याला म्हणतात बदला! मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजारच्यांचा दारात जाऊन आईने वाजवला ढोल… Video व्हायरल

Viral News : शालेय जीवनात अनेक मुलांना यश-अपयशाचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात. तर काही विद्यार्थी कधी अभ्यास न केल्यानं तर कधी परिस्थितीमुळे नापास होतात. पण कुटुंबियांपेक्षा शेजारपाजारच्यांकडून किंवा नातेवाईकांकडूनच मुलांना अधिक टोमणे सहन करावे लागतात. मुलांना चारचौघात चिडवलं जातं. याचा खोल परिणाम मुलांच्या बाल मनावरही होतो. यामुळे मुलं एकलकोंडी होऊ लागतात. या प्रश्नाशीच जोडलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

काय आहे व्हायरल व्हिडिओत
व्हायरल होणारा हा व्हिडिओ अशाच टोमणे मारणाऱ्या आणि टीका करणाऱ्यांसाठी सणसणीत चपराक लगावणारा आहे. एक मुलगी सलग दोन वर्ष परिक्षेत नापास झाली. पण यानंतरही तीने जिद्द सोडली नाही. तिसऱ्या प्रयत्नात तीने पास होऊन दाखवलं. मुलीच्या यशावर तिच्या आईने अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त करत शेजारच्यांची तोंड बंद केली.

सोशल मीडिया एक्सवर  @jpsin1 नावच्या हँडलवरुन हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडिओबरोबर एक पोस्टही शेअर करण्यात आली आहे. दोन वर्ष परिक्षेत अपयश आल्याने परिसरात राहाणाऱ्या शेजारच्यांकडून मुलीला येता-जाता टोमणे ऐकावे लागत होते. मुलगी दहावीची परिक्षा देत होती. पण तिला दोनवेळा अपयशाचा सामना करावा लागला. दोन वर्ष नापास झाल्याने शेजारी आणि नातेवाईकांकडून मुलगी आणि तिच्या कुटुंबियांवर टीका केली जाऊ लागली. मुलगी कधीच पास होऊ शकत नाही, तिचं पुढे काहीच होणार नाही असं ऐकवलं जाऊ  लागलं

हेही वाचा :  लावा डोकं! सांगा माझी अचूक उंची किती आहे? फोटो शेअर करत मुलीने दिलं नेटकऱ्यांना चॅलेंज

पण मुलगी हिम्मत हरली नाही. तिसऱ्या प्रयत्नात मुलीने दहावीची परीक्षा चांगल्या उत्तीर्ण होऊन दाखवलं. मुलीच्या या यशाने तिची आई आनंदाने भारावून गेली. जे शेजारी टोमणे मारत होते, त्यांच्या घरासमोर जाऊन मुलीच्या आईन ढोल वाजवला आणि टोमणे मारणाऱ्या शेजारच्यांची तोंड बंद केली. पण मुलीला आईचा हा पवित्रा फारसा आवडलेला दिसत नाही. या व्हिडिओत मुलगी आपल्या आईला थांबवताना दिसत आहे. 

सोशल मीडियावर प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत सहा हजार लोकांनी लाईक केलं आहे. तर अनेक युजर्सने प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. एका युजरने म्हटलंय त्या मातेने शेजारच्यांना जशास तसं उत्तर दिलंय. तर एकाने म्हटलंय त्या माऊलीला सॅल्यूट. टोमणे मारणाऱ्या शेजारच्यांना योग्य भाषेत उत्तर दिल्याचं अनेकांनी म्हटलंय.

हेही वाचा :  'शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजपानंतर...' नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांसमोरच सांगितला पुढचा राजकीय प्रवास



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धक्कादायक! पुण्यात सापडले ‘झिका’चे 2 रुग्ण; 15 वर्षीय चिमुकलीचाही समावेश

Zika Virus Cases In Pune: पुण्यामधील एरंडवणामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली …

Maharashtra Weather News : बापरे! ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहणार; राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षी नैऋत्य मान्सून वारे वेळेआधीच देशात आणि राज्यात दाखल झाले. …