शिक्षकांनी सहभागी होणे स्वागतार्ह की निषेधार्ह असा प्रश्न उपस्थित करून डॉ. गणेश देवी यांनी संघटनेच्या घटनेनुसारच कामकाज …

Read More »

मराठीची सद्य:स्थिती काही अल्पचर्चित मुद्दे

भानू काळे  [email protected] ‘मराठी राजभाषा दिन’ हा कवी कुसुमाग्रजांची स्मृतीही जागवतो.. मराठी भाषा मंत्रालयाच्या दारी लक्तरे नेसून उभी असल्याची कल्पना मांडणारा ‘फटका’ त्यांनीच दिला होता, हे खरे; पण म्हणून मराठीचे महावस्त्र टिकवण्याचे प्रयत्न होतच नाहीत असेही नाही! या प्रयत्नांना बळकटी येण्यासाठी त्याच त्या मुद्दय़ांची, त्याच सुरातील चर्चा तोकडी ठरते, याचे भान देणारा लेख. सोबत समाजमाध्यमांमुळे मराठी ओसरत नसून वाढते आहे, …

Read More »

आजचं राशीभविष्य, रविवार, २७ फेब्रुवारी २०२२

मेष:- स्वत:बद्दल नसत्या कल्पना बाळगाल. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ घ्याल. परिस्थिती अनुरूप वागणे ठेवाल. कल्पनाशक्ति योग्य वेळी वापरात आणाल. हुकुमशाहीपणा दूर सारावा. वृषभ:- आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधी मिळेल. न्यायी दृष्टीकोन बाळगाल. नवीन विचार आमलात आणावेत. फार कर्मठपणे वागू नये. परोपकाराने वागाल. मिथुन:- प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. जुनी दुखणी डोके वर काढू शकतात. पारंपरिक कामात यश मिळेल. मनातील चुकीचे …

Read More »

अभिजात : कांदिंस्की आणि मुंटर एक वादळी प्रेमकहाणी!

अरुंधती देवस्थळे  [email protected] म्युनिकमधील इंटरनॅशनल जुगेन्द बिब्लिओथेकच्या तीन महिन्यांच्या फेलोशिपवर असताना काही वेगळी म्युझियम्स पाहायला मिळाली. म्युनिकमध्येच ३२ म्युझिअम्स आहेत. पण मिळणारं मानधन जेमतेम पुरणारं. तेव्हा चाळिशीच्या आतबाहेरल्या आम्हा सगळय़ांच्या जीवनात हॉस्टेलचा गुजरा हुआ जमाना दोबारा आलेला, म्हणून तंगीतसुद्धा मजा असायची. कुठलं म्युझियम कुठल्या दिवशी फुकट पाहता येतं यावर घारीची नजर ठेवून असायचो. असंच मॉस्को युनिव्हर्सिटीतल्या इरिनामुळे म्युनिकहून ट्रेनने दोन …

Read More »

समाजमाध्यमांवर मराठीचा बहर

मुक्ता चैतन्य भारतात इंग्रजी भाषा वापरणाऱ्यांची संख्या लोकसंख्येच्या फक्त १० टक्के इतकी आहे. तर जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक लागतो. अलीकडे आपल्याला मराठी भाषा नामशेष होतेय का/ होईल का.. वगैरे प्रश्न पडू लागले आहेत आणि आता ‘मराठी भाषा संपली’ या गृहीतकावर चर्चा, वाद आणि मांडणी सुरू झालेली आहे. पण त्याचवेळी आभासी जगात जन्माला आलेल्या निरनिराळय़ा व्यासपीठांवर मराठी जोमाने …

Read More »

कलास्वाद : ‘सह्य’जीराव : विजय देशपांडे

प्रा. मं. गो. राजाध्यक्ष rajapost@gmail. com प्रा. नंदा देशपांडे हा माझा जे. जे.मधला सहाध्यायी. निरनिराळय़ा काडय़ापेटय़ांचा संग्रह करणे हा त्याचा आवडता  छंद. एक दिवस त्याने मला सांगितले की, त्याच्या भावाने स्वाक्षऱ्यांचे एक प्रदर्शन दादरच्या बालमोहन शाळेत भरविले आहे व ते पाहण्यासाठी नंदा मला सांगत होता. त्याचा भाऊ विजय हा एअर इंडियात होता व त्याला मोठमोठय़ा लोकांच्या सह्य गोळा करण्याचा छंद …

Read More »

पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा प्रथमच मध्यरात्री आयोजन,ही स्पर्धा देशात रोल मॉडेल ठरेल: सुनील केदार

35 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेला राज्याचे क्रिडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते सुरुवात पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेची जगभरात एक वेगळी ओळख आहे. पण मागील दोन वर्षात करोना महामारीमुळे अनेक निर्बंध आपल्या सर्वांनावर होते. त्याच दरम्यान रुग्ण संख्या कमी झाल्याने, यंदा मॅराथॉन स्पर्धा पहाटे सुरुवात न करता मध्यरात्री स्पर्धा सुरू करण्यात आली असून ही येत्या काळात निश्चित रोल …

Read More »

राज्यभरातील शब्दवंतांसाठी यंदाही काव्यजागर; ‘लोकसत्ता’तर्फे ‘कविता मनोमनी’चे आयोजन

‘लोकसत्ता’तर्फे ‘कविता मनोमनी’चे आयोजन पुणे : ‘शब्दांतून जे फुलते ते, शब्दांतून मांडत जावे’ असे सांगणाऱ्या कविवर्य सुधीर मोघे यांनी कविता ही आपली आयुष्यभराची सखी मानली. ‘सखि मंद झाल्या तारका, आता तरी येशील का’ असे म्हणत तिची मनधरणीही केली. कविता हेच जीवन असे मानणाऱ्या मराठी माणसांनी कवितेवरही भरभरून प्रेम केले. ‘मराठी असे आमुची मायबोली, तिला बैसवू वैभवाच्या शिरी’ असे म्हणत, मराठी …

Read More »

महात्मा गांधी

महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताने ‘गांधींविषयी’ या ग्रंथाचे तीन खंड- ‘गांधी : जीवन आणि कार्य’(संपादक : किशोर बेडकिहाळ), ‘गांधी : खुर्द आणि बुद्रुक’(संपादक : रमेश ओझा), ‘गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व’ (संपादक : अशोक चौसाळकर) ‘साधना प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध होत आहेत. या खंडांतील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा लेख. मनुष्यजातीचे दुर्दैव! महात्मा गांधी अमर स्वरूपांत विलीन झाले, त्या वेळीं मी कलकत्त्यास होतो. त्यानिमित्त …

Read More »

युद्धबळींची संख्या १९८; रशियन सैन्य किव्हजवळ, प्रतिकाराचा युक्रेनचा निर्धार

रशियन सैन्य किव्हजवळ, प्रतिकाराचा युक्रेनचा निर्धार रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह, ईशान्येकडील खार्किव्ह आणि दक्षिणेकडील खेरसन या तीन शहरांवर हल्ला करण्यासाठी आक्रमणरेषा निश्चित केल्या असून या तिन्ही शहरांच्या संरक्षणाचा निर्धार युक्रेनने व्यक्त केला. दरम्यान, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत काही सैनिक आणि तीन मुलांसह १९८ जणांचा मृत्यू झाल्याचे युक्रेनच्या आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी सांगितले.  रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या आणखी जवळ पोहोचल्याने शहरातील प्रशासनाने संचारबंदी …

Read More »

पवार कुटुंबाच्या प्रभावामुळेच ‘लवासा’ पूर्ण !; विरोधातील याचिका फेटाळली

विरोधातील याचिका फेटाळली मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रभावामुळेच मुळशी तालुक्यातील लवासा हे ‘हिल स्टेशन’ म्हणून विकसित झाल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने शनिवारी नोंदवले. मात्र प्रकल्पाचे हक्क तिसऱ्या पक्षाला देण्यात आलेले आहेत आणि प्रकल्पाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यास खूपच विलंब झाला आहे, असे स्पष्ट करून न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेपास नकार दिला. खासगी ‘हिल स्टेशन’ म्हणून लवासा …

Read More »

