पाणी आटल्याने दिसू लागले उजनी धरणात बुडालेले प्राचीन पळसनाथाचे मंदिर; दुष्काळाचे भयान वास्तव!

जावेद मुलाणी, झी 24 तास,  इंदापूर : यंदाचा दुष्काळ किती भीषण आहे याचं वास्तव समोर आले आहे. दुष्काळामुळे उजनीच्या पाण्याखाली असलेलं पळसनाथाचं मंदिर दिसू लागलंय. 1975 साली उजनी धरणाच्या बांधकामानंतर हे हेमाडपंथी मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलं. मात्र यंदा उजनीची पाणीपातळी कमी झाल्यानं हे मंदिर सर्वांच्या नजरेस पडलं आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आहे हे मंदिर

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर पासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर भीमानदीच्या पात्रात 1975 साली जलसमाधी मिळालेले अति प्राचीन हेमाड पंथी पळसनाथाचे मंदिर उजनी धरणातील पाण्याची पातळी खलावल्याने पूर्ण पणे उघडे पडल आहे. या मंदिराचा काळ जरी निश्चित नसला तरी याचे वर्णन ज्ञानेश्वरीच्या 18 व्या अध्यायात “पलाशतीर्थ” म्हणून आढळून येते. या हेमाड पंथी पळसनाथाचे मंदिराचे संपूर्ण कोरीव काम दगडात केले असून शिखर ची साप्तभूमी पद्धतीची बांधणी असून शिखरासाठी पक्क्या विटा चुना इ.वापर करून बांधले आहे. 

असा आहे या प्राचीन मंदिराचा इतिहास

मंदिरा समोर भव्य सभा मंडप गाभारा, उंच शिखर, लाब शिळा विविध मदनिका ,अलासकन्या, सूरसुंदरी, जलामोहिनी, नागकन्या आहे. ज्यावेळी एखदा भक्तगण मंदिरात प्रवेश करतो त्यावेळी त्याने आपल्या मनातील वाईट भावना मंदिरा बाहेरच सोडून निर्मळ मनाने मंदिरात प्रवेश करावा याच उद्देशाने महिलारूपी शिल्पे मंदिराच्या शिखरावर कोरलेली आहेत असे काही इतिहासतज्ञ सांगतात.  मुर्त्या चौकोनी खांब ,वर्तुलाकुर्ती पात्रे, त्यातच पुष्प, नट, स्तंभ, लवा, बेल अशा पंच शाखा सुस्थितीत दिसून येतात अशा शिल्पा मुर्त्यान मध्ये प्रामुख्याने दशावतार ,शंकर पार्वती, तीन विरगळी तसेच रामायण, महाभारातीलाही इंद्र दरबारी असणाऱ्या देवी देवतांच्या शिल्प कला त्या काळी केलेली अफलातून अप्रतिम कोरीव काम करून त्याची केलेली जडण घडण खरीच वाखणण्या जोगी आहे.

हेही वाचा :  या डाळीने बनवलेला इडली व डोसा खाणा-यांनो सावधान, फुफ्फुसापर्यंत पसरतं ‘विष’

चारही बाजूने पाण्याचा वेढा पडलेले मंदिर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. ह्या मंदिराच्या आवारात गेले आसता गाभाराच्या समोरच असलेला नंदी भाविकांचे लक्ष वेधून घेतो या हेमाड पंथी पळसनाथ मंदिराची रचना पूर्ण पणे फक्त 27 दगडी नक्षीदार खांबा पासून तयार केलीली दिसते.  शिखरात प्रवेश करण्यासाठी छोटेसे प्रवेशद्वार आहे. मात्र, याची पडझड झाली आहे. मंदिराच्या आवारात प्रामुख्याने वड,पिपळ,चिंच या तीन झाडांची खोडे फांद्यांसह आजही मोठ्या दिमाखात उभी आहेत, तर एक कोसळले आहे.  या मंदिराचा सभोवताली भव्य दगडी तट बंदीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली तरीही तिचे आस्तित्व आजही असल्याचे दिसून येते.

49 वर्षे पाण्यात लाटांशी झुज देत आहे हे मंदिर

हे मंदिर 49 वर्षे पाण्यात लाटांशी झुज देत असतानाही आज देखील चांगल्या व भक्कम स्त्थितीत उभे असल्याने हा मोठ्या कुतूहलाचा विषय बनला आहे. दरम्यान सध्या भीमा नदी पत्रातील पाणी साठा आतिशय कमी झाल्या मुळे मंदिर पूर्ण पणे उघडे पडल्याने या मंदिरास पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी अनेक भक्तगण इतिहास प्रेमी, हेमाड पंथी तज्ञ ,पर्यटक व परिसरातील नागरिक गर्दी करत असून या पाहणार्यांना भुरळ पडल्या शिवाय राहत नाही. हे पळंसनाथ मंदिर ज्या वेळी पाण्या खाली गेले त्या वेळी पळसदेव करांनी येथील शिवलिंग व काही मुर्त्या नवीन गावात आणून त्याची प्रानप्रतिष्ठा करण्यात आली. मात्र आता काही वर्षा नंतर ही पुरातन मंदिरे कोसळतील अन सर्व काही पाण्याखाली जाईल. कर्नाटकातील एका मंदिरा प्रमाणे याही मंदिराचे सुरक्षित ठिकाणी नेहून पुनर्स्थापना होऊ शकते व हा पुरातन ऐतिहासिक ठेवा कित्येक वर्षे पुढे जपून राहू शकतो. शासनाने मंदिराकडे लक्ष देऊन हा ऐतिहासिक ठेवा जपून ठेऊन मंदिर पुन्हा उभारण्याची मागणी केली जात आहे. 

हेही वाचा :  घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं ठाकरे कनेक्शन? स्थानिक आमदाराने शेअर केलेल्या फोटोने खळबळ

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Ashadhi Wari 2024 : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी नेवासा हेच ठिकाण का निवडलं?

Ashadhi Wari 2024 : महाराष्ट्राला लाभलेल्या थोर संत परंपरेसाठी जितकं कृतज्ञ रहावं तितकं कमीच. प्रपंचही …

जाऊ चला शिर्डीला! साई दर्शनासाठी IRCTC चा धमाकेदार प्लान; ‘अशी’ करा बुकींग

IRCTC Tour Packages: पावसाळा आला की सर्वजण कुठे ना कुठे फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. काहीजण धबधबे …