ताज्या

राज ठाकरेंनी केली राज्यपालांची नक्कल; म्हणाले, “..तेव्हा असं वाटलं राज्यपाल लगेच माझा हातच बघायला लागतील”!

राज ठाकरे म्हणतात, “रामदास स्वामींनी शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय ते माझ्या घरात लावलंय मी”! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या विधानांवर मोठा वाद निर्माण झाला होता. यासंदर्भात बरेच आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांवर त्यांच्या शैलीत खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या विधानावरून राज ठाकरेंनी राज्यपालांना …

Read More »

लग्नात नववधुच्या प्रियकराची Entry, अखेर रक्ताने माखलेल्या शर्टातच घ्यावी लागली Exit

मुंबई : सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित भरपूर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. जे खूपच मनोरंजक असतात. हे व्हिडीओ कधी लग्नातील त्या महत्वाच्या क्षणांचे असतात. तर काही व्हिडीओ लग्नातील मजा मस्करीचे असतात. नेटकऱ्यांना हे लग्नातील व्हिडीओ पाहायला फार आवडतात. परंतु आता त्यापैकी एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसू तर येईल, मात्र तुम्हाला दया देखील येईल. हा एका लग्नातील …

Read More »

राज्यपाल म्हणजे कुडमुड्या ज्योतिषासारखे, राज ठाकरे यांनी केली नक्कल

पुणे :  मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे शिवसेनेमधून बाहेर पडल्यावर 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.आज या पक्षाला 15 वर्ष पूर्ण होऊन आज 16 व्या वर्षात पदार्पण करीत आहे . दरवर्षी मुंबईत होणारा,वर्धापन यंदा प्रथमच पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच इथं पार पडला.  आज आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला 16 वर्ष पूर्ण होत आहेत याबद्दल शुभेच्छा …

Read More »

कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळले ५ अर्भक, नागपुरात खळबळ, तपास सुरु

नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्वेटा कॉलनीतील केटी वाईन शॉपजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाच नवजात अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना आज बुधवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती. या परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या केटी वाईन शॉपच्या बाजुला कचऱ्याचा ढिगारा आहे. …

Read More »

CID मधील दयाचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, चित्रपटाचे नावही ठरलं

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणजे ‘सीआयडी.’ या मालिकेने लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत अनेकांची मने जिकंली होती. मालिकेतील एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेड्री, डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्रे घराघरात पोहोचली होती. २०१८मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र अजूनही या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. या मालिकेतील दया हा लवकरच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. …

Read More »

मोठी बातमी! राजीव गांधी हत्याकांडातील आरोपीला जामीन, 31 वर्षाने तुरुंगाबाहेर

तामिळनाडू : राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येतील आरोपी पेरारिवलनची (Perarivalan) जामिनावर (Bail) सुटका करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court हे आदेश दिले आहेत. पेरारिवलन 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे, या काळात त्याची वागणूक चांगली आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.   पेरारिवलनच्या सुटकेचा निर्णय घेण्यास सरकारकडून होत असलेल्या विलंबामुळे त्याला कायमचं तुरुंगात ठेवता येणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेची टीआरपीमध्ये घसरण, ‘ही’ मालिका ठरली अव्वल

हिंदी मालिका विश्वात खळबळ माजवणारी टीआरपी रेटिंग समोर आली आहे. या आठवड्यात प्रेक्षकांनी त्यांना काय आवडतंय आणि काय नाही हे सांगितले. या रेटिंग्स पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण मालिका विश्वातील लोकप्रिय मालिका टीआरपी रेटिंगमध्ये मागे पडली आहे. ओरमॅक्स मीडियाने या आठवड्याची पॉवर रेटिंग जाहीर केली आहे. तर जाणून घेऊया या आठवड्यात कोणत्या हिंदी मालिका ठरल्या इतरांसाठी वरचढ आणि कोणत्या …

Read More »

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नाना पटोलेंचं भाजपावर टीकास्त्र; म्हणाले, “राज्यपालांनी आता तरी…!”

विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत अनेक कारणांमुळे या दोन्ही घटनात्मक संस्थांमध्ये वाद झाले असून त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि अद्याप तोडगा न निघालेला वाद म्हणजे राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती. राज्य सरकारने पाठवलेल्या यादीवर अद्याप राज्यपालांनी …

Read More »

Russia ukraine युद्धाचा थेट तुमच्या खिशावर काय होणार परिणाम, पाहा काय-काय महागणार

Russia ukraine war Impact : युद्धाचा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत असतो. युद्धामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे जगाच्या विकसित अर्थव्यवस्थेच्या शर्यतीत हे देश मागे पडले. रशिया-युक्रेनमधील युद्धाचाही असाच परिणाम आहे. २४ फेब्रुवारीपासून सुरू झालेले युक्रेन-रशिया युद्ध अजूनही सुरूच आहे. या लढ्याचा परिणाम केवळ या दोन देशांवरच नाही तर जगभर दिसून येईल. महागाई वाढेल आणि अनेक गोष्टी सर्वसामान्यांच्या …

Read More »

युद्धजन्य परिस्थिती, तेलटंचाई आणि महागाईच्या काळात MEIL भारतीय कंपनीची उल्लेखनीय कामगिरी

मुंबई : गोदावरी जिल्ह्याच्या पश्चिम आणि पुर्व  भागातील ओएनजीसी (ONGC) मार्फत तेलासाठी विहीरी खणल्या जात आहेत. सध्याच्या काळात महागलेल्या इंधनदराच्या काळात तर भारतीय भूमीत तेल मिळवणं आणि त्याचं उत्पादन वाढवणं या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत.  अशा परिस्थितीत मेघा इंजीनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) ने स्वदेशी अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारीत ‘ऑईल ड्रिलिंग रिग’ आंध्रप्रदेशातील भीमावरम इथं नुकतीच ओएनजीसीकडे सुपुर्द केली.  या …

Read More »

काका गेल्यानंतर काकूलाच त्यानं बायको केलं, पण त्याला ही बायको ‘पचली’ नाही कारण…

मुंबई : लग्न ही प्रत्येक नवराबायकोसाठी खुप महत्वाची गोष्ट असते. कारण यानंतर त्यांचं आयुष्य संपूर्ण बदलतं. परंतु उदपूरमधून एक असं प्रकरण समोर आलंय, ज्यामध्ये या लोकांनी नात्याचा खेळ करुन टाकला. येथे एका तरुणाने आपल्याच काकांच्या मृत्यूनंतर आपल्या काकीसोबत संसार थाटला. परंतु नंतर त्याने आपल्या काकीची म्हणजेच आपल्या बायकोची देखील हत्या केली आणि तेथून पळ काढला. ज्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक …

Read More »

शशी थरुर यांना अमित शाहांचा फोन, थरुर म्हणाले “मी तर आश्चर्यचकित झालो…”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी थेट फोन कॉल करुन शुभेच्छा दिल्यामुळे शशी थरुर यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. काँग्रेसचे नेते तथा खासदार शशी थरुर नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. एक राजकारणी तसेच मोठा व्यासंग असणारा लेखक म्हणूनदेखील त्यांच्याकडे पाहिले जाते. आज त्यांचा वाढदिवस असून यानिमित्ताने संपूर्ण भारतातून त्यांना शुभेच्छा संदेश येत आहेत. मात्र विरोधी विचारधारा असणारे भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

सामुद्रिक शास्त्र: पायावर तीळ असणं मानलं जातं शुभ; गुडघ्यावर तीळ असणाऱ्यांचा असतो शांत स्वभाव, तर टाचेवर…

ज्योतिष शास्त्रात ज्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये उपस्थित असलेल्या ग्रहांचे विश्लेषण करून, त्याचे भविष्य आणि स्वभाव सांगितले जाते. त्याचप्रमाणे सामद्रिकशास्त्रात मानवी शरीरावर उपस्थित असलेल्या अवयवांच्या रचनेच्या आधारे भविष्य आणि व्यक्तिमत्त्व सांगितले जाते. आज आपण पायावरील तीळाबद्दल बोलणार आहोत. सामुद्रिक शास्त्रानुसार, पायावर असलेले तीळ माणसाच्या आयुष्याशी संबंधित रहस्येही उघड करतात. अनेकदा पायवरील तीळ प्रवासाशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं. पण पायावर तीळ म्हणजे …

