सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकल्या याबाबतचा सर्वात मोठा खुलासा? NASA ला आधीच सर्व काही माहित होते तरीही…

Sunita Williams Boeing Starliner Spacecraft : नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळात अडकल्या आहेत. एका मिशनअंतर्गत त्या आपले सहकारी बुच विल्मोर यांच्यासोबत अंतराळात गेल्या होत्या. नियोजनानुसार त्या 22 जूनला पृथ्वीवर परतणार होत्या. पण स्टारलाईनर स्पेसक्राक्ट या अंतराळयानात बिघाड झाला. त्यामुळं त्या अंतराळातच अडकून पडल्यात. सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकल्या याबाबतचा आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. या तांत्रिक अडथळ्याला NASA  जबाबदार असल्याची धक्कादायक अपडेट समोर आली आहे. 

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी इतिहास रचला आहे. बोईंगच्या स्टारलाईनर स्पेसक्राफ्टने 5 जून रोजी पृथ्वीवरून उड्डाण केले.  सुनीता आणि बुच विल्मोर यांचे यान प्रक्षेपणानंतर 26 तासांनी गुरुवारी रात्री 11 वाजता केंद्रावर पोहोचलं. सुनीता विल्यम्स या तिस-यांदा गेल्या अंतराळ मोहिमेवर गेल्या आहेत. 

तांत्रिक बिघाडामुळे बोइंग स्टारलाइनर हे अंतराळयान अंतराळात अडकले आहे. नियोजनानुसार सुनीता विल्यम्स या 22 जूनला पृथ्वीवर परतणार होत्या. पण स्टारलाईनर स्पेसक्राक्ट या अंतराळयानात बिघाड झालाय. त्यामुळं त्या अंतराळातच अडकून पडल्यात आहेत.

परतीची वाट बिकट

सुनीता विल्यम्स यांची अतराळातून परतीची वाट बिकट झाली आहे. सुनीता विल्यम्स या फक्त आठ दिवसांच्या मोहिमेवर स्पेस स्टेशनवर गेल्या होत्या मात्र, तांत्रिक बिघाडामुळे त्यांची परतीची वाट बिकट झाली आहे. नासा क्रू मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी दिलेल्या नव्या अपडेट नुसार स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट हे 45 दिवसांपर्यंत स्पेस स्टेशनवर डॉक केले जाऊ शकते. तर, दुसरीकडे सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर  पृथ्वीवर परतण्याची तारीख 6 जुलै निश्चित करण्यात आली आहे. याआधी नासाने पृथ्वीवर उतरण्याची तारीख दोनदा पुढे ढकलली आहे. मुख्य प्लान नुसार सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर  15 जूनला पृथ्वीवर परतणार होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे 22 जून ही तारीख निश्चित करण्यात आली. मात्र, तांत्रिक अडथळा अद्याप दूर झालेला नाही. 

हेही वाचा :  प्रोटीनसाठी चिकन-अंडी सोडा, या १० स्वस्तातील Millets ने मिळवा 100% High Protein, मसल्स होतील ताकदवान

स्टारलाईनर स्पेसक्राक्ट बिघाड झाल्याची नासाला आधीच माहिती होती?

स्टारलाईनर स्पेसक्राक्ट बिघाड झाल्याची नासाला आधीच माहिती होती अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. केनेडी स्पेस सेंटर इथून बोइंग स्टारलाइनर हे नवं अंतराळयान सुनीता यांना घेऊन अंतराळात उड्डाण करण्याआधीच तांत्रिक अडचणी समोर आल्या होत्या. उड्डाणाच्या फक्त 90 मिनिटं आधी मोहीम रद्द करावी लागलीय. नासानं दिलेल्या माहितीनुसार, अंतराळयानातला ऑक्सिजन रिलीफ व्हॉल्व व्यवस्थित काम करत नव्हता. त्यामुळे मोहीम पुढे ढकलण्यात आली. तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर बोईंगच्या स्टारलाईनर स्पेसक्राफ्टने 5 जून रोजी पृथ्वीवरून उड्डाण केले. मात्र,  हेलियम वायूची गळती हा किरकोळ तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत  बोईंग स्टारलाइनर लाँच केले. पृथ्वीच्या वातावरणात परत येताना वेग कमी करण्यासाठी हेलियमचा वापर केला जातो. बोईंगच्या स्टारलाईनर अकार्यक्षम झाले तर SpaceX च्या क्रू ड्रॅगनद्वारे सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्यात येईल. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्य

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर :  कागदपत्रे व प्रक्रिया सुरळीत झाल्यास चंद्रपूरच्या 75 वर्षीय गौरीचंद्र …

‘नव्याना संधी मिळायला हवी’, रोहित-कोहलीच्या निवृत्तीवर काय म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar Reaction ROKO Retirement: टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेचा दणदणीत …