राज्यभरातील शब्दवंतांसाठी यंदाही काव्यजागर; ‘लोकसत्ता’तर्फे ‘कविता मनोमनी’चे आयोजन


‘लोकसत्ता’तर्फे ‘कविता मनोमनी’चे आयोजन

पुणे : ‘शब्दांतून जे फुलते ते, शब्दांतून मांडत जावे’ असे सांगणाऱ्या कविवर्य सुधीर मोघे यांनी कविता ही आपली आयुष्यभराची सखी मानली. ‘सखि मंद झाल्या तारका, आता तरी येशील का’ असे म्हणत तिची मनधरणीही केली. कविता हेच जीवन असे मानणाऱ्या मराठी माणसांनी कवितेवरही भरभरून प्रेम केले. ‘मराठी असे आमुची मायबोली, तिला बैसवू वैभवाच्या शिरी’ असे म्हणत, मराठी भाषेवरचे प्रेम व्यक्त करणाऱ्या मराठी जनांसाठी ‘लोकसत्ता’ने यंदाही ‘कविता मनोमनी’ हा उपक्रम आयोजित केला आहे.

समाजातील अनेक घडामोडी अनेकदा अस्वस्थ करून सोडतात. राजकारणातील अनेक घटनाही अंतर्मनाला क्लेश देतात. आपण आपले भवताल किती भावनाशील होऊन पाहतो आणि त्याचा आपल्या जगण्यावर किती परिणाम होतो, याचे दर्शन साहित्यातील विविध प्रकारांमध्ये फार मोठय़ा प्रमाणात घडताना दिसत नाही, अशी तक्रार सातत्याने केली जाते. विचाराचे हे सूत्र लक्षात घेऊन ‘कविता मनोमनी’ या उपक्रमांत या वर्षी सामाजिक आणि राजकीय या विषयांवरीलच कविता पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कविता स्वत:चीच असावी, अशी स्वाभाविक अट आहे. तसेच सहभागी होणाऱ्यांनी आधी प्रसिद्ध झालेली कविता पाठवू नये, अशी सूचना आहे. या कवितांची निवड मराठीतील नामांकित कवींच्या मंडळाकडून होणार असून निवडक कविता ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

हेही वाचा :  UGC कडून विद्यार्थ्यांना मोठी भेट; JRF, SRF सह अनेक शिष्यवृत्तींच्या रकमेत भरभरून वाढ

कवींना आवाहन..

ज्येष्ठ कवयित्री शान्ता शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मागील वर्षी या उपक्रमाचा प्रारंभ झाला होता. यंदा दुसऱ्या वर्षी कवितांचा जागर करण्यासाठी महाराष्ट्रातील कवींना त्यांच्या कविता पाठवण्याचे आग्रहाचे आवाहन करण्यात येत आहे. शब्दवंतांना आपले समाजभान कवितेच्या माध्यमातून व्यक्त करायचे आहे.

कुठे पाठवाल

कविता केवळ ई-मेलद्वारेच पाठवायच्या असून त्या,

‘ksatta. KavitaManomani @gmail.com    या मेल पत्त्यावरच पाठवाव्यात.

प्रायोजक..

’प्रस्तुती :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

’सहप्रायोजक :  ठाणे जनता

सहकारी बँक लि. ’पॉवर्ड बाय : नेटभेट

’हेल्थ पार्टनर :  ब्रह्मविद्या साधक संघ

The post राज्यभरातील शब्दवंतांसाठी यंदाही काव्यजागर; ‘लोकसत्ता’तर्फे ‘कविता मनोमनी’चे आयोजन appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं….

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला …

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …