चार मुलं, सुना आणि नातवंड असतानाही 80 वर्षांचे आजोबा अडकले विवाहबंधनात, लेकाने शोधली मुलगी

Amravati old man second marriage : अमरावती जिल्ह्यातील रहिमापूर दोन दिवसांपूर्वी पार पडलेला एक अनोखा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरत आहे. कारण लग्नाच्या मंडपात 80 वर्षाच्या नवरदेवाचे 65 वर्षाची नवरीसोबत थाटात लग्न लावून देण्यात आलं. अंजनगाव सुर्जी तालुक्यात येणाऱ्या चिंचोली रहिमापूर या ठिकाणी हा विवाहसोहळा पार पडला. सध्या हा विवाहसोहळा ट्रेंडींगचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे या विवाहसोहळ्यात नवरदेवाचा 50 वर्षीय मुलगा वरातीत डान्स करताना दिसत होता. 

अमरावतीतील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथील रहिवासी असणारे 80 वर्ष वयाचे विठ्ठल खंडारे यांच्या पत्नीचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं. त्यांना चार मुलं, मुली, नातवंड, नात सुना असा गोतावळा आहे. नातलगांचा भलामोठा गोतावळा असतानाही विठ्ठल खंडारे यांना विरहपणा टोचत होता. ऐन 80 वर्षात विठ्ठल यांनी पत्नी गेल्यानंतर काही वर्षांनी आपल्याला लग्न करायचं, असा विचार मुलांसमोर मांडला. सुरुवातीला मुलांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला. 

बापासाठी लेकानं बघितली नवरी

मात्र, विठ्ठलराव खंडारे यांचा लग्नाचा हट्ट कायम असल्यामुळे मुलांनी देखील आपल्या वडिलांचं लग्न लावून देण्याची तयारी दर्शवली. विठ्ठल यांच्या मुलांनी वडिलांसाठी नवरी शोधायला सुरुवात केली. बायोडाटा, दिसायला हॅण्डसम, जॉब, पैसा, फ्लॅट अशा अपेक्षा नवरीबाईला नसल्यानं तसं मुलगी शोधणं थो़डं सोप्प गेलं. पण, वयाचा विचार करता नवरी शोधणं अवघड झालं होतं. मात्र, तरीही बापासाठी लेकानं नवरी बघायला सुरुवात केली. बापाचा हट्ट पूर्ण करायचाच, असा निर्धारच जणू काय या मुलांनी केला होता. 

हेही वाचा :  कसा व्हायचा महाराष्ट्र गतिमान? शाळेत शिक्षक नसल्याने इयत्ता पहिलीतल्या मुलांना शिकवतायत चौथीचे विद्यार्थी

मुलांनी काढली वडिलांची वरात

अखेर अकोला जिल्ह्यातील अकोट येथील 66 वर्ष वयाच्या महिलेसोबत लग्न लावून देण्याचा निर्णय विठ्ठल खंडारे यांच्या मुलांनी घेतला. यानंतर 8 मे रोजी चिंचोली रहिमापूर या गावात विठ्ठल खंडारे यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात आयोजित करण्यात आला. आपल्या वडिलांचे इतकं थाटात लग्न झाले, त्या आनंदात विठ्ठल खंडारे यांच्या मुलांनी नवरदेव म्हणून आपल्या वडिलांची गावातून जोरदार वरात काढली. या वरातीत चक्क नवरदेव आणि त्यांची मुलं एकत्र गाण्यावर थिरकताना दिसले. हे पाहून नातवंडं तरी कसे मागे राहतील, म्हणून त्यांनीही या वरातीत डान्स करत आनंद व्यक्त केला. 

या लग्न सोहळ्याला चिंचोली रहिमापूर येथील ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते. 80 वर्षाचा नवरदेव आणि 65 वर्षाच्या नवरीची चर्चा चिंचोली रहिमापूर गावासह अंजनगाव सुर्जी आणि अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात रंगली होती.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ढाब्यावर 4 रुपये पगारात केलं 2 वर्षे काम, सुरेश पुजारी ‘असे’ बनले 22 रेस्तरॉंचे मालक; गरिबीतून उभारलं विश्व!

Sukh Sagar Success Story : आयुष्यात काहीतरी करायचा ठाम निर्णय घेतला तर अनेक अडचणींवर तुम्ही …

Bank Job: सेंट्रल बॅंकेत 8 वी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, ‘येथे’ पाठवा अर्ज

Central Bank Job: बॅंकेत नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आपलं शिक्षण कमी असेल …