Added Sugar आणि Natural Sugar मधील नेमका फरक काय? सरकारचं म्हणणं समजून घ्या

Added Sugar Risk: दैनंदिन आहारामध्ये दर दिवशी विविध घटकांचा समावेश केला जातो. अन्नपदार्थांच्या माध्यमातून प्रथिनं, तंतूमय घटकांपासून अगदी साखरेपर्यंतही अनेक घटकांचा पुरवठा शरीराला केला जातो. थोडक्यात साखर न खाणाऱ्या मंडळींच्या आहारावाटेही नकळतच साखर खाल्ली जाते. अगदी शुगरफ्री असं लिहिलेल्या एखाद्या पाकिटबंद पदार्थातही साखर मिसळलेली असते, जी अनेकदा नजरेतून निसटते. 

केंद्र शासनाच्या अख्तयारित येणाऱ्या इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरच्या माहिती आणि सूचनांनुसार दिवसातून 25 ग्रॅमहून अधिक Added Sugar चं सेवन करु नये, किंवा साखर आहारातून पूर्णपणे बाद करावी. साखरेच्या सेवनामुळं कॅलरी वगळता इतर कोणताही घटक शरीराला पुरवला जात नाही. ICMR कडून दर दिवशी Total Energy Intake पैकी 5 टक्के किंवा दर दिवशी 25 ग्रॅम साखरेचं सेवन High Sugar म्हणून ग्राह्य धरलं जातं. 

रिफाइन्ड साखरेशी इतकं वैर का? 

आयसीएमआरच्या मते ज्या पदार्थांमध्ये मुळातच साखर आहे, अशा पदार्थांमध्ये पुन्हा साखर मिसळल्यास त्याचा कॅलरी इंटेक वाढतो. इथं कोणत्याही पद्धतीनं पोषक तत्वांचा पुरवठा केला जात नाही, ज्यामुळं साखरेपासून हल्ली अनेकजण दुरावा पत्करताना दिसतात. Added Sugar च्या सेवनामुळं स्थुलता, मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर आणि डिमेन्शिया यांसारख्या आजारपणांचा धोका वाढतो. 

हेही वाचा :  'एक फिश फ्राय- पाण्यात गेला, छपाक'- झोमॅटो आणि कस्टमरधला मजेशीर स्क्रीनशॉट व्हायरल

Added Sugar आणि Natural Sugar मधील फरक काय? 

अॅडेड शुगर म्हणजे एखाद्या पदार्थावरील प्रोसेसिंग आणि तो तया करण्याच्या दरम्यान त्या पदार्थात शुगर सिरप मिसळणं. अनेकदा खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये ही अधिकची साखर मिसळली जाते. यामध्ये सुक्रोज (टेबल शुगर), गुड़, शहद, ग्लूकोज, फ्रुक्टोज, डेक्सट्रोजचा समावेश आहे. 

उलटपक्षी नॅचरल शुगर म्हणजेच नैसर्गिक साखर म्हणजे तो घटक जो पदार्थात उपजतच असतो. उदाहरणार्थ मोनोसॅकराईड सिंपर शुगरमध्ये गणले जातात. यामध्ये फळातील ग्लुकोज किंवा फ्रुक्टोजसारखे घटक असतात. त्यामुळं पदार्थांचा नैसर्गित गोडवाय शरीरासाठी योग्य असून, साखरेपासून मिळणारा गोडवा टाळण्याचा सल्ला बरेच आहारतज्ज्ञ देतात. 

(वरील संदर्भ माहितीच्या हेतूनं देण्यात आला असून, आहारविषयक कोणत्याही बदलांपूर्वी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या)

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? हा वाद वर्षानुवर्ष सुरु आहे. आता सरकारने …

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही

Seema Adhye, Zee 24 Taas : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे फडणवीस सरकारने आज आपला अर्थसंकल्प …