जगातील सर्वात उंच टेकडीवर असलेला गणपती, दर्शनासाठी भाविक करतात 3000 फूट धोकादायक ट्रेक

Viral Video of 3000 ft High Ganpati Mandir :सध्या सर्वत्र लगबग आहे ती म्हणजे गणरायाच्या आगमनाची. त्यामुळे सध्या सर्वांच्याच घरी गणेशाच्या आगमनाची जोरात तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सवाचे महत्त्व हे आपल्या सर्वांसाठीच आगळेवेगळे आहे. गणपती येणार म्हटलं की मग मोदकांची तयारी, साग्रसंगीत जेवण, गणपती मुर्तीची तयारी, पाहुण्यांना निमंत्रण, मिरवणूक, आरती अशा सगळ्या गोष्टी आल्याच. गणेशोत्सवाचा इतिहास हा फारचं जूना आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात तुम्ही पाहू शकता की, एका उंच अशा डोंगरावर तब्बल 3000 हजार फूट उंच ठिकाणी एका गणपतीची मुर्ती आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून गणेशभक्तही प्रसन्न झाले आहेत. यावेळी हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

आपल्याला कुठल्याही वस्तूमध्ये किंवा कुठल्याही आकृतीत गणपतीच्या मुर्तीचा आकार दिसला किंवा अगदी दगडाच्या भागातही आपल्या मुर्तीचे स्वरूप दिसले की आपलं मनं प्रसन्न होतं. सध्या या व्हिडीओतील गणपतीच्या मुर्तीला पाहूनही तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. भारतातही असे अनेक मंदिरं आहेत ज्याचं अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. @indian.travellers यांनी त्यांच्या इन्टाग्राम अकांऊटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर गणेशभक्त विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हे मंदिर छत्तीसगढ येथील ढोलकल डोंगरवर स्थित आहे. येथे अनेक भक्त वारंवार येतात. हे मंदिर 1 हजार वर्षे जुनं असल्याचे कळते आहे. आणि समुद्रापासून 3 हजार फूट उंचावर आहे. 

हेही वाचा :  viral video: संगतीचा परिणाम..आणि पोपट चक्क भुंकू लागला

हेही वाचा : गणेशोत्सवात करा अष्टविनायकाचं दर्शन, जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

या व्हिडीओसोबत या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये या मंदिरांबद्दलची अनोखी माहितीही दिली आहे. यात म्हटलंय की, ”गणेशाची ही अद्वितीय मूर्ती छत्तीसगडच्या दंतेवाडा येथील ढोलकल पर्वतावर सुमारे 3000 फूट उंचीवर आहे. 2017 मध्ये माओवाद्यांनी तोडफोड केली तेव्हा, दगडात अतिशय सुंदरपणे कोरलेली ही मूर्ती, हिंदू प्रतिमा त्याचा बळी ठरली होती. पण माओवाद्यांना मूर्तीचे देवत्व आणि डोंगरमाथ्याला मारता आले नाही. भक्त 3000 फूट पायी चढून मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी हा कठीण ट्रेक पुर्ण करतात.

ही मूर्ती 11 व्या शतकात कोरली आणि स्थापित केली गेली आणि त्याची नियमित पूजा केली जात असे. परंतु कालांतराने ते लोकांच्या स्मरणातून निघून गेले आणि झाडांनी झाकले गेले आणि 1943 मध्ये बायलाडिला खाणी उघडण्यापूर्वी ब्रिटीशांनी त्याचा पुन्हा शोध घेईपर्यंत अनेक वर्षे लपून राहिले. ही मूर्ती सुमारे 3 फूट उंच आणि 500 किलोपेक्षा जास्त वजनाची आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा प्रदेशातील बस्तरच्या खोल, अभेद्य जंगलात ग्रॅनाइटच्या घन तुकड्यातून कोरलेली गणेश मूर्ती तिच्या सुंदर गोलाकार पर्चवर विराजमान आहे.

तथापि, स्वातंत्र्यानंतर, ढोलकल पर्वत शिखराकडे जाणाऱ्या घनदाट जंगलात एका पत्रकाराने ट्रेक करताना 2012 पर्यंत ही मूर्ती पुन्हा सार्वजनिक स्मरणातून नाहीशी झाली. या पुनर्शोधामुळे एक खळबळ उडाली, इतके की ढोलकल गणेश मंदिर यात्रेकरू, ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले.”

हेही वाचा :  ट्रेनच्या दारात उभं राहून प्रवाशांवर पट्ट्याने हल्ला; माथेफिरु तरुणाचा व्हिडीओ व्हायरल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या …