संततीप्राप्तीचं आमिष दाखवून तांत्रिकाचा 25 वर्षीय महिलेवर बलात्कार; 3 दिवस हॉटेलमध्ये…

Madhya Pradesh Crime Tantrik Rape Woman: मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरामध्ये थाटीपूर परिसरात राहणाऱ्या एका महिलेवर तांत्रिकाने आपत्यप्राप्तीचं आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. लग्नाला 5 वर्ष झाल्यानंतरही आपत्य न झाल्याने ही महिला या तांत्रिकाकडे जाळ्यात अडकली. तांत्रिकाने आधी या महिलेला स्वत:चं राहतं घर सोडून दुसऱ्या घरात राहण्याचा सल्ला दिला. सध्या तू ज्या घरात राहत आहेस तिथे राहून तुला मूल होण्यात अडचणी निर्माण होत असल्याचं या तांत्रिकेने महिलेला सांगितलं. तांत्रिकाच्या सांगण्यानंतर, पती-पत्नीने स्वत:चं राहतं घर सोडून भाडे तत्वावर घेतलेल्या घरात राहण्यास सुरुवात केली. 

दिल्लीत महिलेवर 3 दिवस बलात्कार केला

तांत्रिकाच्या सांगण्यानुसार हे दांपत्य दुसऱ्या घरामध्ये राहायला गेल्यानंतर तांत्रिक त्या ठिकाणी येऊन रोज तंत्रमंत्र करायचा. त्यानंतर एक दिवस एका मोठ्या संताला भेटण्याच्या नावाखाली हा तांत्रिक या महिलेला दिल्लीला घेऊन गेला. त्यानंतर तेथील हॉटेलमध्ये त्याने सलग 3 दिवस या महिलेवर बलात्कार केला. तिथून हा तांत्रिक या महिलेला राजस्थानला घेऊन गेला. या तांत्रिकाच्या तावडीतून महिलेने कशीबशी सुटला केली आणि तिने ग्वाल्हेरमध्ये येऊन या तांत्रिकाविरोधात तक्रार दाखल केली.

हेही वाचा :  प्रियकरासाठी आईनं पोटच्या मुलाची केली हत्या; मृतदेह शोधताना पोलिसांच्या आले नाकीनऊ

मंदिरामध्ये भेटलेल्या महिलेने दिली या तांत्रिकाची माहिती

हे दांपत्य भिंड जिल्ह्यामधील रावतपूरा सरकार मंदिरामध्ये दर्शनला जायचे. याच मंदिरामध्ये शेजारच्या गावात राहणाऱ्या या महिलेच्या दूरच्या नातेवाईकांपैकी एका महिलेने, आपल्या गावामध्ये एक शीलू त्रिपाठी पंडित आहे. या बाबांच्या मदतीने सर्व समस्या दूर होतात, असं पीडितेला सांगितलं. महिला आणि तिच्या पतीने शीलू पंडितची भेट घेतली. शीलूने तुम्हाला नक्कीच आपत्य होईल असं सांगत तुम्हाला बाळ होईल याची गॅरंटी मी देतो असंही सांगितलं. त्यानंतर शीलूने काही उपाय सांगितलं. पती-पत्नीने शीलूने सांगितलेले सर्व उपाय केले. मात्र त्यांना संततीप्राप्ती झाली नाही. 

दुसऱ्या घरात राहण्यास सांगितलं

दोघांचे प्रयत्न यशस्वी ठरल्यानंतर शीलूने या दोघांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि संततीप्राप्तीसाठी तुम्हाला घर सोडावं लागेल असं सांगितलं. सध्याच्या तुमच्या घरात संततीप्राप्तीमध्ये मोठा अडथळा निर्माण होत आहे. यावर इतर कोणताही उपाय यावर काम करणार नाही. तुम्हाला घर सोडावं लागेल. हवं तर हे घर भाड्याने देऊन तुम्ही दुसऱ्या घरात राहा असं शीलूने या दोघांना सांगितलं.

राजस्थानमध्ये घेऊन गेला अन् तिथेही बलात्कार केला

पती-पत्नीने तांत्रिकाचं म्हणणं ऐकून आपल्या कॉलिनीमध्येच एक घर भाड्याने घेतलं आणि तिथे राहू लागले. तांत्रिक शीलू त्रिपाठीने स्वत: भाडे तत्वावर घेतलेल्या घरामध्ये तंत्रमंत्र केलं. या सर्व गोष्टी जवळपास महिनाभर सुरु होत्या. त्यानंतर शीलू त्रिपाठीने या महिलेला मोठ्या संताला भेटायला न्यावं लागणारे आहे असं सांगून तिला दिल्लीला घेऊन गेला. 3 दिवस या महिलेवर बलात्कार केल्यानंतर तो तिला राजस्थानमधील करौलीमध्ये घेऊन गेला. तिथेही त्याने एका हॉटेलमध्ये एक दिवस या महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला पुन्हा दिल्लीला घेऊन आला. हा सारा प्रकार 10 दिवस सुरु होता. या महिलेच्या पतीने थाटीपूर पोलीस स्टेशनमध्ये पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. 

हेही वाचा :  शरद पवार यांच्या राजीनामानाट्यावर ठाकरे गटाचा मोठा दावा; कोणाची केली पोलखोल?

…अन् अखेर आरोपीला अटक

महिलेने या तांत्रिकाच्या तावडीतून सुटण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र तांत्रिक तिला सोडण्यास तयार नव्हता. अखेर नजर चुकवून ही महिला त्याच्या तावडीतून पळून आली. यानंतर तिने आपल्या पतीच्या मदतीने तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तांत्रिक शीलू त्रिपाठीला अटक केली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धक्कादायक! पुण्यात सापडले ‘झिका’चे 2 रुग्ण; 15 वर्षीय चिमुकलीचाही समावेश

Zika Virus Cases In Pune: पुण्यामधील एरंडवणामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली …

Maharashtra Weather News : बापरे! ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहणार; राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षी नैऋत्य मान्सून वारे वेळेआधीच देशात आणि राज्यात दाखल झाले. …