बाबा झाल्याच्या आनंदात आधी पेढे वाटले; धक्कादायक सत्य समोर आल्यावर DNA टेस्टची मागणी

Baby DNA Test: बाळ जन्मल्यावर वडिलांच्या आनंदाला पारावर उरलेला नसतो पण प्रत्यक्षात बाळ हातात आल्यावर वडिलांना बाळाची डिएनए टेस्ट करावीशी वाटेल का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. बाळ जन्मल्याच्या आनंदाने वडिलांनी सर्व हॉस्पीटलला पेढे वाटले पण त्यानंतर डिएनए चाचणी करण्याची मागणी केली. बस्ती मेडिकल कॉलेजशी संलग्न असलेल्या ओपेक हॉस्पिटल कॅलीमध्ये हा प्रकार समोर आला आहे. 

लालगंज पोलीस ठाण्याचे देवेंद्र कुमार पत्नीच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात पोहोचले. सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. पत्नीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले.
ऑपरेशननंतर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी देवेंद्रला मुलगा झाल्याची माहिती देण्यात आली.

मुलाच्या जन्माच्या आनंदात कुटुंबात जल्लोष झाला. त्यांनी कर्मचाऱ्यांना एक हजार रुपयांचे बक्षीस दिले. तसेच संपूर्ण रुग्णालयात मिठाईचे वाटली. त्यांनी सर्व नातेवाईकांना फोनवरून मुलगा झाल्याची माहिती दिली. या बातमीने सर्वजण आनंदून गेले.

बाळाची अदलाबदली

ऑपरेशन थिएटरमधून मुलाला कापडात गुंडाळून नातेवाइकांच्या स्वाधीन केले असता भलतेच सत्य समोर आले. नातेवाइकांनी मुलाच्या अंगावरील कापड हटविले असता मुलाऐवजी मुलगी असल्याचे दिसले. मग काय, हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडाला. 

हेही वाचा :  कर्नल पुरोहितांच्या पुस्तक प्रकाशनावरुन वाद, मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपीवरील पुस्तकावर आक्षेप

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बाळ बदलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. मुलगा झाल्याचे त्यांना आधी सांगण्यात आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. यानंतर आनंदाच्या भरात असलेल्या वडिलांनी टीप म्हणून हजारो रुपयेही घेतले. पण नंतर अचानक मुलाची जागा मुलीने घेतली. जो कागद बनवला होता तो मुलाचा होता.

डीएनए चाचणीची मागणी

त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. त्याचवेळी नातेवाईकांनी मुलीला सोबत नेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मुलीची डीएनए चाचणी होत नाही तोपर्यंत ते तिला घरी घेऊन जाणार नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

अशी कोणतीही घटना घडली नाही

दुसरीकडे, कॅलीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.एन. नारायण प्रसाद यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती दिली. आम्हाला प्रथम मुलगा झाल्याची माहिती देण्यात आली होती, परंतु नंतर मुलगी हातात देण्यात आली असे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. दरम्यान, ‘मी माझ्या स्तरावर तपासणी केली आहे. अशी कोणतीही घटना घडलेली नाही’, अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धक्कादायक! पुण्यात सापडले ‘झिका’चे 2 रुग्ण; 15 वर्षीय चिमुकलीचाही समावेश

Zika Virus Cases In Pune: पुण्यामधील एरंडवणामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली …

Maharashtra Weather News : बापरे! ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहणार; राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षी नैऋत्य मान्सून वारे वेळेआधीच देशात आणि राज्यात दाखल झाले. …