‘गाड्या फोडण्यापेक्षा गुणरत्न सदावर्तेलाच…’ शिंदे गटाच्या आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा (maratha aarakshan) मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. एकीकडे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावर वकील गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) यांच्याकडून टीका केली जात आहे. अशातच आता मुंबईत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या आलिशान गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले आमदार संजय गायकवाड?

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ उडाली आहे. “गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच मराठा आरक्षण हिसकावले गेले. त्यांनी कोर्टात प्रखरपणे बाजू मांडली. ते सूडाने पेटलेला होते. आरक्षणामुळे जसे यांचे काही प्रचंड नुकसान होणार आहे. त्यांची गाडी तोडली ही शिक्षा कमी आहे. याला संपवायला पाहिजे होता. ज्यांनी कोणी हे केल ते कमी झाले. याची व्यवस्था चांगली करायला पाहिजे होती,” असे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले आहे.

हेही वाचा :  कोकणवायीसांसाठी आनंदाची बातमी; रेल्वे तिकिट मिळाले नसेल तर नो टेन्शन, गणपतीसाठी स्पेशल गाड्या

दुसरीकडे, आमदार संजय गायकवाड यांनी आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना केलेल्या गावबंदीबाबतही भाष्य केलं. “काही उत्साही कार्यकर्ते गावबंदी करत आहेत. मात्र अशी भूमिका घेऊ नये. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा सांगितले की आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. सर्वांनी संयमाची भूमिका घेतली पाहिजे. मुख्यमंत्री शिंदे जीवावर खेळतील पण शब्द पडू देणार नाही. सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे, असेही संजय गायकवाड म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांना अटक करा – गुणरत्न सदावर्ते

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या तोडफोडीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी केली. “हल्लेखोरांना आणि मनोज जरांगेंना मला प्रश्न विचारायचा आहे की, तुमच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का? मला गप्प केलं जाऊ शकत नाही. माझा लढा या देशातील 50 टक्के खुल्या जागा वाचवण्याचा आहे. या देशाला जातीपातीत तोडलं जाऊ नये यासाठी माझा लढा आहे,” असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा’, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO

लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन सुरु आहे. दरम्यान अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर एक वेळ अशी …

वहिणीशी समलैंगिक संबंध, आई आणि भावाला संपवलं… ‘त्या’ एका गोष्टीने दुहेरी हत्याकांडाचा झाला उलगडा

23 जून 2024 मध्ये हरियाणातलं आझाद नगर दुहेरी हत्याकांडाने हादरलं. इथल्या एका घरात आई आणि …