Read More »

दोन शत्रू ग्रहांच्या युतीमुळे युद्धस्थिती! काय सांगते ज्योतिषशास्त्र आणि कोणत्या राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदल करतो किंवा दुसऱ्या ग्रहासोबत युती होते, तेव्हा त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो. मंगळ ग्रहाने २६ फेब्रुवारी रोजी मकर राशीत प्रवेश केला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदल करतो किंवा दुसऱ्या ग्रहासोबत युती होते, तेव्हा त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो. मंगळ ग्रहाने २६ फेब्रुवारी रोजी मकर राशीत प्रवेश केला आहे. …

Read More »

रस्त्यावर पेटणाऱ्या या रिफ्लेक्टरमध्ये लाईट कुठून येते? याला वीज कशी मिळते? यामागील कारण रंजक

मुंबई : तुम्ही रात्रीच्या वेळी रस्त्याने प्रवास करतना हे बऱ्याचदा पाहिलं असेल की, रस्त्याच्या कडेला काही दिवे चमकत असतात. काहीवेळा यावर तुमच्या गाड्यांची लाईट पडली की, ते लुकलुकताना दिसतात. तर कधी विना लाईटचे देखील ते तुम्हाला LED सारखे जळताना दिसतात. हा प्रकाश रस्त्यावरील रिफ्लेक्टरमध्ये सतत जळत राहतो. ज्यामुळे वाहनचालकाला रस्त्यावर लाईट नसतानाही या छोट्या दिव्यांच्या मदतीने गाडी चावणे कठीण होते. …

Read More »

“नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा निर्णय दाऊदच्या दबावामुळे बदलला;” चंद्रकांत पाटलांचा दावा

“आम्ही राज्यभर आम्ही लढा उभारू आणि तुमचं जगणं मुश्किल करून टाकू,” असंही पाटील म्हणाले. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मंगळवारी मात्र या आरोप प्रत्यारोपांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं. राज्य सरकारने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. दरम्यान, फडणवीस आणि भाजपाच्या …

Read More »

प्रसिद्ध अभिनेत्यानं १५ वर्षीय रेखा यांना तब्बल ५ मिनिटं जबरदस्तीने केलं किस, अन्…

बायोग्राफी ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’मध्ये या धक्कादायक प्रसंगाचा उल्लेख केला आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. मागच्या बऱ्याच वर्षांपासून त्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. रेखा यांनी आतापर्यंत जवळपास ४०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज रेखा बॉलिवूडमधल्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असल्या तरी त्याच्या करिअरच्या सुरुवातीला मात्र त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. १९६९ साली …

Read More »

भाजपा नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढतेय असं पत्रकारांनी म्हणताच राऊत म्हटले, “मला असं वाटतं की…”

या मोर्चाला ३० ते ४० हजार लोक उपस्थित असतील असा दावा भाजपाने केलाय. महाविकास आघाडीतील सत्तारूढ शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये मंगळवारी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. राज्य सरकारने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या …

Read More »

2022 Lexus NX 350h एसयूव्ही भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य

लेक्सस इंडियाने भारतात 2022 Lexus NX 350h एसयूव्ही कार लाँच केली आहे. या गाडीबाबत कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या एसयूव्हीचे तीन व्हेरियंट आहेत. लेक्सस इंडियाने भारतात 2022 Lexus NX 350h एसयूव्ही कार लाँच केली आहे. या गाडीबाबत कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या एसयूव्हीचे तीन व्हेरियंट आहेत. Exquisite, Luxury, F-Sport असे तीन प्रकार आहेत. लेक्सस Exquisite ची किंमत ६४.९० लाख, Luxury …

Read More »

अवकाळी पावसाच्या तडाख्यात अनेक पिके भुईसपाट, पुढील 2 दिवस गारपिटीसह पाऊस

मुंबई : उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. या अवकाळी पावसात द्राक्षबागा, गहू, हरभरा पिकं भूईसपाट झाली आहेत. तर पुढचे 2 दिवस उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Rain with hail for next 2 days at North Maharashtra, Marathwada) राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक …

Read More »