4000 वर्ष जुना नकाशा सापडला; रहस्य उलगल्यास सापडणार मोठा खजिना

Ancient Stone Map : नकाशामंध्ये खजिन्याचे रहस्य दडलेले असतं. नकाशाच्या मदतीने खजिन्यापर्यंतच पोहचले जाते. असे आपण अनेक काल्पनिक सिनेमा आणि कथांमध्ये पाहिले आहे. संशोधकांना प्रत्यक्षात अशा प्रकारचा   4000 वर्ष जुना नकाशा सापडला आहे. संशोधक या नकाशाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. नकाशाचे रहस्य उलगडल्यास मोठा खजिना हाती लागणार आहे. 

दगडी नकाशाचे गुढ उलगडल्याचा संशोधकांचा दावा

फ्रेंच वृत्तसंस्था एजन्सी फ्रान्स-प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. 4000 वर्ष जुन्या प्राचीन दगडी नकाशाचे गूढ उकलल्याचा दावा पुरातत्वशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञांनी  केला आहे. हा कांस्ययुगीन नकाशा आहे. एका दगडाच्या तुकड्यावर रहस्यमयी चिन्हे कोरलेली आहेत. हा नकाशा म्हणजे सेंट-बेलेक स्लॅब आहे. या दगडी नकाशाचे गुढ उलगडल्यास पुरातत्वशास्त्रज्ञांना वायव्य फ्रान्समधील लुप्त झालेली स्मारके आणि मोठा खडिना सापडणार आहे. 

दगडी नकाशावर करोण्यात आलेली कार्टोग्राफिक सांकेतिक चिन्ह डीकोड करण्यात संशोधकांना यश 

@Paracelsus1092 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन या संशोधनासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहेे. तसेच दगडात कोरलेल्या नकाशा देखील शेअर करण्यात आला आहे. या नकाशाच्या मदतीने जमीनीत दफन झालेल्या खजिन्याचा शोध लागणार आहे. या दगडी नकाशात कोरण्यात आलेली कार्टोग्राफिक सांकेतिक चिन्ह डीकोड करण्यात संशोधकांना यश आले आहे.  CNRS संशोधन संस्थेचे क्लेमेंट निकोलस यांनी याबाबत माहिती दिली. 

हेही वाचा :  कोरोनापेक्षाही जीवघेण्या महामारीसाठी तयार राहा; WHO चा गंभीर इशारा; प्रमुख म्हणाले "जगाने आता..."

3D टेन्कॉलॉजीचा वापर 

दगडी नकाशावर करोण्यात आलेली सांकेतिक चिन्ह डीकोड करण्यासाठी 3D टेन्कॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. दरी आणइ नद्यांचा मार्ग ओळखण्यासाठी नॅन्हिगेशन तंत्रांचा वापर करून फोटोग्राफीप्रमाणेच  प्राचीन नकाशाच्या मदतीने 3D छायाचित्र तयार करण्यात आले आहेत. 

युरोपमधील सर्वात जुना दगडी नकाशा

2021 मध्ये सेंट-बेलेक स्लॅबला युरोपचा सर्वात जुना नकाशा घोषित करण्यात आला. तेव्हापासून, पुरातत्वशास्त्रज्ञ या दगडी नकाशाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. एएफपीच्या वृत्तानुसार, 1900 मध्ये पहिल्यांदा याचा शोध लागला होता.  मात्र, यावर फार संशोधन झाले नाही. 

नकाशात दाखवलेला परिसर शोधण्यात यश

2014 मध्ये, वेस्टर्न ब्रिटनी विद्यापीठाचे प्राध्यापक यव्हान पॅलर आणि निकोलस यांनी या दगडी नकाशाचे पुन्हा संशोधन सुरु केले. सांकेतिक खुणांचा उलगडा करत संशोधकांनी आतापर्यंत नकाशावरील 18 मैल बाय 13 मैल इतके क्षेत्रफळ असलेला परिसर शोधून काढला आहे.

नकाशाचे रहस्य उलगडण्यास 15 वर्ष लागणार

नकाशाचे रहस्य उलगडण्यास 15 वर्षांचा कालावधी लागू शकतो. नकाशात जो परिसर दाखवण्यात आला तेथे प्राचीन साम्राज्य असावे. संपूर्ण क्षेत्राचा अधिक शोध घेण्याआधी त्याचे सर्वेक्षण आणि क्रॉस-रेफरन्स केले जात आहे. नकाशावर दाखवण्यात आलेल्या भागात फ्रान्सच्या ब्रिटनी प्रदेशातील रौडौलाक पर्वतांचा समावेश आहे. हा दगडी नकाशा डिकोड करुन त्याचे सॅटेलाईट इमेज तसेच  LiDAR सर्वेक्षण करण्यात आले. नकाशाचे 80 टक्के रहस्य उलगडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. 

हेही वाचा :  48,500 वर्ष जुन्या व्हायरसमुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये; भारतासह अनेक देशांसाठी धोका

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

हातवारे, शिवीगाळ अन्… दानवेंच्या वक्तव्यावरून खडाजंगी; राजीनाम्याची मागणीसह विरोधकांनी अडवली विधानपरिषदेची वाट

Maharashtra Political news: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात सोमवारी …

दातांचे उपचारही होणार मोफत! राज्य सरकारची ‘ही’ योजना येईल कामी

Dental medical Treatment: आरोग्यासंबंधी अनेक आजारांसाठी सरकारी योजना लागू होतात. तसेच मेडिक्लेममुळे अनेक आजारांवरील खर्च …