महिना सुरू होताच सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचा दर जाणून घा!

The Gold Price Today: कमोडिटी बाजारात सोमवारी 1 जुलै रोजीदेखील घट झाल्याचे चित्र आहे. सोनं-चांदीचे दरात मागील आठवड्यात थोडेसे नरमले होते. तर, या आठवड्यातदेखील सोनं आणखी स्वस्त होणार असल्याचे सांगितले जातेय. भारतीय वायदे बाजारात सोन्यात 56 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं आज सोनं 71,526 रुपये प्रति 10 ग्रॅमसाठी आहे. शुक्रवारी सोन्याचे दर 71,582 रुपयांवर स्थिर झाले आहे. आज सोमवारी चांदीदेखील 192 रुपयांनी घसरून 86,975 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. या आधी चांदी 87,167 वर स्थिर झाली होती. 

सराफा बाजारात भाव वाढले

राष्ट्रीय राजधानीमध्ये सराफा बाजारात शुक्रवारी सोनं 370 रुपयांनी वाढून 72,550 रुपयांवर स्थिर झाले होते. जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्याने देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंचे भाव मजबूत झाले. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 72,180 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. चांदीचा भावही 600 रुपयांनी वाढून 91,200 रुपये प्रति किलोवर बंद झाला, जो मागील सत्रात 90,600 रुपये प्रति किलो होता.

हेही वाचा :  हाताला बांधून आणलं 1 कोटींचं सोनं! सोन्याची तस्करी करणाऱ्या Cabin Crew ला बेड्या

सराफा बाजारात सोन्याचे दर काय?

सराफा बाजारात आज 1 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 72,270 प्रति 10 ग्रॅम इतके आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 66,240 प्रति 10 ग्रॅम इतके आहेत. भारतात, 22 कॅरेट सोन्याचे दर 6,624 प्रति 1 ग्रॅम आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचे दर 7,227 प्रति 1 ग्रॅम इतके आहेत. 

 

सोना-चांदी शुद्धता – प्रति 10 ग्राम सोन्याचा दर

सोना 999              71835

सोना 995              71547

सोना 916              65801

सोना 750              53876

सोना 585              42024

चांदी 999             88000 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Hathras Stampede: सत्संगला जाऊ नको असं पत्नीला सांगितलं पण…; हाथरसमधील पीडितांचा प्रत्येक शब्द काळीज पिळवटणारा

Hathras Stampede: “मी तिला अनेकदा संत्संगला जाण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र माझ्या पत्नीने ऐकलं नाही. …

संतापजनक! गर्भवती माता, बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात आढळला मृत साप

सरफराज सनदी, झी मीडिया, सांगली : सांगलीच्या पलूस येथे गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या …