या फोटोत तुम्हाला आधी महिला दिसली की पुरुषाचा चेहरा?; उत्तरात दडलंय तुमच्या Personality चं गुपित | mind journal what you see in this picture answer will tell about your personality scsg 91

हे चित्र जे लाइन्स या चित्रकाराने काढलं असून सध्या ते इंटरनेटवर चांगलच चर्चेत असून ते व्हायरल झालंय.

अनेक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा असतो असं म्हणतात. म्हणजेच एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीने पाहिल्यास तिच्यामधून वेगळा अर्थ निघू शकतो. अनेकदा एखाद्या गोष्टीकडे पाहताना दिसतं तसं नसतं याचा प्रत्यय येतो. अनेकदा या ऑप्टीकल इल्यूजनमुळे (म्हणजेच दृष्टीचा होणार भ्रम) गोंधळ उडतो. पण एखाद्या गोष्टीकडे व्यक्ती कशापद्धतीने पाहतात त्यावरुन त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज बांधता येतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होतोय. आधी हा फोटो काय आहे ते पाहूयात आणि त्यामधून आकलनानुसार व्यक्तीमत्वाबद्दल काय अंदाज बांधला जातो ते जाणून घेऊयात.

माइंड जर्नल नावाच्या एका वेबसाईटवरील एक चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फोटोमध्ये नेमकं तुम्हाला काय दिसतंय. म्हणजे हा फोटो पाहिल्या क्षणी तुम्हाला काय दिसतंय सांगा बरं? म्हणजे फोटोतील रेषांमध्ये तुम्हाला मानवी चेहरा म्हणजेच पुरुषाचा चेहरा दिसतोय की एक स्त्री दिसतेय? आता यातून तुम्हाला नेमकं काय दिसलंय यावरुन तुमच्या नेतृत्व गुणांबद्दल अंदाज बांधता येतोय असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल पण हे खरंय.

हेही वाचा :  'तुम्ही 38 व्या वर्षी वेगळी चूल मांडली होती,' अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर, 'माझा पक्ष...'

खरं तर या फोटोमध्ये वर वर पाहिलं तर विशेष असं काहीच नाहीय. म्हणजेच काळा आणि पिवळा अशा दोनच रंगांचा वापर करुन काही रेषांच्या आधारे काढण्यात आलेलं हे चित्र जे लाइन्स या चित्रकाराने काढलं आहे. या चित्रात दोन गोष्टी आहेत. काहींना या फोटोत बसलेल्या महिलेची आकृती दिसते तर काहींना पुरुषाचा चेहरा. पण बारीक निरखून पाहिल्यावर नाही हा पहिल्यांदा काय दिसलं यावर पाहणाऱ्या व्यक्तींबद्दल लगेच काही अंदाज बांधता येतात असं माइंड जर्नलचं म्हणणं आहे.

आता यातून काय अर्थबोध होतो ते पाहूयात. आधी महिलेची आकृती दिसणाऱ्या व्यक्ती या फार उदार आहेत. मनमोकळ्या स्वभावाच्या अशा व्यक्ती असतात. या व्यक्तींच्या आजूबाजूचे लोक कायम त्यांचं कौतुक करत असतात. या व्यक्तींकडे एक कुशल व्यक्तीमत्व म्हणून पाहिलं जातं. अशा व्यक्तींकडून त्याच्यासोबतच्या व्यक्तींना प्रेरणा मिळते. अशा व्यक्ती सोपवलेलं काम योग्य प्रकारे पार पडतात असं सांगितलं जातं.

मात्र या फोटोत आधी पुरुषाचा चेहरा दिसणाऱ्या व्यक्ती या भावनिक दृष्ट्या थोड्या इन्ट्रोव्हर्ट म्हणजेच लवकर कोणाजवळही व्यक्त न होणाऱ्या असतात. अशा व्यक्ती आपल्या भावना लवकर व्यक्त करत नाहीत. मात्र त्यावेळी या व्यक्तींबद्दलची सकारात्मक बाब म्हणजे त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असते. अशा व्यक्ती कायमच उत्साही असतात. या व्यक्तींना आव्हानं आवडतात. त्यामुळेच ते साध्या, सोप्या, सरळ गोष्टींऐवजी आव्हानात्मक गोष्टींना प्राधान्य देतात. सकारात्मक व्यक्तींचा सहवास या व्यक्तींना हवहवासा वाटतो.

हेही वाचा :  अर्ध आयुष्य तुरुंगात काढलं, तब्बल 30 वर्षांनी सत्य समोर आलं...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …