तब्बल 15 बायका भारतात घेऊन आलेला हा राजा, 5 स्टार हॉटेलात बुक केल्या 200 खोल्या!

Trending News :  इतिहासात तुम्ही अशा अनेक राजांबद्दल ऐकलं असेल जे त्यांच्या रंगीबेरंगी स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. हरममध्ये अनेक राण्या आणि बरंच काही…जगातील राजेशाही थाट संपल्यावर लोकशाही आली आणि अनेक परंपरा आणि प्रथा बंद झाल्या. पण या जगात अजूनही असा देश आहे जिथे राजेशाही थाट राजवट कायम आहे. हा देश आहे ऑफ्रिकेतील द किंगडम ऑफ इस्वाटिनी. पूर्वी या देशाला स्वाझीलँड म्हणून ओळखलं जायचं. या राजाबद्दल अनेक गोष्ट समोर आली आहे, जे ऐकून सर्वांचं धक्का बसला होता. (swaziland king mswati of eswatini who brought 15 wives to India booked 200 rooms in a 5 star hotel)

द गार्जियनसहीत अनेक वेबसाईट्सने अशी माहिती समोर आली की, इथल्या राजा मस्वति तृतीतने त्याच्या राज्यातील लोकांना फर्मान काढला होता की, राज्यातील कोणत्याही पुरुषाकडे पाचपेक्षा कमी पत्नी असतील तर त्यांना तुरूंगाची शिक्षा होईल. पण नंतर राजाने हे खोटं असल्याचं सांगितलं. 

खरंतर राजा मस्वति तृतीयने 15 लग्नं केलंय. त्याला आता सध्या 14 बायका आहे. कारण त्याच्या एका पत्नीचं निधन झालं आहे. पण या राजाने बायकांची निवड कशी केली हे जाणू तुम्हाला धक्काच बसेल.

हेही वाचा :  भटक्या कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा काय सांगतो जाणून घ्या

Mswati

हा राजा दरवर्षी एका Virgin तरुणीशी लग्न करतो!

नॅशनल जिओग्राफीच्या रिपोर्टनुसार, या देशात दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान लुडझिजिनी नावाच्या गावात उमलंगा सेरेमनी नावाचा उत्सव भरत असतो. या उत्सवात देशातील 10 हजारांहून अधिक अविवाहित मुली सहभागी होत असतात. धक्कादायक गोष्ट म्हणजे या तरुणींनी राजासमोर टॉपलेस नृत्य करत परेड करतात. या तरुणींपैकी एक तरुणीची तो राजा राणी म्हणून निवड करतो. 

Mswati

प्रथेला होतोय विरोध!

गेल्या काही वर्षांपासून विचित्र प्रथा म्हणजे उत्सवाला विरोध करत आहेत. 2019 मध्ये अनेक कुटुंबांनी आणि तरुणींनी या उत्सवात सहभाग होण्यास नकार दिला होता. जेव्हा ही गोष्ट राजाला कळली तेव्हा राजाने त्या तरुणींच्या कुटुंबियांना मोठा दंड ठोठवला होता. 

तुम्हाला जाणून आश्चर्यचकित व्हाल की, स्वाजिलँडच्या राजाने त्याच्या 50 व्या वाढदिवसाला त्याच्या 15 पत्नींना रोल्स रॉयस सॅलून कार गिफ्ट केली होती. त्या सर्व कारची किंमत जवळपास 175 कोटी एवढी होती. 

भारतात आला होता हा राजा!

स्वाजिलँडचा राजा 2015 मध्ये भारतातही आला होता. तेव्हा तो आपल्यासोबत 15 बायका, मुलं आणि 100 नोकऱ्यांची फौजफाटा घेऊन आला होता. तो भारत आफ्रिका समिटमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्ली आला होता.

त्यावेळी त्याने दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 200 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा :  पहिला Video Call कधी, कुणी आणि कुणाला केला? तुम्हाला माहितीय का?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘देवमाणूस अशी फडणवीसांची ओळख’, भाजपा आमदाराचं विधान; म्हणाला, ‘निवडणूक पूर्ण होऊन..’

Devendra Fadnavis Riot Planning Allegations: सोलापूरच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री …

Maharashtra Weather Update: राज्यात ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीर

Maharashtra Weather Update: राज्याच्या बहुतांश भागात दाखल झाल्यानंतर पाऊसाने काही दिवस विश्रांती घेतल्याचं दिसून आलं …