नोव्हेंबरमध्ये 10 दिवसांसाठी बंद असेल शेअर मार्केट; तर दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगची ही असेल वेळ!

Stock Market Holiday 2023: नोव्हेंबर महिन्यात अनेक सण-समारंभ आहेत. तसंच, दिवाळी देखील नोव्हेंबरमध्येच आहे. त्यामुळं बँक आणि शाळांना या महिन्यात भरपूर सुट्ट्या असतात. त्याचबरोबर स्टॉक मार्केटमध्येही या महिन्यात सुट्ट्या आहेत. नोव्हेंबरमध्ये शेअर मार्केट 10 दिवसांसाठी बंद राहणार आहे. बीएसई आणि एनएसईच्या शेड्युलनुसार या 10 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये सण, शनिवार आणि रविवार यांचादेखील समावेश आहे. या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला ट्रे़डिंग करता येणार नाही. पण दिवाळीच्या दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबर रोजी एक तासासाठी मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. 

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी स्टॉक मार्केट बंद राहिल याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

नोव्हेंबर महिन्यात या दिवशी बंद राहिल स्टॉक मार्केट

– नोव्हेंबर 4 व 5 रोजी शनिवार आणि रविवार असल्याने शेअर मार्केट बंद असेल

– 11 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबरला विकेंड असल्याने शेअर बाजार बंद असेल

– 12 नोव्हेंबर रोजी एक तासासाठी मुहूर्त ट्रेडिंग होईल

– 14 नोव्हेंबर रोजी मंगळवारी दिवाळीच्या दिवशी शेअर मार्केट बंद असेल. 

हेही वाचा :  72 तासांत 54 मृत्यू , 400 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल; उत्तर प्रदेशात असं नेमक घडलय तरी काय?

– 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी शनिवार व रविवार असल्याने शेअर मार्केट बंद 

– 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी विकेंड असल्याने शेअर मार्केट बंद 

– 27 नोव्हेंबर रोजी सोमवारी गुरुनानक जयंतीच्या दिवशी शेअर मार्केट बंद असेल 

दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगचा वेळ

दिवाळीच्या दिवशी मुहूर्ताचे ट्रेडिंग होत असते गेल्या कित्येक वर्षांपासून ही प्रथा सुरू असते. दिवाळीच्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणे शुभ मानले जाते. य वर्षी 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी आहे. अशातच 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7.15 पर्यंत स्टॉक मार्केट सुरू असणार आहे. 15 मिनिटे प्री मार्केटसाठी ठेवण्यात येणार आहेत. एक तासात तुम्ही शेअर खरेदी करण्याव्यतिरक्त ते विकण्यापर्यंत व एफएंडओमध्ये ट्रेडिंग करु शकणार आहात. 

2023मध्ये किती दिवस बंद असेल शेअर मार्केट

प्रजासत्ताक दिी 26 जानेवारी रोजी शेअर मार्केट बंद असणार आहे. 7 मार्चला होळी, 30 मार्चला रामनवमी, 4 एप्रिलला महावीर जयंती, 7 एप्रिलला गुड फ्रायडे, 14 एप्रिलला डॉ. बाबा साहेब आंबेडकर जयंती, 1 मार्चला महाराष्ट्र दिन, 28 जूनला बकरी ईद, 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन. , 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थी, 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती, 24 ऑक्टोबरला दसरा या दिवशी शेअर बाजार बंद होता. आता दिवाळी 14 नोव्हेंबर, गुरुनानक जयंती 27 नोव्हेंबर आणि ख्रिसमस 25 डिसेंबरला शेअर बाजार बंद राहणार आहे.

हेही वाचा :  राजकारण्यांना कंटाळून पॅनेल उभं करत 30 वर्षांचा इतिहास बदलला; इगतपुरीत तरुणांचा विजय



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जरांगे पाटील आणि भुजबळ वाद विकोपाला! भाषेचा दर्जा घसरला; समाजावर काय होणार परिणाम?

Jarange and Bhujbal Dispute: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातला वाद …

मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा! ‘या’ वस्तू आणि सेवा GST कक्षेतून बाहेर; निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा

GST Council Meeting: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच 53 वी जीएसटी परिषद पार पडली. …