Pune Porshce Accident: पुरावे मिटवण्याच्या कटात आईचाही हात? पोलिसांनी केला फोन पण शिवानी अग्रवाल…

Pune Porsche Accident Minor Driver Mother: पुण्यातील पोर्शे अघात प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे होत असतानाच आता या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाची आई शिवानी आग्रवालचीही चौकशी होणार आहे. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांनी पैसे घेऊन रक्ताचे नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे या अल्पवयीन मुलाला कार चालवायला दिल्याप्रकरणी त्याचे वडील विशाल अग्रवालही अटकेत आहे. विशाल अग्रवालचे वडिलांनाही या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. असं असतानाच आता या प्रकरणात या मुलाच्या आईचाही हात आहे का याचा तपास केला जात आहे.

निबंधाच्या मोबदल्यात जामीन अन् गोंधळ

पुण्यामध्ये 19 मे रोजी कल्याणी नगर येथे भरधाव वेगातील पोर्शे कारने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन तरुणांना धडक दिली. यामध्ये या दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणात अल्पवयीन मुलगा कार चालवत होता असं समोर आलं. त्याला ताब्यात घेऊन निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन देण्यात आला होता. मात्र यावरुन पुणेकरांबरोबर राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावामुळे पुन्हा यंत्रणा कामाला लागल्या आणि या मुलाला बालन्याय मंडळाने दिलेला जामीन पोलिसांनी केलेल्या अर्जानंतर रद्द करण्यात आला. सदर प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाललाही संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. या अटकेनंतर रोज नवीन खुलासे समोर येत असतानाच अग्रवाल कुटुंबाने या अपघातानंतर चालकाला गुन्हा आपल्या माथी घेण्यासाठी दबाव आणल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा :  भटक्या कुत्र्याचा उच्चभ्रू सोसायटीला लळा; आमचा 'पतलू' शोधा, 25 हजार मिळवा!

चालकावर दबाव आणण्याचा प्रयत्न

अपघात झाला तेव्हा चालक या अल्पवयीन मुलाच्या बाजूच्या सीटवर बसला होता. विशाल अग्रवालनेच त्याला मुलाला गाडी चालवू दे असे आदेश दिले होते. मुलाने मद्यपान केलेलं असलं तरी त्याला गाडी चालवू दे असं विशाल अग्रवालने चालकाला सांगितलं होतं. मात्र अपघात झाल्यानंतर अपघाताच्या ठिकाणी चालक बदलण्याचा प्रयत्न झाला. तसेच 19 मे रोजी रात्री चालकाला पोलिसांनी सोडून दिल्यानंतर मर्सिडीज गाडीमधून त्याला पोलीस स्टेशनबाहेरुनच अग्रवाल कुटुंबाने उचललं आणि दोष स्वत:च्या माथी घेण्यासाठी चालकाला आर्थिक आमिष दाखवण्यात आल्याचा दावा त्याने पोलीस तपासात केला आहे. आता या प्रकरणामध्ये चालकाला धमकावून पुरावा नष्ट करण्याबरोबरच ससूनमधील डॉक्टरांना पैसे देऊन रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. याच प्रकरणी आता अल्पवयीन मुलाच्या आईचं काय म्हणणं आहे हे पोलिसांना जाणून घ्यायचं आहे.

नक्की वाचा >> Pune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहिती

आईचा सुद्धा सहभाग?

या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाची आई सुद्धा सहभागी आहे का? गुन्हा लपवण्यात तिचाही सहभाग होता का? याचा पोलीस तपास करत आहे. तपासासाठी पोलिसांनी शिवानी अग्रवालला फोन केला होता. मात्र तिचा मोबाईल बंद असून ती नॉट रिचेबल आहे. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :  Madha Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : घराणेशाहीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेला माढा लोकसभा मतदारसंघ; निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील

नक्की वाचा >> Pune Porsche Accident: ‘मी पोलिसांना फोन केला असता..’; दबाव आणल्याच्या आरोपानंतर टिंगरेंनी 19 मे च्या रात्रीचा घटनाक्रमच सांगितला

त्या व्हिडीओमध्ये आलेली समोर

या दुर्घटनेनंतर काही दिवसांनी सोशल मीडियावर एक रॅप साँग व्हायरल झालं होतं. यामध्ये दिसणारा मुलगा हा पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन चालक असल्याचा दावा केला गेला होता. मात्र हा दावा खोटा असल्याचं सांगणारा शिवानी अग्रवालचा व्हिडीओ नंतर समोर आला होता. या व्हिडीओत शिवानी अग्रवाल रडत रडत आपल्या मुलाची पोलिसांनी काळजी घ्यावी असं सांगताना दिसलेली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Hathras Stempade: याला म्हणतात अक्कलशून्य! 121 जण ठार झाल्यावरही भक्त म्हणतो, ‘ते विश्वाचे निर्माते, त्यांचा…’

Hathras Stampede: हाथरसमधील चेंगराचेंगरीत 121 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण इतकं होऊनही काही …

Hathras Stampede: निर्भयाचे आरोपी आणि सीमा हैदरसाठी लढणाऱ्या वकिलाची भोले बाबाकडून नियुक्ती; कोण आहेत एपी सिंह?

Hathras Stampede: हाथरसमधील दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभऱात खळबळ उडाली आहे. शिकंदराराऊ येथे सूरज पाल उर्फ नारायण …