जुलै महिन्यात कसा असेल पावसाचा अंदाज; वाचा हवामान विभागाने कुठे दिला इशारा?

Maharashtra Weather Update: जून महिना संपला तरी राज्यात समाधानकारक पाऊस अद्यापही झालेला नाहीये. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसंच, बहुतांश धरणात पाणीसाठाही तळाला गेला आहे. जुलै महिना सुरू झाला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. सोमवारी यलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामुळं जुलै महिन्यात तरी पावसाची स्थिती समाधानकारक असेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. (Maharashtra Rain Alert)

हवामान विभागाने मुंबईसाठी सोमवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, नंतर हवामान विभागाने हा इशारा मागे घेतला आहे. आता यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं मुंबईसह महाराष्ट्रात अधून मधून पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारपासून गुरुवारपर्यंत ग्रीन अलर्ट जारी केला आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पावसाचा मध्यम आणि हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील 24 तासांत ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भातही ढगाळ वातावरण असून नागपूर, वर्धा आणि यवतमाळ मध्येही दमदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

हेही वाचा :  बिपरजॉय चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टी भागात परिणाम, 'अल निनो' सक्रीय झाल्याने तापमान वाढीचा धोका

जून संपला तरी पावसाची प्रतीक्षाच 

सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाटात पावसाने पाठ फिरवल्याने माळशेज घाटातील सर्व धबधबे कोरडे ठाक पडले असून विकेंडला या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे,यंदा जुन महिना संपत आला तरी माळशेज घाटात पाऊसच नसल्याने घाटातील धबधबे प्रवाहितच झाले नसल्याने या ठिकाणी व्यवसाय करणारे व्यावसायिकही अडचणीत सापडले आहेत, पावसाअभावी या परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांची भात लागवड रखडली असून बळीराजा शेतकरी सध्या आभाळाकडे आस लावून बसला आहे. 

महाराष्ट्रात एक टक्का जास्त 

महाराष्ट्रात जूनमध्ये एक टक्का जास्त पाऊस पडला आहे. सर्वसाधारणपणे जूनच्या अखेरीस राज्यात 209.8 मिलीमीटर सरासरी पाऊस अपेक्षित असतो. मात्र, यंदा 211.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्यात कोकण विभागात एक टक्का, मध्य महाराष्ट्रात 10 टक्के आणि मराठवाड्यात 18 टक्के अधिक पाऊस तर विदर्भात 16 टक्के तूट आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

एसआरए योजनेमध्ये मिळालेले घर विकताय? ही अट माहितीये का?

Mumbai SRA Homes: एसआरए योजनांमध्ये (SRA Scheme) मिळालेले घर विकायचे झाल्यास त्यासाठी काही अटी शर्थीदेखील …

RBI च्या निर्देशांनंतर ‘या’ बँकेला रातोरात टाळं; खातेधारकांचे पैसे बुडाले?

RBI Latest updates : देशाच्या आर्थिक व्यवहारांवर नजर छेवत पतधोरण आणि तत्सम महत्त्वाच्या आर्थिक उलाढालींमध्ये …