Viral News : GPS ने फोडलं पत्नीचं बिंग, बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये आला नवऱ्या अन् मग…

Extra marital affair viral news in marathi : गेल्या काही वर्षांपासून समाजात एक्स्ट्रा मॅरिटयल अफेयरचे अनेक घटना समोर आल्या आहेत. अरेंट मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज पुरुष असो किंवा स्त्री कोणा ना कोणाचं विवाहबाह्य संबंधाच्या घटना समोर आल्या आहेत. लग्नातील विश्वास आणि प्रेम संपल्यावर (Husband-Wife) त्या नात्याला अर्थ उरत नाही. जेव्हा आपला जोडीदार आपल्या पाठीमागे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध जोडतो ही सर्वात वेदनादायी घटना असते. गेल्या अनेक अशा घटनांमुळे विवाह संस्था धोक्यात आली आहे. 

अन् तिचं गुपित उघडं पडलं…

एका महिलेचे नवऱ्याच्या पाठीमागे एका तरुणाशी (Boyfriend) अनैतिक संबंध होते. नवऱ्याला आपली बायको घराबाहेर कुठे जाते काय करते याची कल्पना नव्हती. सुखी संसार म्हणावा तसं छान त्यांचं आयुष्य सुरु होतं. दाम्पत्याचं 2014 साली लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलंही आहे…घरात आनंद आणि सुख समृद्धी होती. नवऱ्याने नवीन कार विकत घेतली. घरात सगळे खूष होते. पण हीच कार पत्नीचं असं गुपित उघड करेल याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. 

हेही वाचा :  सूनचा सेठच्या मुलाच्या मृतदेहाजवळ सापडले आयलायनरने लिहिलेला मजकूर टिश्यू पेपरचे 10 तुकडे

त्या कारमधील जीपीएसने त्यांचं हसतं खेळतं आयुष्य उद्धवस्त केलं. झालं असं की ती पती एका प्रायव्हेट कंपनीत कामावर होतो. त्यामुळे त्याची कधी कधी नाईट शिफ्टदेखील लागायची…असं तो एकदा नाइट शिफ्टमध्ये काम करत असताना त्याचा लक्षात आलं की रोज रात्री त्याची घरी नसून दुसरीकडे आहे. तो नसताना त्याची कार कोण चालवत आहे? असा प्रश्न त्याला सतावत होता. त्याने चौकशी करायचं ठरवलं.

रोज रात्री कार हॉटेलला पार्क

कारमधील जीपीएस (GPS connect) कनेक्शनवरुन असं लक्षात आलं की त्याची कार रोज रात्री एका हॉटेलमध्ये अनेक तास उभी असते. रोज पहाटे 5 वाजता ती कार परत घरी येते. त्यामुळे त्याला काही कळतं नव्हतं नेमकं प्रकरण आहे तरी काय…मग त्याने हॉटेलमध्ये जाऊन चौकशी करायचं ठरवलं…

पायाखालची जमीनच सरकली…

त्याने या घटनेचा छडा लावण्यासाठी हॉटेल गाठलं. रात्रीच्या वेळी जेव्हा गाडी हॉटेलला गेली असता तोही हॉटेलला पोहोचला… त्यावेळी हॉटेलमध्ये विचारल्यावर कळलं की ही गाडी घेऊन एक महिला आणि पुरुष तिथे आले आहेत. हॉटेलमधील रुम घेण्यासाठी देण्यात आलेले आयडेंटी कार्ड पाहिल्यावर त्याचा पायाखालची जमीनच सरकली…कारण त्यातील एक आयडी कार्ड त्याचा बायकोचं होतं. 

हेही वाचा :  लग्नाचे विधी होताच नवरदेवाला झाडाला बांधून ठेवले, नवरीच्या कुटुंबीयांनी धू-धू धुतले

महिला जी कार घेऊन जात होती, तिला माहिती नव्हतं की कार जीपीस ट्रॅकवर आहे.  त्यामुळे तिचं हे बिंग नवऱ्यासमोर फुटतं. हॉटेलच्या त्या रुममध्ये पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून नवऱ्याला मोठा धक्काच बसतो. 

कुठलीही आहे ही घटना?

ही धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. या प्रकरणात आता पतीने पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंड विरोधात पोलीस ठाण्यात (Police) तक्रार दाखल केली आहे. त्याशिवाय त्या दोघांना कोर्टातदेखील खेचलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा’, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO

लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन सुरु आहे. दरम्यान अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर एक वेळ अशी …

वहिणीशी समलैंगिक संबंध, आई आणि भावाला संपवलं… ‘त्या’ एका गोष्टीने दुहेरी हत्याकांडाचा झाला उलगडा

23 जून 2024 मध्ये हरियाणातलं आझाद नगर दुहेरी हत्याकांडाने हादरलं. इथल्या एका घरात आई आणि …