ऐन पावसाळ्यात पोलीस भरतीचा घाट; 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज

Maharashtra police bharti 2024 : ऐन पावसाळ्यात पोलीस भरतीचा घाट घालण्यात आला आहे.  महाराष्ट्र पोलिस दलात विविध 17 हजार रिक्त पदासांठी भरती होत आहे.  17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. 21 जूनपासून होणाऱ्या भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. यासाठी राज्यभर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे. 

अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी या पोलिस भरतीबाबत सविस्तर माहिती दिली.  लोकसभा निवडणूकीमुळे ही भरती करण शक्य नव्हतं. मात्र, 19 जून पासून भरती प्रक्रिया होणार आहे. लेखी परीक्षा, मैदानी परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत. उमेदवार दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही.

मात्र दोन वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकतात असे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची मैदानी परीक्षा एकाच दिवशी देता येणार नाही. त्यांना त्यात सुटं देण्यात आलेली नाही. भरती प्रक्रियेत शासनाने दिलेल्या आदेशानुसार भरती प्रक्रिया होतं आहेत.

ज्या ठिकाणी पाऊस पडत असेल त्या ठिकाणी भरती प्रक्रिया थांबवली जाईल ही भरती प्रक्रिया दुसऱ्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी घेतली जाईल. दरवर्षीप्रमाणे  गोपनीय यंत्रणा मैदानी चाचणी किंवा लेखी परीक्षा त्याठिकाणी होते प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी कुठलाही एजंट अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल.  

हेही वाचा :  जात प्रमाणपत्र नाकारल्याने शेकडो आदिवासींनी हिंदू देवतांना तहसिलदारांकडे केले सुपूर्द....

रायगड पोलीस दलात 422 रिक्तपदांसाठी 21 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होतेय.  त्यासाठी 31 हजार 63 उमेदवारांनी अर्ज केलेत.  साधारण सलग 25 दिवस ही प्रक्रिया चालेल.  ऐन पावसाळ्यात भरती होणार असल्यानं पोलिसांनी मैदानी चाचणी केली. 

पुणे शहर पोलीस दलात 19 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. चालक आणि शिपाई पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. पुण्यात 202 पदांसाठी 21 हजार अर्ज दाखल झाले आहेत.  तसेच येरवडा कारागृहात देखील 513 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. 

धाराशिव जिल्ह्यात 19 तारखेला पोलीस भरती होणारे… 143 पदासाठी हि भरती होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिलीये… शिपायाच्या 99 जागा तर चालक पदाच्या 44 जागांसाठी भरती होतेय… चालक पदासाठी साडे चार हजार अर्ज दाखल झाले… तर पोलीस शिपाई या पदासाठी साडे तीन हजार अर्ज दाखल झाले..

कोल्हापूरमध्ये 19 जून ते 27 जूनदरम्यान पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. पोलीस परेड ग्राऊंडवर ही भरती प्रक्रिया चालणार आहे. यावेळी पावसामुळे अडथळा आल्यास कसबा बावडा ते शिये मार्गावर भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. 
चंद्रपुरात 19 जूनपासून पोलीस भरतीचं आयोजन करण्यात आलय. यामध्ये शिपाई आणि बँड्सन या पदांची भरती केली जाणार आहे. एकूण 22 दिवस ही भरती प्रक्रिया चालणार आहे. 

हेही वाचा :  Hardeep Singh Nijjar: 'पाच दिवसात देश सोडा', भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘विमानतळं, पूल पडले, राम मंदिराला गळती… मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून अशुभाच्या सावल्या’

Uddhav Thackeray Group Slams PM Modi: “मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांनी स्वतः बहुमत गमावले व …

सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकल्या याबाबतचा सर्वात मोठा खुलासा? NASA ला आधीच सर्व काही माहित होते तरीही…

Sunita Williams Boeing Starliner Spacecraft : नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळात अडकल्या आहेत. एका …