नितीश कुमारांचा मोदींना 2 शब्दांत सल्ला! NDA च्या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात म्हणाले, ‘जरा..’

Nitish Kumar Two Word Advice To Modi: राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्षांनी बुधवारी नरेंद्र मोदींना एनडीएचे नेते म्हणून निवड केली आहे. संसदीय गटाचे नेते म्हणून मोदींची निवड केलेल्या बैठकीला जनता दल युनायटेडचे नेते तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते. त्याचप्रमाणे तेलगु देसम पार्टीचे नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूही बैठकीला उपस्थित होते. या दोन्ही पक्षांनी त्यांच्या समर्थनाची पत्र यावेळेस दिली.

दोन शब्दांचा सल्ला

नितीश कुमार यांच्याकडून थेट पंतप्रधानपदाची मागणी होईल वगैरे चर्चा असतानाच त्यांनी अशी कोणतीही मागणी न करता मोदींच्या नावाला पाठिंबा दिला.  मात्र मोदींना पाठिंबा देताना नितीश कुमार यांनी अगदी दोन शब्दांमध्ये जेडीयूच्या प्रमुखांनी 2 शब्दांचा सल्ला नरेंद्र मोदींना दिला. पाठिंबा जाहीर केल्यानंतर मोदींना नितीश कुमार यांनी, ‘जल्दी कीजिए’ असा दोन शब्दांचा सल्ला दिला. म्हणजेच लवकरात लवकर सरकार स्थापन करा अशी इच्छा नितीश कुमार यांनी बोलून दाखवली. ‘जरा लवकर’ सत्ता स्थापनेसंदर्भात हलचाली करा असं नितीश यांनी मोदींकडे विनंती केली.

हेही वाचा :  वर्ल्ड कप फायनल 'हायवोल्टेज' होणार का? भारत-पाकिस्तान आमने-सामने येण्याची दाट शक्यता

लवकरात लवकर सरकार स्थापन करा

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, मोदींबरोबर झालेल्या बैठकीमध्ये बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर केंद्रात सरकार का स्थापन केलं पाहिजे आणि त्याची काय आवश्यकता आहे याबद्दल भाष्य केलं. “सरकार स्थापन करण्यात फार उशीर होता कामा नये. आपण लवकरात लवकर सरकार स्थापन केलं पाहिजे,” असं नितीश कुमार म्हणाल्याचं ‘इंडिया टुडे’ने सुत्रांच्या हवाल्याने सांगितलं आहे.

नक्की वाचा >> किर्तीकरांच्या पराभवामागे मुख्यमंत्री? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, ‘शेवटच्या क्षणी शिंदेंनी..’

पुढील एक दोन दिवसात शपथ

पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील एक ते दोन दिवसांमध्ये दिल्लीत मोदींचा शपथविधी पार पडेल असं सांगितलं जात आहे. तातडीने कागदोपत्री पुर्तता केली जाईल. शेवटच्या क्षणी एनडीएच्या आघाडीमधील घटकपक्षांमध्ये मतभेद होऊन एकतेला फटका बसू नये म्हणून वेगाने सूत्र हलतील असं सांगितलं जात आहे.

नक्की वाचा >> मोदी-शाहांपेक्षा महाराष्ट्राचा फडणवीसांवर अधिक राग, त्यांचं नाव काळ्या अक्षरात लिहिलं जाईल, कारण… : राऊत

16 पक्षाच्या 21 नेत्यांची बैठक

बुधवारी 16 वेगवेगळ्या पक्षांचे 21 नेते बुधवारी दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंबरोबरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एलजीपीचे चिराग पासवान, जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी, जन सेनेचे पवन कल्याण, एजीपीचे अतुल बोरा आणि अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. या बैठकीनंतर मोदींनी एनडीए आघाडी उत्तमरित्या काम करेल असा विश्वास व्यक्त केला. “140 कोटी लोकांची सेवा करताना विकसित भारत तयार करण्याचं काम आम्ही करु,” असं मोदी म्हणाले.

हेही वाचा :  अणदूर : श्री खंडोबा भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या भवनला पावसाळयात गळती



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा’, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO

लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन सुरु आहे. दरम्यान अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर एक वेळ अशी …

वहिणीशी समलैंगिक संबंध, आई आणि भावाला संपवलं… ‘त्या’ एका गोष्टीने दुहेरी हत्याकांडाचा झाला उलगडा

23 जून 2024 मध्ये हरियाणातलं आझाद नगर दुहेरी हत्याकांडाने हादरलं. इथल्या एका घरात आई आणि …