कथानियमांना नवी बगल देणाऱ्या कथा

मेघना भुस्कुटे [email protected] मराठी भावविश्वात शारीरिक जाणिवांबद्दल बोलण्याची प्रथा नाही. त्याबद्दल बोलायचं असलंच, तर ते ‘कामजीवन’, ‘ऋतुस्राव’, ‘पौगंडावस्था’, ‘वीर्यनाश’ इत्यादी संस्कृतोद्भव जीवशास्त्रीय संज्ञांमधून तरी बोललं जातं, वा ‘हुरहुर’, ‘चाहूल’, ‘अस्फुट’, ‘उत्कट’ या धाटणीच्या झिरझिरीत वस्त्रांसारख्या साजूक  पडद्याआडून तरी. या नियमांना असलेले अपवाद नियम सिद्ध करणारेच आहेत. पंकज भोसले यांच्या ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’ या कथासंग्रहातल्या कथा या आणि इतरही अनेक नियमांना भलताच …

Read More »

दखल : मुलांसाठी आरोग्यमंत्र

‘नोट्स फॉर हेल्दी किड्स’ हे ऋजुता दिवेकर यांचे पुस्तक प्रा. रेखा दिवेकर यांनी अनुवादित केले आहे. नव्या आहार व जीवनशैलीचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. सतत बाहेरचं खाणं, घरातल्या जेवणाला नाकं मुरडणं, बैठी जीवनशैली यामुळे मुलांचे आरोग्य बिघडत चाललं आहे. अशा परिस्थितीत ‘नोट्स फॉर हेल्दी किड्स’ हे पुस्तक पालकांना मोलाचं मार्गदर्शन करणारं आहे. ऋजुता दिवेकर याचं आहारवैशिष्टय़ म्हणजे …

Read More »

काळी माती, निळं पाणी..

मेघना जोशी [email protected] ‘‘तेच ते नको सांगू मला परत परत..’’ कान्हा आईच्या अंगावर वस्सकन् ओरडला. तसा आईचा चेहरा पडलाच. पण कान्हा म्हणत होता तेही बरोबरच होतं. कान्हा आणि त्याची बहीण बकुळ.. खूप शहाणी आणि हुशार मुलं होती. पण हल्ली ती दोघंही फारसं कुणाच्यात मिसळायला कबूल नसत. त्याचं कारण आईला चांगलंच माहीत होतं. त्याचं कारण होतं त्यांचा रंग. ते गोरे नव्हते …

Read More »

मराठीचा अभिजात दर्जा गुजरातीने रोखला?; दर्जाप्रक्रियाच मोडीत काढण्याचा केंद्राचा विचार

दर्जाप्रक्रियाच मोडीत काढण्याचा केंद्राचा विचार मुंबई : पुढील मराठी भाषादिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा दरवर्षी मराठी भाषादिनी राज्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असली तरी मराठी भाषेला दर्जा मिळण्यात गुजराती भाषेचा अडसर ठरत असल्यानेच केंद्राकडून हात आखडता घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. भाषांची ही कटकट लक्षात घेता अभिजात भाषेच्या दर्जाची प्रक्रियाच मोडीत काढण्याचा विचार केंद्राच्या पातळीवर सुरू …

Read More »

डोंबिवली : कुऱ्हाड-कोयत्याचा धाक दाखवत अंत्यसंस्कार रोखला, नातेवाईकांना जबर मारहाणीचा धक्कादायक प्रकार

डोंबिवलीत अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत पार्थिव घेऊन गेलेल्या नातेवाईकाला कुऱ्हाड-कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केल्याची आणि अंत्यविधी रोखल्याची धक्कादायक घटना घडली. डोंबिवलीत अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत पार्थिव घेऊन गेलेल्या नातेवाईकाला कुऱ्हाड-कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केल्याची आणि अंत्यविधी रोखल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना डोंबिवली जवळील घारीवली गावात घडली. याप्रकरणी पाच आरोपींविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुनाथ पाटील, बाळकृष्ण पाटील, सुनील पाटील, …

Read More »

VIDEO : मिशीवाला माही..! IPL 2022पूर्वी महेंद्रसिंह धोनीचा ‘रावडी’ लूक झाला व्हायरल

भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी अजूनही आयपीएलमधील आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. आयपीएल २०२२पूर्वी त्याचा नवा लूक व्हायरल झाला आहे. यामध्ये तो मिशीमध्ये दिसत आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली ४ वेळा चेन्नई सुपर किंग्जला लीगचे विजेतेपद मिळवून दिले आहे. चेन्नईचा संघ या स्पर्धेचा गतविजेता देखील आहे. यंदाचा आयपीएल हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे. यावेळी एकूण १० संघ उतरणार आहेत. २९ मे …

Read More »