एकमेकांच्या अंगावर घातल्या कार..तलवारबाजी आणि बरंच काही..भर रस्त्यात गॅंगवॉर

Karnatak Gangwar Video: आधी पांढरी कार मागच्या बाजुने काळ्या कारला ठोकते..त्यानंतर काळ्या कारमधून 3 तरुण उतरतात..पांढरी कार पुन्हा येते आणि त्यातल्या एका तरुणाला जोरदार ठोकर देते…बाकीचे तरुण पांढऱ्या कारच्या मागे लागतात…दोन्ही गट एकमेकांच्या जीवावर उठलेले दिसतात…अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ… दक्षिणेतल्या कोणत्याही चित्रपटाच्या शूटिंगचा नाही… तर हे खरंखुरं गँगवॉर आहे.. कर्नाटकच्या उडपीमधला भररस्त्यातला हा थरार..सविस्तर जाणून घेऊया.

कर्नाटकच्या रस्त्यावरील गँगवॉरचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये तरुण एकमेकांच्या जीवावर उठले असल्याचं दिसतंय. पोलिसांनी याप्रकरणी काहींना अटक केली तर काही फरार झालेत… 

मध्यरात्रीची वेळ.. तरुणांची दोन टोळकी एकमेकांना भिडतात.. तलवारींचे वार करत एकमेकांच्या अंगावर गाड्या घालतात.. दोन्ही टोळक्यांनी महामार्गावरच कार उभी करुन एकमेकांना संपवण्याचा प्रयत्न केला..सुरुवातीला समोरून एक कार येते… आणि उभ्या असलेल्या दुस-या कारला धडक देते.. त्याचवेळी दोन्ही कारमधून हल्लेखोर बाहेर येतात.. एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला करतात… 

यात पांढ-या रंगाची कार दुस-या कारमधल्या एका तरुणाला उडवते.. तो तरुण जबर जखमी होऊन जमिनीवर निपचित पडतो. तरीही गँगवॉर संपत नाही.. निपचित पडलेल्या तरुणावर दुस-या टोळीचे तरुण हल्ला करतात.. दुस-या कारमधले तरुण अखेर जखमी तरुणाला कारच्या आत घेतात… 

कर्नाटकातल्या कायदा-सुव्यवस्थेची चिरफाड करणारा हा व्हिडिओ भाजपने शेअर केलाय… या व्हिडिओवरुनच कर्नाटकात आता राजकीय वातावरण तापलंय.

हेही वाचा :  बायकोसमोर मूल न होण्यावरुन चिडवलं; 'तो' घरात हातोडा घेऊन घुसला आणि पाडला रक्ताचा सडा, नंतर सिलेंडरचं झाकण...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सासू पडली सूनेच्या प्रेमात! समलैंगिक संबंधांसाठी सासूचा दबाव, पतीने मित्राकडे पाठवलं अन् मग…

आगरातून एक विचित्र घटना समोर आली असून त्यानंतर एकच खळबळ माजली आहे. सासूचं सुनेवर प्रेम …

दागिने खरेदीची सुवर्णसंधी; ग्राहकांनो आज सोनं झालं स्वस्त, वाचा आजचा भाव

Gold Price Today 26th June: आज बुधवारीदेखील सोन्याच्या दरात घट झाल्याचे समोर आले आहे. सोनं-चांदीच्या …