Sangli Exit Poll: सांगलीतील वाद महाविकास आघाडीला भोवणार, विशाल पाटील मारणार बाजी

Sangli Exit Poll: लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवताना महाविकास आघाडीमध्ये सांगलीमधील जागेवरुन वाद निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांच्या नावाची परस्पर घोषणा केल्याने काँग्रेसकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान महायुतीने संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. पण आता एक्झिट पोलचे निकाल जाहीर कऱण्यात आले असून यानुसार, विशाल पाटील सांगलीतून आघाडीवर आहेत. 

उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील जाहीर सभेत चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. जागावाटप अंतिम झालेलं नसतानाही उद्धव ठाकरेंनी घोषणा केल्याने महाविकास आघाडीतील मित्रपक्ष नाराज झाले होते. काँग्रेस नेत्यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. नंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत अखेर काँग्रेसनेही चंद्रहार पाटील यांच्या नावाला दुजोरा दिला होता. पण यामुळे विशाल पाटील यांचे समर्थक नाराज झाले होते. सांगलीत पक्षाची ताकद असतानाही माघार घेतल्याने उघड नाराजी जाहीर कऱण्यात आली होती. यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. 

हेही वाचा :  'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'

महाराष्ट्रात काय चित्र असेल?

रिपब्लिक-मॅट्रीज एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात एनडीएला 30 ते 36 जागा मिळू शकतात. तसंच इंडिया आघाडी म्हणजे महाविकास आघाडीला 13 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना एकही जागा मिळणार नाही. 

टीव्ही 9 -पोलस्ट्रॅट

टीव्ही 9 -पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 24 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडी 23 जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे. तर इतरांना 1 जागा मिळेल. 

भाजपाला 18, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही. तर मविआत काँग्रेसला 5, ठाकरे गटाला 14, पवार गटाला  6 जागा मिळतील असं सांगण्यात आलं आहे. 

एबीपी-सी वोटर

एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 24 जागा मिळतील. यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 6, भाजपाला 17, अजित पवारांना 1 जागा असेल. तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना 9, शरद पवारांना 6 आणि काँग्रेसला 8 अशा 23 जागा मिळतील. 1 जागा इतरांना मिळेल 

हेही वाचा :  अल्पमुदतीतील कमी पाण्याची भात शेती

न्यूज 18 – मेगा एक्झिट

न्यूज 18 – मेगा एक्झिट पोलनुसार महायुतीला 32 ते 35 आणि महाविकास आघाडीला 15 ते  18 जागा मिळण्याचा अंदाज आहे. यामध्ये भाजपाला 23, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला 2 जगा मिळतील. दरम्यान महाविकास आघाडीत काँग्रेसला 5, उद्धव ठाकरे गटाला 7 आणि शरद पवार गटाला 4 जागा मिळतील. 

टाइम्स नाऊ-ईटीजी आणि रिपब्लिक

टाइम्स नाऊ-ईटीजीनुसार महायुतीला 26 आणि महाविकास आघाडीला 22 जागा मिळतील. तर रिपब्लिकनुसार महायुती 32 तर महाविकास आघाडी 16 जागांवर विजयी होईल. 

(Disclaimer: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व 7 टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले असून 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. त्याआधी, ZEE 24 Taas ने आपल्या दर्शकांसाठी एक मेगा एक्झिट पोल आणला आहे. या मेगा एक्झिट पोलमध्ये आम्ही देशातील अनेक मोठ्या एजन्सीचे एक्झिट पोल डेटा दाखवणार आहोत. दरम्यान झी 24 तास जी आकडेवारी दाखवेल ती वेगवेगळ्या एजन्सींच्या सर्वेक्षणातून मिळवलेली आकडेवारी आहे. ज्यासाठी ‘झी 24 तास’ जबाबदार नाही. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नाहीत, फक्त एक्झिट पोल आहेत.)

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईकरांचा प्रवास आता आरामदायी होणार; रेल्वेमंत्र्यांनी लोकलसंदर्भात दिल्या महत्त्वाच्या सूचना

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. लाखो लोक  लोकलमधून प्रवास करतात. दिवसेंदिवस …

नव्या कायद्याअंतर्गत दाखल झाला पहिला गुन्हा; नव्या नियमांनुसार पोलिसांनी ‘अशी’ केली FIR

1st FIR in Delhi: देशभरात आजपासून नवा कायदा लागू झाला आहे. ब्रिटीश काळात बनवलेल्या फौजदारी …