मोफत वीज, अग्निवीर योजना रद्द करणार; केजरीवाल यांनी देशाला दिल्या 10 ‘गँरटी’

Loksabha Election 2024:  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांसाठी नागरिकांसमोर जाहीरमाना सादर केला आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना 10 गँरटी दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘ही केजरीवालची गँरटी आहे. मी ही गँरटी घेतो की इंडिया ब्लॉकचं सरकार बनल्यानंतर ही गँरटी पूर्ण करेन. ही गँरटी भारताचं व्हिजन आहे. आजकाल देशात ‘मोदी की गँरटी’ यावर चर्चा होतेय. पण आता देशाने ठरवावे मोदी की केजरीवाल कोणाच्या गँरटीवर विश्वास ठेवायचा.’

केजरीवाल यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी यांनी 15 लाख रुपये, प्रत्येक वर्षी 2 कोटींचे रोजगार, स्वामीनाथन रिपोर्ट, 2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, 24 तास वीज, 15 ऑगस्ट 2022पर्यंत साबरमती आणि मुंबईसाठी बुलेट ट्रेन, 100 स्मार्ट सिटीची गँरटी दिली होती. मात्र एकही गँरटी पूर्ण झालेली नाहीये. केजरीवाल यांनी पुढे म्हटलं आहे की, आम्ही शाळा, मोहल्ला क्लिनीक बनवून आमची गँरटी पूर्ण केली आहे. एकीकडे मोदींची गँरटी आहे तर एकीकडे केजरीवालांची गँरटी आहे. 

केजरीवाल यांनी जाहिरनाम्यात काय म्हटलंय?

1 देशात 24 तास मोफत वीज. ज्याप्रमाणे दिल्लीत योजना राबवली आहे तसंच देशातही करण्यात येईल. कधीच वीज जाणार नाही. त्यासाठी सव्वा लाख कोटींचा खर्च येईल. देशभरात गरीबांना 200 युनिट फ्री वीज मिळणार आहे. 

हेही वाचा :  viral: गब्बर आहे तरी कोण? मालकाचा जीव वाचवण्यासाठी सापाशी भिडला पण स्वतःच्या जीवाला मुकला

2 दिल्ली-पंजाबप्रमाणेच देशातील सरकारी शाळांना खासगी शाळांप्रमाणेच सर्वोत्तम बनवू. मोफत शिक्षण देण्यात येईल. त्यासाठी 5 कोटींचा खर्च येईल. 

3 जनता निरोगी असेल तरच देश पुढे जाईल. एकटा पंतप्रधान नाही तर जनताच देश पुढे नेते. खासगी रुग्णालय लूटतात तर सरकारी रुग्णालयांची परिस्थिती खूप खराब आहे. सरकारी रुग्णालयदेखील खासगींप्रमाणेच अद्यावत होतील. त्यासाठी 5 लाख कोटींचा खर्च येणार आहे. 

4 चीनने आपली जमीन बळकावली आहे. हे लपवणे म्हणजे समस्यावर तोडगा काढला असं नाही. देशाची जमीन चीनच्या तावडीतून सोडवून आणू. लष्कराला रोखणार नाही. 

5 अग्निवीर योजना बंद करुन सर्व सैन्याच्या भरती आधीच्या प्रक्रियेनुसारच होतील. आत्तापर्यंत भरती करण्यात आलेल्या अग्निवीरांना कायमस्वरुपी केले जाणार 

6 शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगानुसार सर्व पिकांवर एमएसपी निर्धारित करुन त्यांच्या पिकांना योग्य हमीभाव दिला जाईल. 

7 दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येईल

8 बेरोजगारीसाठी डिटेल प्लानिंग आहे. येत्या दोन वर्षात 2 कोटींचा रोजगार मिळेल अशी व्यवस्था तयार करण्यात येईल. 

9 भाजपची वॉशिंग मशीन तोडून टाकणार. बेईमानांना संरक्षण देण्याची व्यवस्था संपवून टाकणार.. देशाला भ्रष्टाचारमुक्त करणार 

10 केंद्र सरकार व्यापाऱ्यांना घाबरवत आहे. GSTचे सुलभीकरण केले जाईल. देशात व्यापार सुरू करण्यात येतील. आमचं टार्गेट चीनला व्यापाऱ्यात मागे टाकणे हे आहे. 

हेही वाचा :  बारावीच्या पाठ्यपुस्तकातून 'बाबरी मशीद' गायब? वाद टाळण्यासाठी गाळला इतिहास



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? हा वाद वर्षानुवर्ष सुरु आहे. आता सरकारने …

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही

Seema Adhye, Zee 24 Taas : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे फडणवीस सरकारने आज आपला अर्थसंकल्प …