वहिणीशी समलैंगिक संबंध, आई आणि भावाला संपवलं… ‘त्या’ एका गोष्टीने दुहेरी हत्याकांडाचा झाला उलगडा

23 जून 2024 मध्ये हरियाणातलं आझाद नगर दुहेरी हत्याकांडाने हादरलं. इथल्या एका घरात आई आणि मुलाची निर्घृण हत्या (Double Murder) करण्यात आली होती. दिवसाढवळ्या गजबजलेल्या परिसरात दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली. आझाद नगरमध्ये राहाणाऱ्या तीन जणांच्या कुटुंबातील आई आणि मुलाची हत्या करण्यात आली. तर मुलगी बाहेर असल्याने ती बचावली. मृतांमध्ये 45 वर्षांच्या मीना आणि 23 वर्षांचा मुलगा राहूलचा समावेश आहे. तर 27 वर्षांची मुलगी काजल हत्याकांडाच्या दिवशी घरात नव्हती. हत्या केल्यानंतर आरोपीने घरातील सामान अस्ताव्यस्त केलं होतं. सुरुवातीला पोलिसांना चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्याचा संशय आला.

दुपारी चार वाजता जेव्हा मुलगी काजल घरी आली तेव्हा आई आणि भावाचा मृतदेह पाहून हादरा तिच्या पायाखालची जमीन सरकली. मृतदेह पाहून तीने आरडाओरडा करत शेजारच्यांना याची माहिती दिली. त्यानंतर 112 नंबरवर फोन करत पोलिसांना याची माहिती दिली. मोबाईल चार्जिंगच्या वायरने गळा आवळून या दोघांची हत्या करण्यात आली होती. 

घरातील सीसीटीव्ही बंद?
हत्याकांडाची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी तपास सुरु केला. घरातील सामान विखुरलेलं होतं. विशेष म्हणजे घटनेच्याच दिवशी घरातील सीसीटीव्ही (CCTV) बंद असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी मुलगी काजलकडे चौकशी सुरु केली. घटना घडली त्यावेळी आपण ब्युटी पार्लरला गेलो होतो, येताना आईने मेसेज करत ज्युसची दोन पाकिटं आणण्यास सांगितलं होतं, अशी माहिती काजलने दिली. आईने पाठवलेला मेसेजही काजलने पोलिसांना दाखवला.

हेही वाचा :  Bribe : फक्त 760 रुपयांमुळे नोकरी गेली; दारुची बाटली लाच म्हणून घेतली

पण नेमकं हत्याकांडाच्याच दिवशी घरातील सीसीटीव्ही बंद कसा होता, ही गोष्ट पोलिसांना खटकली. त्यांना याबाबत काजलला विचारलं, पण सीसीटीव्ही कोणी आणि का बंद केला याची आपल्याला काहीच माहित नसल्याचं तीने सांगितलं. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. यात तोंडावर मास्क बांधलेला एक तरुण त्यांच्या घरी जाताना आणि निघताना काही सामान घेऊन जाताना पोलिसांना दिसला. विशेष म्हणजे हा नकाबधारी तरुण ज्यावेळी घरात घुसला त्यावेळी काजलही घरातच होती. घरात घुसलेला हा तरुण कोण होता याची पोलिसांनी विचारणा केल्यावर काजल काहीशी हडबडली. तिच्या चेहऱ्यावरचे हावभव पाहिल्यानंतर पोलिसांचा तिच्यावरचा संशय वाढला.

दुपारी 2 ते 3 दरम्यान काजल घराबाहेर
काजलने दिलेल्या माहितीनुसार ती दुपारी 2 ते 3 दरम्यान बाहेर गेली होती.  याच दरम्यान तीने हत्याकांड झाल्याचा दावा केला. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार हत्या सकाळी झाली होती. त्यामुळे काजल खोटं बोलत असल्याची पोलिसांना खात्री पटली. तिला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच काजलने आपला गुन्हा कबूल केला. आपल्या मामेभावाबरोबर काजलने आई आणि भावाची हत्या केली होती.

का केली आई आणि भावाची हत्या
काजल आणि मामेभाऊ कृषने मोबाईल चार्जरच्या वायरने आधीर राहुलची नंतर आई मीनाची गळा आवळून हत्या केली. कृषने चार्जने गळा आवळला तर काजलने त्यांचे पाय पकडले. त्यानंतर चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचं भासवण्यासाठी त्याने घरातील सामान इथे तिथे विखुरलं. हत्याकांडाच्या आधी काजलने घरातील सीसीटीव्ही बंद केला होता. काजल समलैंगिक होती, तिचं एका मुलीबरोबर समलैंगिक संबंध होते. एकत्र राहाता यावं यासाठी काजलने पुढाकार घेत त्या मुलीचं भाऊ राहुलबरोबर लग्न ठरवलं. पण राहुलला ही गोष्ट कळल्यानंतर त्याने हे लग्न मोडलं. यावरुन काजलचं आई मीना आणि भावाबरोबर भांडणं वाढू लागली. 

हेही वाचा :  Chocolate Day 2023: एक असा देश जिथं अनोख्या पद्धतीने साजरा होतो 'चॉकलेट डे', होनमेई चोको, गिरी चोको असतं तरी काय?

दररोजच्या भांडणांना कंटाळून काजलने दोघांच्या हत्येचा कट रचला. यात तीने मामेभाऊ कृषलाही सहभागी करुन घेतलं. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? हा वाद वर्षानुवर्ष सुरु आहे. आता सरकारने …

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही

Seema Adhye, Zee 24 Taas : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे फडणवीस सरकारने आज आपला अर्थसंकल्प …