भाभी गँगचा धुमाकूळ, ‘घुंघट की आड से’ मुंबईत भलतेच धंदे

Bhabhi Gang : झारखंडच्या रांचीमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय. भाभी गँग अशी ओळख असलेल्या 4 महिलांच्या गँगला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गेल्या अनेक दिवसांपासून रांची (Ranchi) परिसरात ड्रग्ज तस्करीचा (Drugs Racket) काळा धंदा सुरू होता. याबाबतची तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. 4 महिलांच्या भाभी गँगसह (Bhabhi Gang) 2 पुरुषांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्याकडून अमली पदार्थांचा साठाही जप्त करण्यात आआला. भाभी गँगकडं ब्राऊन शुगरची 70 पाकिटं, अर्धा डझन मोबाईल फोन आणि 90 हजारांची रोख रक्कम असा मुद्देमाल सापडला.
 
ही ‘भाभी गँग’ ड्रग्ज तस्करी करताना खास काळजी घ्यायची. पोलिसांवरच भाभी गँगची करडी नजर असायची. त्यामुळं पोलिसांना गुंगारा देण्यात गँगला यश यायचं. पोलिसांनीही शेरास सव्वाशेर डाव टाकला. भाभी गँगविरोधात कारवाई करताना कुठल्याही वाहनाचा वापर केला नाही. छापेमारी करताना महिला आणि पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना सिव्हिल ड्रेसमध्ये पाठवलं. अखेर पोलिसांच्या ट्रॅपमध्ये भाभी गँग अडकली. या गँगचं मुंबई कनेक्शनही समोर आलं असून त्याचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

गेल्या अनेक दिवसांपासून रांची ते मुंबई भाभी गँगच्या कारवाया सुरू असल्याची खबर पोलिसांनी होती. भाभी गँगचं हे जाळं आणखी कुठवर पसरलंय, याचा शोध घेण्याचं आव्हान आता पोलिसांपुढं असणार आहे.

हेही वाचा :  SSC Exam: 'म्हणून यंदा दहावीत विद्यार्थ्यांची संख्या घटली' राज्य मंडळाच्या अध्यक्षांचा अजब दावा

नागपूर विमानतळावर आरोपी अटक
दरम्यान, सीमा शुल्क विभागच्या एअर कस्टम यूनिट आणि एअर इंटेलिजेंट यूनिटीने नागपूर विमानतळावर मोठी कारवाई केली आहे.  मुंबई रहिवासी मोहम्मद तारीक शेख आणि सनी भोला यादव या दोन आरोपींना नागपूर विमानतळावर अटक करण्यात आली आहे. शारजाहून एअरेबियाच्या फ्लाइट क्रमांक जी 415 विमानातून सोने तस्करी होत असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती. याआधारे नागपुर विमानतळावर आरोपिंची तपासणी केली असता त्यांच्याकडे 14 लाख 20 हजाराचे 200 ग्रॅम सोने,20 आयफोन, आयपॅड, लॅपटॉप, कीमती सिगरेट असा 37 लाख 81 हजारचा मुद्देमाल सापडला. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? खासदार नव्हे, आमदार होणार; मंत्रीपदही मिळणार?

Pankaja Munde : पराभव होऊनही पंकजा मुंडेंना लॉटरी लागणार आहे. पंकजा मुंडे खासदार नाही तर …

ठाकरेंची नाराजी भोवणार? जयंत पाटलांची विधान परिषदेची वाट खडतर?

Jayant Patil Vidhan Parishad: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणार आहे. या …