Vidarbha Lok Sabha Election Results 2024 LIVE : विदर्भात फडणवीस यांना धक्का, प्राथमिक कल महाविकास आघाडीच्या बाजूने

Vidarbha Region Lok Sabha Election Results 2024 LIVE Counting and Updates in Marathi : लोकसभा निवडणूक 2024 (Maharashtra Lok Sabha Election Result 2024) प्राथमिक कल येत आहेत. त्यात भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या विदर्भात फडणवीस यांना धक्का मानला जातोय. नागपूर मतदारसंघात भाजप नेते आणि मंत्री नितीन गडकरी हे हॅटट्रिक करण्याच्या वाटेवर आहे. यापूर्वी काँग्रेसचे विलास मुत्तेवार यांनी हॅटट्रिक केली होती. पण विदर्भातील इतर मतदारसंघात मात्र भाजप आपली जादू दाखवताना दिसत नाहीय. 

विदर्भातील दहा मतदारसंघापैकी नागपूर आणि बुलढाणा इथे भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावतीत भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहिला मिळत आहे. प्रत्येक फेरीत नवनीत राणा आणि बळवंत वानखडे आघाडी पिछाडी सुरु आहे. इतर 7 मतदारसंघात महा विकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. नागपूरमधून नितीन गडकरींना 1 लाख 19 हजार 848 मतं पडली असून विकास ठाकरेंना 1 लाख 44 हजार 450 मतं मिळाली आहेत. नितीन गडकरी 47 हजार 398 मतांनी आघाडीवर आहेत. 

1. बुलढाणा – महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव 16368 मतांनी आघाडीवर

2. गडचिरोली चिमूर – काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान 17494 मतांची आघाडीवर 

हेही वाचा :  अनुष्काच्या व्हाईट शर्टच्या जादू पुढे मलायकाचा सिझलिंगअवतारही फिका,तुमच्या लाडक्या कलाकारांचे ख्रिसमस लुक

3. चंद्रपूर – काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना 1 लाखांची आघाडी, भाजपचे सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर

4. अकोला – काँग्रेसचे डॉ.अभय पाटील दहाव्या फेरी 11859 मतांनी आघाडीवर, भाजपचे अनुप धोत्रे दुसऱ्या तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर

5. यवतमाळ वाशिम – शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख 37894 मतांनी आघाडीवर, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील पिछाडीवर
6. वर्धा – अमर काळे 24390 मतांनी आघाडीवर, तर रामदास तडस यांना 19,0829 मतं

7. अमरावती – नवनीत राणा आघाडीवर, बळवंत वानखडे पिछाडीवर

8. भंडारा गोंदिया – महायुतीचे सुनील मेंढे 133800 मतांनी आघाडीवर

9. रामटेक – शिंदे गटाचे राजू पारवे आघाडीवर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बर्थ-डे पार्टीत दारू कमी दिली, चिडलेल्या तरुणाने मित्राला चौथ्या मजल्यावरुन फेकले अन्…

Ulhasnagar Crime News: देशात गुन्हेगारीचा आलेख वाढल्याचे चित्र आहे. क्षुल्लक कारणावरुन जवळच्याच लोकांकडून दिवसाढवळ्या हत्या …

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेना

Shivsena Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात सापडले आहेत.  विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी …