Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धामुळे थांबले उर्वशी रौतेलाच्या चित्रपटाचे शूटिंग 

Russia Ukraine War : अभिनेत्री उर्वशी रौतेलाने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती एका नव्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. परंतु, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे उर्वशीच्या चित्रपटाचे शुटिंग थांबले आहे. युक्रेनमधील शूटिंगचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  

उर्वशी रौतेला गेल्या काही दिवसांपूर्वी युक्रेनमधील कीव्ह आणि ओडेसा येथे तिच्या आगामी तमिळ चित्रपटाचे शूटिंग करत होती. परंतु, रशिया आणि युक्रेमधील तणावामुळे तेथील परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून उर्वशी मायदेशी परतली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याच्या केवळ दोन दिवस आधी ती भारतात परतली आहे. “शूटिंग सुरू असताना खूप टेन्शन होते, असे उर्वशीने म्हटले आहे. शिवाय उर्वशीचा भाऊ युक्रेनमधील परिस्थिती पाहून खूप अस्वस्थ झाला होता. यावेळी तिचे वडीलही युक्रेनमध्येच होते. परंतु, बिघडत चाललेली परिस्थिती पाहून आम्ही मायदेशी परतल्याचे उर्वशीने सांगितले आहे. 

दोन्ही देशांमधील हे युद्ध लवकरच संपेल आणि पुन्हा एकदा युक्रेनमध्ये काम सुरू करता येईल, अशी आशा उर्वशीने व्यक्त केली आहे. शिवाय युद्धात प्राण गमावलेल्या युक्रेनच्या नागरिकांबद्दल तिने शोक व्यक्त केला आहे.  

हेही वाचा :  Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सध्या जगभरात चर्चेचा विषय आहे. हजारो युक्रेनियन नागरिकांना या युद्धाचा फटका बसला आहे. परंतु, आता रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा परिणाम बॉलिवूडवरही होऊ लागला आहे. युक्रेन आणि रशियामध्ये अनेक भारतीय चित्रपट, वेब सीरिज आणि मालिका शूट झाल्या आहेत. बॉलिवूडसाठी दोन्ही देश शूटिंगची आवडती ठिकाणे आहेत. मात्र, दोन्ही देशांतील युद्धामुळे भारतीय चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. यामध्ये उर्वशी रौतेलाच्याही चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.  

महत्वाच्या बातम्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …