PoK मध्ये एकत्र आले भारताचे दोन कट्टर वैरी; LOC वर चीनच्या ‘या’ तोफा तैनात

China howitzer gun deployed on LoC: भारताविरोधातील भूमिका घेणारे चीन आणि पाकिस्तान (China – Pakistan) हे दोन्ही देश आता पुन्हा एकदा देशाविरोधात नवी चाल चालताना दिसत असून, त्यांनी लष्करी कारवायांना वेग दिल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चीननं जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथील नियंत्रण रेषेनजीक असणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देताना दिसत आहे. 

चीनकडून LOC वर स्टीलहेड बंकर तयार केले जात असून, ड्रोनची क्षमताही वाढवली असून, लष्करी अधिकाऱ्यांचा हवाला देत ही माहिती मिळाल्याचं वृत्त बिझनेस टुडेनं प्रसिद्ध केलं आहे. नियंत्रण रेषेनदीक भारतविरोधी कारवायांसाठी चीनकडून पाकिस्तानला पुरवण्यात येणारी मदत वाढवण्यात आली असून, सध्याच्या घडीला या भागात एन्क्रिप्टेड संचार टॉवरपासून भूमिगत फायबर केबलचं जाळं टाकण्याचं काम सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. 

पाकिस्तान आणि चीन ही दोन्ही राष्ट्र एकत्र येत भारताविरोधातील कुरापतीं करत असून, कमी आणि मध्यम उंचीवर असणाऱ्या शत्रूचा लक्ष्यभेद करण्यासाठी ‘JY’ आणि ‘HGR’ या चिनी रडार यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहे. ज्या माध्मयातून पाकिस्तानी लष्कराला गोपनीयरित्या मदत मिळत राहणार आहे. 

हेही वाचा :  फ्रिज, दगड कापण्याच्या मशीन अन् सुटकेस... लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने गर्लफ्रेंडचे केले तुकडे

चीनच्या तोफाही तैनात? 

लष्कराशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान आणि चीन ही दोन्ही शत्रू राष्ट्र एकत्र येत नियंत्रण रेषेपाशी तणावाच्या परिस्थिती आणखी भर टाकताना दिसत आहेत. याच कटकारस्थानांचा भाग म्हणून एलओसीवर चीनची 155 मिमी ट्रक माऊंटेड एसएच 15 होविट्झर गन विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानसोबतचं नातं आणखी घट्ट करत शेजारी राष्ट्रासोबत केलेल्या आर्थिक गुंतवणुकीच्या सुरक्षिततेसाठी चीननं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. 

एकिकडे चीनची शस्त्र समीरेषेनजीक तैनात असतानच दुसरीकडे सीमेनजीक असणाऱ्या लष्करी तळांवर चिनी लष्करातील कोणाही वरिष्ठ अधिकाऱ्याची उपस्थिती दिसली नसल्याचंही सूत्रांमार्फत मिळालेल्या माहितीत सांगण्यात आलं आहे. असं असलं तरीही काही गुप्तहेरांच्या माहितीनुसार चिनधील काही अभियंते आणि लष्करातील जवान भूमिगत बंकर तयार करण्याच्या कामाला वेग गेत असून, लीपा खोऱ्यात या बांधकामाचे नमुने आढळले होते. दरम्यान सीमेपलिकडे सुरु असणाऱ्या या सर्व कारवायांमुळं भारतीय लष्कराच्या चिंतेत भर टाकली असून, संभाव्य धोका लक्षात घेता लष्कराकडूनही या भागावर करडी नजर ठेवली जात आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारताने वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात घुसून मारहाण; नांदेडच्या श्रीनगर भागातील घटना

भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना …

Tinder गर्ल गोडीगुलाबीने कॅफेत बोलावायची, नंतर यायचा मॅनेजर; डेटींग अ‍ॅपवरुन ‘अशी’ चालायची फसवणूक

Delhi Tinder Date Fraud: सध्याच्या जगात तरुण-तरुणी एकमेकांना भेटण्यासाठी ऑनलाइन डेटिंग अॅपचा वापर करतात. पण …