मुलीचं अंतर्वस्र काढून तिच्यासमोर नग्न होण्याला ‘बालात्काराचा प्रयत्न’ म्हणता येणार नाही : उच्च न्यायालय

High Court Verdict: अल्पवयीन मुलीची अंतरवस्रं काढून तिच्या समोर स्वत: नग्न होण्याच्या कृतीला ‘बालात्काराचा प्रयत्न’ म्हणता येणार नाही. या अशा प्रकाराचा महिलेचा सन्मान दुखावण्याचा प्रयत्न म्हणता येईल, असं निरिक्षण राजस्थान उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. एका 33 वर्षीय व्यक्तीविरोधातील प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हे निरिक्षण नोंदवण्यात आलं आहे. 

न्यायमूर्तींनी काय म्हटलं?

न्यायमूर्ती अनुप कुमार धांडे यांनी या प्रकरणामध्ये निकाल सुनावला. अल्पवीयन मुलीची अंडरवेअर काढून तिच्यासमोर स्वत: पूर्णपणे नग्नावस्थेत उभं राहणं हे भारतीय दंडसंहितेच्या कलम 376 अंतर्गत किंवा कलम 511 अंतर्गत येत नाही. या असल्या कृतीला ‘बलात्काराचा प्रयत्न’ म्हणता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. हा खटला एक व्यक्ती विरुद्ध राज्य सरकार असा होता. या प्रकरणाचा निकाल देताना एकल खंडपीठाने ‘प्रयत्न’ करण्यासंदर्भात बोलताना, तयारी करण्याच्या पुढे जाऊन काही केलं नसेल तर त्याला ‘प्रयत्न’ म्हणता येणार नाही, असंही म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये, ‘महिलेच्या सन्मान दुखावला’ या अंतर्गत कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करता येईल, असंही न्यायालयाने सांगितलं.

हेही वाचा :  'मांसाहार करणारे वाढल्याने हिमालचमध्ये ढगफुटी झाली, दरडी कोसळल्या'; IIT Director चं विधान

बळजबरी झाल्याचं सिद्ध करावं लागेल

“माझ्यामते समोर आलेल्या माहितीनुसार हे प्रकरण कलम 376/511 अंतर्गत येत नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास अर्ज करणाऱ्या व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही. गुन्हा सिद्ध करण्यासाठी समोरील पक्षाला ही छेडछाड आहे किंवा बळजबरी करुन तिचा सन्मान दुखवण्याचा प्रयत्न झाल्याचं सिद्ध करावं लागले. हे प्रकरण कलम 354 अंतर्गत येतं. सदर प्रकरणामध्ये आरोपीने तयारी करण्याच्यापलीकडे काहीही केलेलं नसल्याने हे प्रकरण कलम 354 अंतर्गतच येईल,” असं न्यायाधिशांनी म्हटलं आहे.

नेमकं हे प्रकरण काय?

टोंक जिल्ह्यामध्ये तोडारासिंह येथे 9 मार्च 1991 रोजी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तक्रारदार व्यक्तीच्या 6 वर्षीय नातीला रात्री 8 च्या सुमारास घराजवळील पाणपोईवरुन जवळच्या धर्मशाळेमध्ये बलात्कार करण्याच्या हेतूने घेऊ गेला होता. मात्र या मुलीने आरडाओरड केल्यानंतर गावकरी गोळा झाले. गावकरी आले नसते तर या मुलीवर बलात्कार झाला असता असं तक्रारीत म्हटलं आहे. हा प्रकार घडला तेव्हा आरोपी केवळ 25 वर्षांचा होता.

दोन प्रकरणांचा दिला संदर्भ

न्यायमूर्ती धांडे यांनी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, दामोदर बेहरा विरुद्ध ओडीशा सरकार आणि सित्ती विरुद्ध राजस्थान सरकार यासारख्या प्रकरणांमध्ये आरोपीने बळजबरीने मुलीच्या अंगावरील कपडे काढली होती. मुलीचा विरोध असतानाही तिची कपडे काढून तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला. अशा प्रकरणांमध्ये घडलेला प्रकार बलात्काराचा प्रयत्न आहे असं म्हणता येईल, असं न्यायामूर्तींनी म्हटलं. ‘बलात्काराचा प्रयत्न’ या आरोपाखाली गुन्हा सिद्ध करण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते असं न्यायालयाने म्हटलं आहे.

हेही वाचा :  माझी एकुलती एक लेक, 2 दिवसांनी घरी परतणार होती; मुंबईतील मृत मुलीच्या वडिलांना अश्रू अनावर

बलात्काराचा प्रयत्न म्हणण्यासाठी या तीन गोष्टी आवश्यक

“पहिली गोष्ट म्हणजे आरोपीच्या मनात अशाप्रकारचा गुन्हा करण्याची इच्छा तयार होते. दुसरी गोष्ट म्हणजे ही कृती करण्यासाठी त्याने तयारी करणे. तिसरी गोष्ट म्हणजे आरोपीने बळजबरीने असा गुन्हा करण्यासाठी पुढील कृती करणे,” असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळेच सदर प्रकरणामध्ये तयारी करणे या दुसऱ्या टप्प्यानंतर पुढील गोष्टींसाठी आरोपीने प्रयत्न केले हे सिद्ध करुन दाखवावं लागेत, असं न्यायालयाने म्हटलं. 

त्या मुलीने काय सांगितलं?

या प्रकरणातील सहा वर्षीय मुलीने त्यावेळी नोंदवलेल्या जबाबामध्ये आरोपीने तिच्या अंगावरील सगळे कपडे काढले. त्यानंतर तो स्वत: नग्न झाला. मात्र तिने आरडाओरड केल्यानंतर आरोपी पळून गेला. मात्र तिने केलेल्या आरोपामध्ये कुठेही आरोपीने शरीरसंबंध ठेवण्यासाठी बळजबरी केल्याचा उल्लेख नव्हता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सोन्या-चांदीच्या दरात उसळी; 18,22,24 कॅरेटचे आजचे दर जाणून घ्या

Gold Price Today: सोन्याच्या दर आज किचिंत वाढ झाल्याचे चित्र आहे. आज मंगळवारी 2 जुलै …

…म्हणून HDFC च्या खातेधारकांचा Bank Balance दिसणार नाही; का घेतला हा निर्णय?

HDFC Bank UPI Update: देशातील अनेक विश्वासार्ह आणि बड्या खासगी बँकांपैकी एक असणारं नाव म्हणजे …